Reading Time: 2 minutes

 

सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. नवीन उद्योग चालू करणे, उद्योगाची वाढ करणे किंवा हॉस्पिटलचे बिल भरणे यासाठी पैशांची गरज लागत असते. 

 

कर्ज मिळवण्यासाठी सर्वात आधी सिबिल स्कोअर कसा वाढवावा आणि क्रेडिट रिपार्ट्स मध्ये दिसत असलेला सिबिल स्कोअर कसा टिकवून ठेवावा याची माहिती मिळणे गरजेचे आहे.  खालील लेखात सिबिल स्कोअर कसा वाढवायचा याबद्दलचे उपाय सांगण्यात आले आहेत. 

 

तुमचा सिबिल स्कोअर कसा वाढवू शकता? 

 

१. सुरक्षित आणि असुरक्षित कर्जाच्या क्रेडिट पोर्टफ़ोलिओचे गुणोत्तर टिकवून ठेवणे –

  • सुरक्षित आणि असुरक्षित दोन्ही प्रकारचे कर्ज आपण घेऊ शकतो. कर्जदाराने बँक, फायनान्शिअल फर्म्स यांच्याकडून असुरक्षित जास्त प्रमाणावर कर्ज घेतलेले असल्यास कर्जाची परतफेड करताना त्याचे कर्ज नाकारले  जाण्याची शक्यता जास्त असते. 
  • हे टाळण्यासाठी कर्जदार सुरक्षित आणि असुरक्षित कर्ज घेऊन घर किंवा गाडीची खरेदी करू शकतो. त्यावेळेस त्याला सिबिल स्कोअर टिकवून कसा ठेवावावा याबद्दलची माहिती समजते. 
  • क्रेडिट कार्ड कर्ज सुद्धा असुरक्षित क्रेडिट रकमेमध्ये मोडले जातात. 

 

२. कोणत्याही परिस्थितीत कर्ज आणि क्रेडिट कार्ड सेटल करू नका –

  • क्रेडिट कार्ड किंवा कर्ज सेटलमेंट मुळे क्रेडिट स्कोअर मध्ये सुधारणा होत नाही. कर्ज किंवा क्रेडिट कार्ड मधली सेटलमेंट म्हणजे कर्जदार त्याच्या बँकेशी संपर्क साधतो.
  • त्यानंतर बँकेशी वास्तुविक देय रकमेपेक्षा कमी किमतीचा करार करतो आणि रक्कम भरून कर्ज बंद करतो. 
  • बँक काही वेळा अशा विनंत्या स्वीकारते पण कर्ज सेटल केल्यानंतर क्रेडिट स्कोअरवर त्याचा नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे कर्ज सेटलमेंट न करता संपूर्ण परतफेड करा. 

 

नक्की वाचा : तुमच्या मनातही सिबिल स्कोअरबद्दल ‘हे’ गैरसमज आहेत का? 

 

३. कर्ज काढण्याचे प्रमाण कमी ठेवणे –

  • सिबिल स्कोअर कसा वाढवायचा हा सर्वानाच प्रश्न पडतो. कर्जदाराने कमी वेळा कर्ज घेण्याचा प्रयत्न करावा, त्यामुळे त्याचा सिबिल स्कोअर सकारात्मक राहायला मदत होते. 
  • बँकेच्या चौकशीमुळे कर्जदाराचा सिबिल स्कोअरही कमी होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला कर्ज घेताना अडचणी निर्माण होऊ शकतात. 
  • क्रेडिट स्कोअर कसा वाढतो हे माहित करून घेताना तो कसा टिकवावा हेही समजणे तितकेच गरजेचे आहे. 

 

४. तुमच्या क्रेडिट अहवालाचे मूल्यांकन करा –

  • क्रेडिट अहवालातील त्रुटी बऱ्याच वेळा नोंदवण्यात येतात आणि ही एक सामान्य गोष्ट आहे. त्यामुळे क्रेडिट अहवालावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. 
  • कायम सिबिल क्रेडिट रिपोर्ट तपासत राहणे गरजेचे असते. Finserv MARKETS मधून तुम्हाला मोफत क्रेडिट रिपोर्ट मिळतो. 
  • त्या रिपोर्टमुळे चुकीची माहिती तपासता येते, बदल करता येतात आणि त्यामधील दुरुस्ती वेळेत करता येते. 

 

५. योग्य क्रेडिट अकाऊंटची निवड करा – 

  • क्रेडिट हे योग्य पद्धतीने निवडायला हवे. सुरक्षित आणि असुरक्षित कर्ज घेताना योग्य अकाऊंटची निवड करणे गरजेचे असते. 
  • सर्व प्रकारच्या कर्जांची वेळेत परतफेड केली तर क्रेडिट स्कोअर टिकून राहण्यास मदत मिळते. 

 

६. धोक्याचा इशारा टाळा – 

  • क्रेडिट रिपोर्टमध्ये कर्जदाराच्या जोखमीची माहिती समजत असते. 
  • क्रेडिट कार्डवरील कर्जाची परतफेड वेळेवर करा, उशिरा कर्जाचा भरणा केला तर क्रेडिट स्कोअरवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. 

 

७. क्रेडिट लिमिट वाढवून देण्याची मागणी करा – 

  • तुम्हाला क्रेडिट लिमिट जास्त हवे असेल तर ते वाढवून घ्या. क्रेडिट कार्डचे लिमिट वाढवले की गरजेच्या वेळेला त्याचा उपयोग होतो. 
  • त्यामुळे क्रेडिट कार्ड घेत असताना क्रेडिट लिमिट वाढवून घेत जा. 

 

८. जुन्या कर्जाच्या नोंदी ठेवा – 

  • सिबिल स्कोअर हा मागील क्रेडिट व्यवहारांवर ठरत असतो. त्यामुळे जुन्या कर्जाच्या नोंदी जपून ठेवणे सिबिल स्कोअरसाठी चांगले असते. 
  • तुम्ही जुने अकाउंट चालवत नसले तरी त्यांना सक्रिय ठेवणे गरजेचे असते. तुम्ही जुना कर्जाचा इतिहास जपून ठेवला तर त्याचा भविष्यात उपयोग होऊ शकतो. 

 

९. जास्तीत जास्त क्रेडिट घेणे उपयुक्त –

  • दरवेळी नवीन क्रेडिट कार्ड घेत असताना दरवेळी क्रेडिट रिपोर्ट मागितला जातो. ही एक अवघड पद्धती आहे. 
  • त्यामध्ये क्रेडिट प्रोफाईलचे कमी कालावधीत परीक्षण केले जाते. त्यामुळे तुमच्या क्रेडिट स्कोअरवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. 

 

१०. सातत्य टिकवून ठेवा –

  • कमी कालावधीत सिबिल स्कोअर हा कधीच वाढत नसतो. त्यासाठी जास्त काळ सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करावी लागते. 
  • सिबिल स्कोअर वाढवत असताना संयम बाळगायला हवा. सातत्यपूर्ण प्रयत्न आणि योग्य कृती करून सिबिल स्कोअर वाढू शकतो. 

नक्की वाचा : क्रेडिट कार्ड फायदे आणि तोटे 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.

व्यवसाय कर्ज घेऊन आपण यशस्वी स्वप्ने कशी पूर्ण करू शकतो?

Reading Time: 3 minutes उद्योजकता हा भारताच्या आर्थिक विकासातील महत्वाचा घटक आहे. देशातील उद्योग धंदे वाढीस…