Reading Time: 2 minutes

आजची कथा आहे शांताबाई या एका डॉक्टरांच्या दवाखान्यात काम करणाऱ्या मावशींची..,

गेल्या २ वर्षांपासून त्या डॉ. दाते यांच्या दवाखान्यात काम करत आहेत. मनापासून काम करणे, वेळ पाळणे, पेशन्टला औषधे नीट सांगणे यामुळे दाते डॉक्टर अगदी निश्चिन्त असत. त्यांच्या नवऱ्याचं अकाली निधन आणि एक मुलगा आणि मुलीची असलेली जबाबदारी त्यांनी अगदी लीलया पेलली. डॉक्टरांकडचा पगार, नवऱ्याची मिळणारी काही पेन्शन यावर त्या हे सगळं चालवत होत्या

मात्र काही दिवसांपासून असलेला त्यांचा उदास चेहरा काही दातेंच्या नजरेतून सुटला नाही आणि त्यांनी शांताबाईंना त्याबाबत विचारलं. आधी फारसं काही न सांगणाऱ्या शांताबाईंचा धीर सुटला आणि त्यांची कहाणी ऐकून डॉ. दाते तर चक्रावूनच गेले

  • नवऱ्याच्या मृत्यूनंतर ज्या काही पॉलिसी होत्या त्यामधील एका आणि देशातील सर्वात मोठ्या विमा कंपनीने त्यांचा क्लेम नाकारला होता. कारण – १ / २ हप्ते भरले गेले नव्हते. त्याकडे जरा दुर्लक्ष झालं होतं त्यांच्या मिस्टरांचं…. त्यामुळे त्याचे पैसे देण्यास नकार दिला आणि केवळ भरलेल्या प्रीमियमच्या काही टक्के रक्कम मिळाली. ती रक्कम आणि अपघातात मृत्यू झाल्यानं त्या विम्याचे पैसे असे एकूण १० लाख रुपये त्यांनी त्यांच्या एका नातेवाईकाच्या सांगण्यावरून ‘समृद्ध जीवनाचे’ आमिष दाखवणाऱ्या एका कंपनीत गुंतवले (?) होते.
  • बापाविना वाढवलेल्या पोरीचं लग्न लावून द्यायचे असं त्यांनी ठरवल होतं. बँक देत असलेल्या परताव्यापेक्षा २ ते ३ टक्के परतावा जास्त मिळतो, असं तेव्हा त्यांना सांगितलं गेलं आणि नातेवाईक जवळचा आहे, कंपनीचं ऑफिस आहे आदी जुजबी माहितीवर त्या तयार झाल्या आणि बँकेतील ऑफिसर पैसे काढू नका असं सांगत असतानादेखील त्यांनी पैसे गुंतवले. हे सांगताना त्यांचा डोळ्यांच्या कडा पाणावल्या.
  • पुढे अशा कंपन्यांचं होतं तेच या कंपनीचं झालं. पेपरमध्ये विविध बातम्या वाचायला येऊ लागल्या. चार-चौघात अधिकाधिक माहिती कळू लागली. नातेवाईक दाद देईना. कंपनीच्या ऑफिसमध्ये कुणी काही सांगेना. मुळात कमी शिकलेल्या आणि भिडस्त अशा शांताबाईंना कोणीच काही सांगेना. त्यांच्यासारखे अनेक लोक त्या ऑफिसमध्ये यायचे आणि निराश होऊन जायचे. आपण फसवले गेलो आहोत याची त्यांना जाणीव झाली आणि त्या अत्याधिक खचत  गेल्या
  • डॉ दातेंना ही काही सुचेना. “असं करायला नको होतं”, या शब्दांनांही फारसा अर्थ उरला नव्हता.
  • कालांतराने त्या प्रवर्तकास अटक झाली. त्याच्या मालमत्तेवर टाच आणली गेली आणि या फसवणूक झालेल्या लोकांचे काही पैसे सरकारने परत देण्याचा प्रयत्न केला, पण काही फार उपयोग झाला नाही. शांताबाई आणि अशा अनेक छोट्या मोठ्या लोकांचे पैसे यात बुडाले आणि पैशाबरोबर कित्येक स्वप्नेही यात बुडाली.

याला जबाबदार कोण?

ती व्यक्ती, तो नातेवाईक का सरकार?

पण या साऱ्यांच्या आधी पहिली जबाबदारी येते ती आपली – गुंतवणूकदारांची. आपला कष्टाचा पैसा कुठे आपण गुंतवत आहोत याबद्दल आपणच सजग असायला हवं

‘ही दुनिया मायाजाल मनुजा जागा जरा ! ‘ हेच खरं

आपण काय धडा घ्यावा?

१. पैसा कितीही असो, तो गुंतवताना सखोल चौकशी हवी.

२. नातेवाईक, मित्र यांच्या सल्याने गुंतवणुकीचे निर्णय घेऊ नका.

३. बँक, सरकारमान्य वित्तीय संस्था यापेक्षा जास्त दर आहे, या आमिषाला बळी पडू नका.

४. गुंतवणूक करताना संबंधित संस्थेस सेबीची परवानगी आहे का? हे तपासा.  तसेच क्रेडिट रेटिंग एजन्सीजद्वारे दिले जाणारे रेटिंगही तपासा.

५. सर्वच पैसे एका ठिकाणी गुंतवू नका

६. असे महत्वाचे निर्णय घेताना आपल्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला जरूर घ्या.

(या लेखात नमूद केलेली घटना ही सत्यघटना असून त्यातील नावे व पात्रे बदलण्यात अली आहेत.)

Samarth P. Kotasthane

[email protected]

919860411785

(लेखक AMFI रजिस्टर्ड आर्थिक सल्लागार असून आर्थिक नियोजन व आर्थिक गुंतवणूक या विषयांत मार्गदर्शन करतात.)

(आपण आपले किंवा आपल्या निकटवर्तीयांचे अनुभव आम्हाला [email protected]  या इमेल आयडीवर अथवा 8208807919  या व्हाट्स  अप  नंबर वर  पाठवू  शकता.  योग्य लेखांना अर्थसाक्षर.कॉमवर प्रसिद्ध करण्यात येईल.) 

फसव्या योजना कशा ओळखाल?,

श्रीमंत मी होणार!,

फसव्या विमा पॉलिसींचा सापळा,

गुंतवणूकीचे मृगजळ: हिरा ग्रूप घोटाळा

आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला [email protected] वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर’ या नावाने सेव्ह करून या नंबरवर ‘Hi’ असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Share this article on :
You May Also Like

मोबाईल चोरीला गेलाय? बँकेबाबत ऑनलाईन माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी करा ‘या’ गोष्टींचे पालन

Reading Time: 3 minutes गर्दीत असताना फोन चोरीला जाण्याची दाट शक्यता असते. फोन चोरीला गेल्यानंतर वैयक्तिक…

ऑनलाईन व्यवहार करताना भीती वाटते? या टीप्स नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes मागच्या दोन वर्षात म्हणजे कोविड दरम्यान झपाट्याने काही बदललं असेल तर ते…

Ponzi Schemes: फसव्या योजना कशा ओळखाल?

Reading Time: 2 minutes गुंतवणूक तर सगळेच करतात. ज्या गुंतवणुकीमध्ये आकर्षक परतावा असेल, त्या गुंतवणुकीला लोकं प्राधान्य देतात. साहजिकच आहे, पैसा कोणाला नको असतो? पण, हे साध्य करायचा मार्ग कोणता आणि कसा आहे, याची माहिती असल्याशिवाय फक्त आकर्षित व्याजदरांमागे धावू नये. लक्षात ठेवा चकाकतं ते सोनं नसतं. आकर्षक परताव्याच्या चकचकीत ऑफर्स फसव्या असू शकतात.