You cannot copy content of this page

मृत्युपत्राशिवाय मृत्यू आणि संपत्तीचे वाटप

0 202

Get real time updates directly on you device, subscribe now.

Print Friendly, PDF & Email

मृत्यू अटळ असतो, बहुतांश वेळा अनपेक्षितही असतो. मृत्यूपत्र हा कायद्याने दिलेला असा मार्ग आहे ज्यामार्गे आपण आपल्या संपत्तीची मृत्यूपश्चात विभागणी करु शकतो. पण काही कारणांमुळे मृत्यूपत्र करायच्या आधीच जर एखाद्या व्यक्तीचा आकस्मित मृत्यू झाला तर त्याच्या मालमत्तेचं काय होत असेल? त्याची विभागणी कशा प्रकारे होत असेल? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात.

 • कायद्यानुसार ज्या व्यक्तीने मृत्यूपत्र केलेलं नाही, त्या व्यक्तीला ‘इनटेस्टेट’ (Intestate) असं म्हणतात. अशावेळी संबंधित देशाच्या कायद्यानुसार त्या व्यक्तीच्या मालमत्तेची विभागणी करण्यात येते. यामध्ये इनटेस्टेट व्यक्तीचे बॅंक खाते, सिक्युरिटीज, स्थावर मालमत्ता व इतर मालमत्ता इत्यादी मालमत्तांचा सामावेश होतो.
 • जर इनटेस्टेट व्यक्तीची मालमत्ता दुसऱ्या देशात किंवा देशांमध्ये असेल, तर ज्या देशात मालमत्ता आहे त्या देशामध्ये असलेल्या इनटेस्टेट कायद्यानुसार मालमत्तेची विभागणी अथवा हस्तांतर केले जाते.

इनटेस्टेट  आणि कायद्यामधील तरतुदी

 • सामान्यतः हिंदू इंटेस्टट व्यक्तीच्या संप्पतीचे वाटप हे  “हिंदू वारसाहक्क कायदा १९५६” नुसार (आता “हिंदू वारसाहक्क दुरुस्ती कायदा २००५”) केले जाते.
 • इनटेस्टेट व्यक्ती संबधीत तरतुदी या इनटेस्टेट व्यक्ती विवाहित आहे का अविवाहित? विवाहीत असल्यास मुले आहेत का? अशा अनेक गोष्टींचा विचार करुन केलेल्या आहेत. तसेच कायद्यानुसार इनटेस्टेट व्यक्तीच्या वारसांमध्ये अथवा नातेवाईकांमध्ये विभागून वाटप करण्यात येते. जर इनटेस्टेट व्यक्तीला कोणीही वारस अथवा नातेवाईक नसतील, तर संपूर्ण मालमत्ता सरकारजमा केली जाते.  

अविवाहित व्यक्ती

 • जर इनटेस्टेट व्यक्ती अविवाहित असेल तर त्याची संपूर्ण मालमत्ता त्या व्यक्तीच्या आई अथवा वडिलांच्या किंवा दोघांच्याही नावे केली जाते. जर आई वडिलांचा  अगोदरच मृत्यू झालेला असेल तर त्या व्यक्तीच्या भावंडांमध्ये सदर मालमत्ता समप्रमाणात विभागण्यात येते.
 • जर भावंडेही नसतील तर आधी वडिलांचे नातेवाईक उदा. चुलत भावंडांच्या नावे मालमत्ता समप्रमाणात विभागण्यात येते.  जर वडिलांच्या बाजूचे कुठलेही नातेवाईक हयात नसतील, तर आईकडील नातेवाईकांचा विचार केला जातो.
 • व्यक्ती अविवाहित असूनही जर त्या व्यक्तीला अपत्य असतील तर संपूर्ण मालमत्ता मुलांमध्ये समप्रमाणात विभागण्यात येते. जर सदर मुलांचा अगोदरच मृत्यू झालेला असेल तर संपूर्ण मालमत्ता नातवंडांमध्ये विभागण्यात येते.

विवाहित व्यक्ती

 • जर इनटेस्टेट व्यक्ती विवाहित असेल तर त्याच्या  मालमत्तेच्या प्रकारानुसार मालमत्तेची विभागणी केली जाते. यामध्ये प्रामुख्याने जोडीदाराच्या नावे संपूर्ण मालमत्ता केली जाते अथवा पत्नी, भावंडे, आई वडील यांच्यामध्ये विभागली जाते.
 • जर इनटेस्टेट  व्यक्ती विवाहीत असेल आणि त्या व्यक्तीला आधीच्या विवाहातून जन्माला आलेली  मुले असतील तर अशावेळी अर्धी मालमत्ता जोडीदाराला व उर्वरित अर्धी मालमत्ता मुलांमध्ये समप्रमाणात विभागण्यात येते.

हिंदू वारसाहक्क कायदा १९५६ व त्यामधील काही महत्वच्या तरतुदी:

 • कायद्यानुसार ज्या व्यक्तीने मृत्यूपत्र केलेलं नाही, त्या व्यक्तीला ‘इनटेस्टेट’ (intestate) समजण्यात येतं.  “हिंदू वारसाहक्क कायदा १९५६” (आता “हिंदू वारसाहक्क दुरुस्ती कायदा २००५”) या कायद्यांमध्ये असलेल्या  तरतुदीनुसार हिंदू ‘इनटेस्टेट’ व्यक्तीच्या मालमत्तेचे विभाजन केले जाते. या कायद्यामधील तरतूदी हिंदू, बौद्ध, जैन आणि शीख समाजासाठीही लागू आहेत.
 • या कायद्यानुसार जर हिंदू पुरुष इनटेस्टेट म्हणून मृत्यू पावला तर त्याची मालमत्ता Class I मधील वारसांना मिळते. जर Class I मधील वारसांपैकी कोणीही अस्तित्वात अथवा हयात नसेल तर, Class Il मधील वारसांना मिळते.
 • जर Class I व Class II दोन्ही मधील वारसांपैकी कोणीही अस्तित्वात अथवा हयात नसेल तर इनटेस्टेट व्यक्तीच्या वडिलांकडील नातेवाईकांना व ते ही नसतील तर आईकडील नातेवाईकांना मालमत्ता मिळते. जर यांपैकीही कोणीही नसेल तर सर्व मालमत्ता शासन दरबारी जमा होते.
  • Class I
   • मुलगा / मुलगी, विधवा पत्नी, आई, मृत्यू पावलेल्या मुलाची अपत्ये, मृत्यू पावलेल्या मुलीची अपत्ये, मृत्यू पावलेल्या मुलाची विधवा पत्नी, मृत्यू पावलेल्या नातवाची अपत्ये, मृत्यू पावलेल्या नातवाची विधवा पत्नी.
  • Class II
   • वडिल, नातवंडे, बहीण, भाऊ, बहिणीची अपत्ये, भावाची अपत्ये, मुलीची नातवंडे, भावाचा मुलगा, बहिणीचा मुलगा. जर हिंदू स्त्री इनटेस्टेट म्हणून मृत्यू पावली तर तिची मालमत्ता खालील क्रमाने विभागण्यात अथवा वाटण्यात येते.
    • १. मुलगा, मुलगी, मृत्यू पावलेल्या मुलाची अथवा मुलीची मुले, पती
    • २. पतीचे नातेवाईक
    • ३. आई आणि वडील
    • ४. वडिलांच्या कुटुंबातील वारस
    • ५. आईच्या कुटुंबातील वारस

इस्लामिक कायदा:

 • मुस्लिम व्यक्तीच्या मृत्युपात्रासाठी हिंदू वारसा कायदा, १९२५ मधील तरतुदी लागू होत नाहीत. मुस्लिम लॉ किंवा शरियत लॉ मधील तरतुदींनुसार मुस्लिम व्यक्तीच्या मालमत्तेचे विभाजन केले जाते.
 • मुस्लिम कायद्यानुसार मुस्लिम व्यक्ती एकूण मालमत्तेच्या केवळ एक तृतीयांश मालमत्तेसाठी मृत्युपत्र करू शकते. उर्वरित दोन तृतीयांश मालमत्ता वारसांमध्ये समी प्रमाणात विभागली जाते.
 • जन्माला न आलेल्या मुलांसाठी मुस्लिम व्यक्ती मृत्युपत्रात तरतूद करू शकत नाही.
 • मुस्लिम पत्नी मालमत्तेचे विघटन करू शकत नाही. परंतु तिला मालमत्तेमधील तिचा हिस्सा मिळतो. मृत व्यक्तीस एकापेक्षा जास्त पत्नी असल्यास समान विभागणी केली जाते.
 • मोहम्मदीयन कायद्यानुसार पुरूष वारसास मुलींच्या दुप्पट वाटा दिला जातो.
 • मुस्लिम वारसांबाबत व त्यामधील वाटपांसंदर्भातील नियम खूपच व्यापक आहेत.

 

(चित्रसौजन्य: https://bit.ly/2QMC95Y )

(Disclaimer: सदर लेखाचा हेतू हा अर्थसाक्षरतेचा प्रसार करणे असून, उपरोक्त विषयासंदर्भातील निर्णय आपल्या नेहमीच्या वकील/चार्टर्ड अकाउंटंट/सल्लागार अथवा तज्ञ व्यक्तीच्या सल्ल्यानेच घ्यावेत.)

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.