TDS
Reading Time: 2 minutes

टीडीएस (TDS)

टीडीएस (TDS) ही आयकर खात्याने यासाठीच सुरू केलेली एक प्रणाली आहे. हिच्यामुळे सरकारच्या तिजोरीत वेळच्या वेळी कर जमा होतो. या प्रणालीमुळे प्रत्यक्ष कर गोळा करणे सरकारला सोपे जाते.

विशालला त्या दिवशी पेन्सिल चा बॉक्स हवा होता. दुसऱ्या दिवशी शाळेत वापरायला एकही पेन्सिल त्याच्याकडे आता उरली नव्हती. पण बाबा तर ऑफिसमधून अजून यायचे होते. म्हणून मग विशालच्या आईने त्याला घरच्या एका खास कप्प्यातून ५० रुपये आणून दिले. काय होता हा खास कप्पा ?

दर महिन्याला बाबा विशालच्या आईला घरखर्चासाठी, भाजीपाला- फळफळावळ यासाठी काही रुपये द्यायचे. विशालच्या ताई आणि दादाला सुद्धा हातखर्चासाठी काही रुपये द्यायचे. पण विशाल च्या घरी एक नियम होता. बाबांनी दिलेल्या पैशातील १०% पैसे सगळेजण ‘त्या’ खास कप्प्यात आधी जमा करत, त्यानंतरच उरलेले पैसे खर्च करत. कोणत्याही अधिकच्या खर्चासाठी आई ते पैसे वापरत असे.

असेच अनेक खर्च एखाद्या देशाच्या सरकारला देशासाठी करायचे असतात. त्यासाठी सरकारच्या तिजोरीत काही पैसे प्रत्यक्ष जमा व्हावे लागतात. त्यासाठी सरकार नागरिकांकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर (Direct-Indirect Taxes) गोळा करत असते. सरकारसाठी/ सरकारच्या अर्थ खात्यासाठी हे कर गोळा करण्याचे काम आयकर खाते (Income Tax Department) करते.

विशेष लेख: फॉर्म २६ बद्दल माहिती आणि त्याचे महत्व

काय आहे टीडीएस (TDS) ?

  • टीडीएस म्हणजे  Tax Deducted at Source. इथे Source म्हणजे उत्पन्नाचा स्रोत आणि Tax Deducted म्हणजे या स्त्रोतामधील कर कपात.
  • उत्पन्नाच्या स्रोतावरच जेव्हा कर कापला जातो (deduct केला जातो) तेव्हा त्याला TDS असं म्हणतात. म्हणजे उत्पन्न जिथून मिळणार आहे, तिथेच हा कर एकूण उत्पन्नाच्या रकमेतून कापला जातो आणि उत्पन्नाची उरलेली रक्कम हातात मिळते. हा कापला गेलेला कर सरळ सरकार दरबारी जमा होते.
  • याचाच अर्थ उत्पन्न म्हणून जो पैसे देणारा आहे, त्याने करापोटी ठराविक रक्कम कापून घ्यायची आणि मगच उरलेली उत्पन्न रक्कम द्यायची. कापून घेतलेली रक्कम तपशिलासह सरकार कडे कर म्हणून जमा करायची. याला म्हणतात टीडीएस (TDS) .

हे नक्की वाचा: आयकर विवरणपत्र भरताना आपले हे उत्पन्न विसरू नका 

टीडीएस (TDS) कशावर कापतात?

  • एखादा नागरिक वा संस्था यांना उत्पन्न मिळण्याचे काही मार्ग असतात. ते उत्पन्नाचे स्रोत वेगवेगळे असू शकतात.
    • वेतन (salary)
    • कमिशन
    • व्यावसायिक मूल्य (Professional fees)
    • ठेवींवरील व्याज (Interest on deposit)
    • भाडे (Rent) इ.
  • एखाद्या कंपनीत, कार्यालयात काम करणाऱ्यांना तिथले मालक पगार/ वेतन देतात. बँकेत ठेवलेल्या आवर्ती वा मुदत ठेवींवर बँक व्याज देते. एखादी कंपनी वा व्यावसायिक त्यांच्या सीएला फी देतात. अशा विविध प्रकारच्या उत्पन्नावर आयकर लागू होतो.
  • उदाहरणादाखल आपण बँकेतल्या ठेवींचा विचार करू. बँकेत आपण ठेवींच्या रुपात आपले पैसे काही कालावधीसाठी जमा करून ठेवतो. म्हणून बँक त्या पैशांवर आपल्याला व्याज म्हणून काही रक्कम देते. ठरलेल्या अवधीनंतर जेव्हा आपले पैसे आपण बँकेतून परत घेतो, तेव्हा आपले पैसे (मुद्दल) आणि त्यावरील व्याज अशी रक्कम बँक आपल्याला परतावा म्हणून देणार असते. यामधील व्याजाची रक्कम म्हणजे आपल्याला बँकेकडून मिळालेले एक प्रकारचे उत्पन्नच असते म्हणूनच या व्याजावर सरकार कर आकारते. (कर केवळ व्याजाच्या रकमेवर आकारला जातो, आपल्या मुद्दलच्या रकमेवर भरावा लागत नाही).
  • बँक परताव्याची रक्कम आपल्याला देणार, मग त्यावरील व्याज किती आहे ते पाहून आपल्याला त्यावरील कर किती हे आकडेमोड करून काढावा लागणार आणि तेवढी रक्कम कर म्हणून आपण आयकर खात्याकडे भरणार.. हे एवढं सगळं करायच्या ऐवजी टीडीएस प्रणालीमुळे आपलं काम सोपं होतं.
  • कसं… ? तर, आपल्याला मिळणारं व्याज किती आहे? त्यावर कर किती भरावा लागेल? ही सगळी आकडेमोड बँकेतच केली जाते. जेवढा कर आपण भरायला हवा असेल तेवढी रक्कम आपल्या परताव्याच्या रकमेतून कापून घेऊन उर्वरित रक्कम बँक आपल्याला देते. ही कापून घेतलेली कराची रक्कम बँक सरकारकडे जमा करते म्हणजे आपल्या नावाने, आपण भरावयाचा कर बँक आयकर खात्यामध्ये जमा करते.
  • इथे व्याज हे आपले उत्पन्न, ते देणारी बँक हा उत्पन्नाचा स्रोत. या स्रोताच्या ठिकाणीच कर कापला जातो. कराची रक्कम वगळूनच उत्पन्न आपल्या हातात येत. हीच ती टीडीएस प्रणाली.

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web search: TDS in marathi, TDS Marathi Mahiti, TDS Marathi

Share this article on :
1 comment
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

आयकर विभागाची नोटीस आली आहे? घाबरू नका, आधी हे वाचा

Reading Time: 4 minutesटॅक्स, टॅक्स रिटर्न हे शब्द जरी ऐकले तरी करदाता काहीसा नाराज होतो. त्यात जर का आयकर विभागाकडून कुठली नोटीस आली तर ही नाराजी भीतीमध्ये बदलते. आयकर विभागाकडून आलेल्या कोणत्याही नोटीसमुळे अथवा पत्रामुळे करदाते घाबरून जातात. तथापि, कलम १४३(१) सूचना म्हणजे काळजी करण्याची गरज नाही. या लेखात आम्ही कलम १४३(१) च्या अंतर्गत पाठविलेल्या सूचनांबद्दल तपशीलवार चर्चा करणार आहोत जेणेकरून करदात्यांना याबद्दलची संपूर्ण माहिती मिळेल.

नव्या कॅलेंडर वर्षातील महत्वाच्या तारखा (सन 2024)

Reading Time: 4 minutes1 जानेवारी 2024 ला नवे कॅलेंडर वर्ष सुरू होईल. सध्या चालू असलेल्या…

मार्चएंड पूर्वी आयकरासंबंधित करायच्या १५ महत्त्वाच्या गोष्टी

Reading Time: 2 minutesअर्जुन: कृष्णा, हा आर्थिक वर्ष २०१७-१८ चा शेवटचा महिना चालू आहे. सगळीकडे…

PAN Card: पॅन कार्ड विषयी सर्व काही

Reading Time: 3 minutesपॅन कार्ड हे महत्वाच्या दस्तऐवजांपैकी एक आहे.  अगदी बँक खाते उघडण्यापासून प्रत्येक गोष्टीसाठी पॅन कार्ड अनिवार्य आहे. तुम्ही करदाते (Tax payer) असाल किंवा नसाल, पण तुमच्याकडे तुमचे स्वतःचे पॅनकार्ड असणे अनिवार्य आहे. या लेखात आपण पॅन कार्डबद्दलची विस्तृत माहिती घेणार आहोत.