काय आहे पोस्ट ऑफिस पीपीएफ योजना?
Reading Time: 3 minutes कोणीही व्यक्ती आयुष्यभर कमाई कशी करू शकेल? म्हणूनच कमवत असतानाच आपल्या स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबाच्या भविष्याची तरतूद आपण करायला हवी.यासाठी बाजारात अनेक बचत व गुंतवणूक योजना उपलब्ध असल्याचं आपल्याला दिसतं. अशा अनेक योजनांपैकी कोणती निवडावी? तर ती निवड सजगतेने करायला हवी.कारण आपल्या मेहनतीचा पैसा आपण गुंतवणार असतो. अशा सगळ्या योजनांमध्ये सर्वात खात्रीशीर म्हणता येतात, भारतीय टपाल खात्याच्या काही योजना. अशापैकीच एक आहे PPF योजना अर्थात सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी योजना.