अर्थज्ञान: रोजच्या वापरतल्या काही महत्वाच्या शब्दांचे अर्थ – भाग १

Reading Time: < 1 minute जगातील प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था वेगवेगळी असते. देशाचा सर्वागीण विकास करायचा असेल तर, देशाची अर्थव्यवस्था चांगली असणे असणे अत्यंत आवश्यक किंबहुना त्यावरच देशाची प्रगती अवलंबून असते. रोजच्या वापरात, बातम्यांमध्ये, वर्तमानपत्रात वारंवार वापरल्या जाणाऱ्या काही महत्वाच्या संज्ञांचे अर्थ अनेकांना माहिती नसतात. या शब्दांचे अर्थ समजावण्याचा प्रयत्न या लेखाद्वारे  करत आहोत. 

महिन्याला २-३-५% टक्के हमखास मिळवा योजनांचा भांडा-फोड

Reading Time: 3 minutes महिन्याला २-३-५% टक्के हमखास मिळवा आणि आपले जीवन आनंदी जगा. आधीच कमाई चे मार्ग कमी आणि खर्च जास्त असलेला मध्यमवर्गीय रिस्क न घेता आपल्या पदरात फायदा कसा पाडून घेता येईल याचा विचार करत असतो आणि मिळणाऱ्या हमखास नफ्याच्या आड बुद्धी गहाण ठेऊन गुंतवणूक करतो. तर, जाणून घेऊया या कंपन्या कशा चालतात आणि पुढे काय होते.

नोकरी सोडल्यावर तुमचे पूर्ण आणि अंतिम देय आता मिळवा २ दिवसांत

Reading Time: < 1 minute नोकरी सोडल्यानंतर आपले पूर्ण आणि अंतिम देय (full and final payment ) मिळविण्यासाठी साधारणत: एक महिना लागतो.  परंतु, वेतन अधिनियम२०१९ नुसार, आपले पूर्ण आणि अंतिम देय दोन दिवसात मिळणार आहे. हा नियम ८ ऑगस्ट २०१९ रोजी अधिसूचित करण्यात आला आहे. 

आरोग्य साक्षरता – जेनेरिक औषधांचे फायदे

Reading Time: 2 minutes आजारी पडल्यावर आपण डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर तपासून औषधे लिहून देतात. ही औषधे ब्रँड नेम (व्यावसायिक नावाने) परिचित असतात. भारतीय बाजारपेठेत अनेक औषध कंपन्या अस्तित्वात आहेत. या सर्व औषध कंपन्यांनी औषधे कशी बनवावीत यासाठी  Indian pharmacopoeia नावाचे एक पुस्तक आहे. त्यात दिलेल्या पद्धतीनुसारच सर्व कंपन्यांना औषधे बनवावी लागतात. Indian pharmacopoeia मध्ये वेळोवेळी भर पडत असते ती नवनवीन शोधांची व त्यामुळेच तो परिपूर्ण होत असतो.  

आजपासून NEFT चोवीस तास उपलब्ध!

Reading Time: < 1 minute सध्या ऑनलाईन बँकिंगचा वापर झपाट्याने वाढला आहे. बँकेकडूनही ऑनलाईन व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध ऑफर्स व सुविधा ग्राहकांना दिल्या जात आहेत. आता यामध्ये भर पडली आहे एका नवीन नियमाची! नवीन नियमाप्रमाणे आता एनईएफटी (NEFT) सुविधा आता २४× ७ तास वापरता येणार आहे. यामुळे दिवसभरात केव्हाही एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करता येतील. 

भारतातील सर्वात श्रीमंत रिअल इस्टेट उद्योजक – श्री. मंगल प्रभात लोढा

Reading Time: < 1 minute भारतातील टॉप १०० श्रीमंत रिअल इस्टेट उद्योजकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ग्रोहे हुरुन इंडिया २०१९ रिअल इस्टेट रिच लिस्ट (GROHE Hurun India Real Estate Rich List 2019) या नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या यादीनुसार रु. ३२,००० कोटींची संपत्ती असलेले श्री. मंगल प्रभात लोढा  हे भारतातील सर्वात श्रीमंत रिअल इस्टेट उद्योजक आहेत. 

उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक आयपीओला जबरदस्त प्रतिसाद- आयपीओ १६६ पट सब्सक्राइब्ड

Reading Time: 2 minutes उज्जीवने १२. ३९ कोटी शेअर्स आयपीओ द्वारे भांडवल उभारणीसाठी बाजारात आणले होते.  कंपनीच्या उज्ज्वल भविष्याचा विचार करून  इतर समव्यवसायिक स्मॉल फायनान्स बँकेच्या तुलनेत स्वस्त असणाऱ्या उज्जीवन शेअर्सला प्रचंड मागणी नोंदवण्यात आली. ही  मागणी थोडी थोडकी नसून तब्बल २०५३. ८ कोटी शेअर्सला गुंतवणूकदारांकडून मागणी नोंदली गेली. 

शेअर बाजार: रिलायन्सचे वाढते बाजारमूल्य

Reading Time: 2 minutes रिलायन्स कंपनीच्या बाजारमुल्याने ( Market Capitalisation) आज दहा लाख कोटी (एकावर तेरा शुन्ये.. उगीच घोळ नको) रुपयांचा टप्पा पार करत एक नवा मैलाचा दगड गाठला. नऊ लाख ते दहा लाख हा टप्पा गाठायला फक्त ४० दिवसांचा आणि  २५ सत्रांचा अवधी लागला. म्हणजेच गेल्या महिनाभरांत कंपनीच्या शेअरने १०% च्या आसपास वाढ नोंदविली.

फ्लिपकार्ट व अमेझॉनची विक्रमी विक्री

Reading Time: < 1 minute ऑक्टोबर महिन्यात आलेल्या दिवाळीच्या कालावधीत फ्लिपकार्ट आणि अमेझॉन या ऑनलाईन शॉपिंग वेबसाइट्सवरून ३१,००० कोटी रुपयांची  (४.३ बिलियन डॉलर्स) विक्री झाली आहे.  

मारुतीची कारची होम डिलिव्हरी

Reading Time: 2 minutes कोपऱ्यावरचा दुकानदार डाळ,तांदूळ आपल्या घरी पोहचवितो, हे आपणास माहिती आहे. अलिकडल्या काळात इडली, डोसा, भेळ हे पदार्थ देखील संगणक तंत्रज्ञानाच्या माध्यमाने घरपोच येऊ लागले आहेत.  या सोयीमुळे ग्राहकाला वाहतुकीसाठी द्यावा लागणारा वेळ आणि श्रम यांची बचत होते. परंतु, यापुढे ‘मारुती’ देखील आपल्या घरी येईल याची क्वचितच कोणाला माहिती असेल.