चक्रवाढ व्याजची जादू – भाग ३

https://bit.ly/2LoE4Ml
0 758

Get real time updates directly on you device, subscribe now.

Print Friendly, PDF & Email

चक्रवाढ व्याज हा जगातील आठवा चमत्कार आहे. ज्याला तो समजतो, तो पैसे कमावतो… ज्याला समजत नाही … तो पैसे गमावतो.” असे विधान अल्बर्ट आईनस्टाइन करतात.

“थेंबे थेंबे तळे साचे”, हा पूर्वजांनी दिलेला वसा हेच तर सांगतो.

वेळ आणि पैशाचं योग्य मूल्य जाणणारे आणि माणसाला पैसा आणि वेळ यांचं महत्व पटवून देणारे तत्व म्हणजे चक्रवाढ व्याज. खरं सांगायचं तर हे तत्व जसं फायदा करून देतं तसंच, खूप मोठ्या प्रमाणावर नुकसानही करून देतं. त्यामुळे चक्रवाढ व्याज आपला सर्वात चांगला मित्र किंवा आपला सर्वात वाईट शत्रू असू शकतो.

चक्रवाढ व्याज आणि धोका

 • चक्रवाढ व्याजाचे फायदे तर आपण बघितले. कित्येक पटीत संपती वाढवायची असेल तर चक्रवाढ व्याजाने केलेली गुंतवणूक सर्वात फायदेशीर आहे. पण चक्रवाढ व्याज धोक्याचेही आहे हे ध्यानात असू द्या. चक्रवाढ व्याज तेव्हा हानिकारक आहे जेव्हा गोष्ट येते कर्जाची!
 • गरीब आणि छोट्या शेतकऱ्यांना लुबडण्यासाठी वर्षानुवर्षे वापरली जाणारी पद्धत म्हणजे चक्रवाढ व्याज दराने कर्ज. धनाढ्य सावकार गरजूंना अश्या तत्वावर मोठ्या रकमेची कर्जे देत.
 • गरीब लोकांना शेतीसाठी, किंवा लग्नकार्यासारख्या समारंभासाठी पैशाची गरज असे आणि सावकाराशिवाय पर्याय नसल्याने म्हणेल त्या व्याजावर कर्ज घेतले जाई.
 • चक्रवाढ व्याजाच्या भोवऱ्यात ते असे काही अडकत की कर्ज फेडता फेडता त्यांचे आयुष्य संपून जाई. पुढच्या पिढीच्या डोक्यावर कर्जाचा हा भर सरकवून समोर दिसणारा आत्महत्येचा पर्याय ते स्वीकारत. आजही अशी जुलमी पद्धत, अत्यंत दुर्गम भागात, अशिक्षित आणि गरीब लोकांना त्रास देत असणार. लोक शेतीवाडी गमावून शेतमजूर म्हणून आयुष्य काढतात.
 • आपण शिकलो, साक्षर झालो म्हणजे आपण सुटलो नाही. कोणत्याही बँक,संस्था,पतपेढी किंवा व्यक्ती यांच्याकडून आपण कर्ज घेतो, तेव्हा आपण कोणत्या तत्वावर कर्ज घेत आहोत? व्याजदर काय आहे? या सर्व तपशिलाचा लेखी पुरावा तुमच्याकडे हवा. नाहीतर आपली गणना सुशिक्षित अडाण्यांमध्ये केली जाईल.      

चक्रवाढ व्याज दराने गुंतवणूक-

 • उत्पन्नावर उत्पन्न मिळवणे म्हणजे चक्रवाढ व्याजाने गुंतवणूक करणे. सरकारमार्फत राबविण्यात येणाऱ्या अशा काही योजना आहेत ज्या तुम्हाला हमखास धनलाभ करून देतील. नॅशनल सेविंग सर्टिफिकेट, किंवा पीपीएफ योजनेमध्ये गुंतवलेली रक्कम तुम्हाला हा फायदा मिळवून देऊ शकते. अधिक माहितीसाठी अर्थतज्ञाचा सल्ला घ्यावा.  

चक्रवाढ व्याज दराने कर्ज-

 • चक्रवाढ व्याजाने कर्ज घेतल्यावर त्यावर तयार होणारे व्याज हे पोटात गोळा आणू शकते. जेव्हा घेतलेलं कर्ज फेडण्यात दिरंगाई होते किंवा आपण टाळाटाळ करतो तेव्हा हे धोकादायक असू शकते.  
 • क्रेडिट कार्ड बिलावर तुम्हला अश्या प्रकारचा धोका आहे. त्यामुळे त्या त्या वेळी किमान मासिक शुल्क भरत जावे नाहीतर एकूण बिलाच्या पटीत कर्जाची संख्या वाढू शकते आणि अशा वेळी आपल्या मूळ खरेदीपेक्षा मोठी रक्कम भरून कर्जाची परतफेड होऊ शकते.

हे टाळण्यासाठी काही गोष्टी लक्षात घ्याला हव्यात-

 • प्रत्येक महिन्याला नियोजित कमीतकमी रकमेपेक्षा थोडेसे जास्त पैसे भरावे, जेणेकरून व्याजदराचे नकारात्मक परिणाम भोगावे लागत नाहीत.
 • क्रेडिट कार्ड बिलासारख्या लहान कर्जासाठी, शक्य तितक्या लवकर पैसे भरून मोकळे होणे योग्य आहे.
 • तारण कर्ज किंवा कार कर्जासारख्या मोठ्या कर्जासाठी प्रत्येक महिन्याला कमीतकमी रकमेपेक्षा थोडी जास्त पैसे देऊन करून आपली संपूर्ण संपत्ती कायम ठेवणे शक्य आहे.

(चित्रसौजन्य: https://bit.ly/2LoE4Ml )

चक्रवाढ व्याजाची जादू , चक्रवाढ व्याजाची जादू – भाग २,  आर्थिक नियोजनातून श्रीमंती

 

(आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला info@arthasakshar.com वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर‘ या नावाने सेव्ह करून  ह्या नंबरवर ‘अपडेट’ (Update) असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)

(Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा.)

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.,

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.