PPF: सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी लोकप्रिय का आहे?

Reading Time: 3 minutes सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (PPF) हा भारतातील सर्वात लोकप्रिय गुंतवणूक पर्यायांपैकी एक आहे. म्युच्युअल फंड, शेअर बाजार यासारखे आधुनिक गुंतवणूक पर्याय लोकप्रियतेचं शिखर गाठत असताना पीपीएफ सारखी सरकारी योजनाही तितकीच लोकप्रिय आहे. हा पर्याय एवढा लोकप्रिय का आहे, याबद्दल  सविस्तर माहिती आपण आजच्या लेखात घेऊया. 

CBDC: सेन्ट्रल बँक डिजिटल करन्सीच्या निर्मितीसंदर्भात काही महत्वाच्या गोष्टी

Reading Time: 3 minutes क्रेप्टोकरन्सी संबंधात सरकारने यापूर्वी धरसोड वृत्ती दाखवली असून आता याबाबत निश्चित काय धोरण असेल ते समजण्यास मार्ग नाही. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी, सरकार क्रेप्टो करन्सीजवर बंदी आणणार नाही, परंतू त्याचे नियमन करणारा कायदा आणेल असे या वर्षाच्या सुरुवातीला म्हटले आहे. सर्वात अलीकडे यासंदर्भातील वक्तव्य भारतीय रिजर्व बँकेचे उप गव्हर्नर टी रबीशंकर यांच्याकडून 22 जुले 2021 रोजी पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले आहे.

DICGC: बँक बुडाल्यास बँकेच्या ठेवीदारांना 90 दिवसांत पैसे परत -या बातमीमागील सत्य आणि तथ्य

Reading Time: 2 minutes तोट्यात चाललेल्या बँका ही सरकार आणि रिझर्व बँक याच्यापुढील मोठी डोकेदुखी आहे. यावर नियंत्रण ठेवणारी रिझर्व बँक आपली जबाबदारी पार पाडण्यास कुठेतरी निश्चितच कमी पडते. यात सरकारी बँकांना राजकीय  कारणाने का होईना मदत करायला कोणतेही सरकार कायम तयार असते. त्यामुळे या बँका सक्षम होण्याऐवजी कायमच्या अपंग झाल्या आहेत. आता अशा बँकांच्या अनुत्पादित मालमत्ता वेगळ्या बँकेकडे हस्तांतर करण्याची बॅड बँक नावाची नवीनच योजना आहे. अशी मलमपट्टी किती दिवस केली जाईल माहिती नाही. 

Mutual Fund Terms: म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणुक करण्यापूर्वी समजून घ्या या ५ महत्वाच्या संकल्पना

Reading Time: 3 minutes आजच्या लेखात आपण म्युच्युअल फंडाच्या ५ मूलभूत संकल्पनांबद्दल (Mutual Fund Terms) माहिती घेऊया. गेल्या काही वर्षात म्युच्युअल फंड गुंतवणुकीकडे सामान्य गुंतवणूकदारांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. परंतु, बहुतांश व्यक्तींना म्युच्युअल फंडाच्या मूलभूत संकल्पनांबद्दल माहिती नसते. कोणतीही गुंतवणूक करताना त्याबद्दल संपूर्ण माहिती घेणं आवश्यक आहे.

FAANG: गुंतवणूकदार होण्याआधी ‘FAANG’ बद्दल समजून घ्या

Reading Time: 4 minutes ‘एक चुटकी सिंदूर की किमत ….’कडे थोडं दुर्लक्ष झालं तरी चालेल पण आपणास ‘FAANG’ बद्दल माहिती नसेल तर अवघड आहे बघा. आपण गुंतवणूकदार किंवा अर्थशास्त्राची थोडीबहुत जाण असणारे असाल आणि ‘FAANG’ बद्दल माहिती नसेल तर ते जगातलं आठवं आश्चर्य म्हणावं लागेल. हे ‘FAANG’ नेमकं  काय आहे  की ज्याची किंमत रमेशबाबूच नव्हे तर आपल्या सर्वाना वेळीच लक्षात यायला हवी ?

Glenmark Life Sciences IPO – “ग्लेन्मार्क लाईफ सायन्स आयपीओ” पैसे कमावण्याची सुवर्णसंधी असू शकेल?

Reading Time: 3 minutes “ग्लेन्मार्क कंपनीचा आयपीओ येतोय(Glenmark Life Sciences IPO)” ही खबर सध्या स्टॉक मार्केट मध्ये खूप चर्चेत आहे. भारतात औषध तयार करणारी सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक कंपनी सामान्य जनतेचा भाग होऊ पाहत आहे, त्यामुळे चर्चा तर होणारच…

PMJJBM Scheme: केवळ रु. ३३० भरून मिळावा २ लाख रुपयांचे विमा संरक्षण

Reading Time: 2 minutes सर्वसामान्य जनतेसाठी विशेष करून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी माफक दरात जीवन विमा योजना उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने विविध योजना राबविल्या आहेत. यापैकी जीवनविम्यासाठी तयार केलेली योजना म्हणजे ‘जीवन ज्योती विमा योजना’. 

HRA & Home Loan: घरभाडे भत्ता व गृहकर्ज- एकाचवेळी दोन्हींसाठी करसवलत घेता येईल का?

Reading Time: 3 minutes करदात्यांच्या मनात नेहमी येणार प्रश्न म्हणजे घरभाडे भत्ता व गृहकर्ज (HRA & Home Loan) या दोन्हींवर एकाचवेळी करसवलत घेता येतील का?

Trading Strategies: ट्रेडिंग आणि त्याचे प्रकार 

Reading Time: 2 minutes शेअर बाजारामधील शेअर्स, बॉण्डस, युनिट, इंव्हीट, रिट्स यांचे तसेच त्यांचे वेगवेगळे इंडेक्स त्यातील एफएनओचे (FNO) व्यवहार पूर्ण करण्याच्या क्रियेला ट्रेडिंग म्हटले जाते. तरीही तांत्रिक विश्लेषणाच्या सहाय्याने जे व्यवहार केले जातात त्यांना ट्रेडर्स म्हणतात. गुंतवणूकदार अशा ट्रेडर्सना कमी दर्जाची वागणूक देतात.