Reading Time: 2 minutes

भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि आरोग्य संदर्भातील आर्थिक आणि कल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचायला हवी. खाली दिलेल्या योजनांची माहिती समजून घेऊयात. 

 

१. बेटी बचाओ, बेटी पढाओ Beti Bachao Beti Padhao – 

  • ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ ही केंद्र सरकारची योजना असून तिचा देशभरातील मुलींना फायदा घेता येतो. या योजनेचा प्राथमिक उद्देश हा सामाजिक समस्यांपासून मुलींचा बचाव करणे आणि लिंग आधारित गर्भपाताला आळा घालणे आहे.
  • मुलींचा कमी जन्मदर असलेल्या जिल्ह्यांमध्ये या योजनेचा सुरुवातीला प्रारंभ करण्यात आला होता आणि हळूहळू तिचा विस्तार वाढवण्यात आला. बेटी बचाओ बेटी पढाओ’’ हा सामाजिक दृष्टीकोन बदलायला भाग पाडणारा शैक्षणिक कार्यक्रम आहे. 

 

या योजनेचे प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे आहेत – 

  • महिला भ्रूणहत्या आणि गर्भपाताला प्रतिबंधित करणे. 
  • बाळाच्या आरोग्याची काळजी घेणे. 
  • लैंगिक समानतेचे समर्थन करणे. 
  • मुलींच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार करणे. 
  • मुलींच्या वारसा हक्काचे रक्षण करणे. 

 

नक्की वाचा : मुलींचे भविष्य अधिक सुखकर करणारी सुकन्या समृद्धी योजना 

 

२. सुकन्या समृद्धी योजना Sukanya Samruddhi Yojana

  • सुकन्या समृद्धी योजना भारत सरकारतर्फे राबवली जाते. मुलींच्या उज्वल भविष्यासाठी पैशांची बचत करता यावी म्हणून सुकन्या समृद्धी योजनेला ओळखले जाते. पालकांना मुलींचे शिक्षण आणि लग्नासाठी सुकन्या समृद्धी योजनेच्या माध्यमातून पैशांची बचत करता येते. 
  • १० वर्षाखाली असलेल्या मुलींचे पालक बँकेत अकाउंट उघडू शकतात. एका मुलीसाठी एकच अकाउंट उघडता येते. हे अकाउंट भारतातील कोणत्याही पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन उघडता येते. 

 

सुकन्या समृद्धी योजनेची रचना खालील प्रमाणे करण्यात आली आहे. 

  • बचत खात्याची रचना मुलींच्या पालकांसाठी तयार करण्यात आली आहे. 
  • या योजनेच्या माध्यमातून मुलींच्या शिक्षणासाठी पैशांची बचत करता येते. 
  • एक वर्षात कमीत कमी २५० रुपयांपासून १.५ लाख रुपयांपर्यंतची रक्कम आपण या खात्यात ठेवू शकता. 
  • या खात्यात जमा केलेल्या आणि काढलेल्या रकमेवर कर सवलत उपलब्ध आहे. 
  • खात्याचा कालावधी जास्तीत जास्त २१ वर्षांचा असतो. 
  • मुलगी १८ वर्षांची झाली की ५० टक्के रक्कम खात्यामधून काढून घेऊ शकता. 
  • आपण जवळच्या पोस्ट ऑफिस आणि सरकारी किंवा खाजगी बँकेत मध्ये जाऊन तुम्ही अकाउंट उघडू शकता. 
  • कॅश, चेक, डीडी किंवा ऑनलाईन ट्रान्सफर पैसे भरून खाते उघडता येते. 

 

३. बालिका समृद्धी योजना Balika Samruddhi Yojna – 

सुकन्या समृद्धी योजनेसारखीच बालिका समृद्धी ही योजना आहे. या योजनेमध्ये मुलीच्या पालकांसाठी पैसे बचतीच्या कमी संधी आहेत. 

  • बालिका समृद्धी योजना मुलीचा जन्म झाल्यानंतर तिच्या नावाने चालू करता येते. 
  • जन्मलेल्या मुलीला ५०० रुपये देण्यात येतात. 
  • शाळेत जाणाऱ्या मुलीला ३०० ते १००० रुपयांची स्कॉलरशिप १० वी पर्यंत दिली जाते. 
  • बालिका समृद्धी योजनेत १० वर्ष पूर्ण होईपर्यंत सहभागी होता येते. 
  • एखादे कुटुंब त्यांच्या २ मुलींसाठी या योजनेत सहभागी होऊ शकते. 
  • ठेवीदार हा दारिद्रयरेषेखालील असणे आवश्यक आहे. 
  • आपण जवळील बँकेशी संपर्क करून बालिका समृद्धी योजनेचे खाते उघडू शकता. 

 

४. माझी कन्या भाग्यश्री योजना Mazi Kanya Bhagyashree Yojna  –

 माझी कन्या भाग्यश्री योजनेमुळे खालील फायदे मिळतात. 

  • आईला मुलीच्या जन्मानंतर पहिल्या ५ वर्षांसाठी ५००० रुपये दिले जातात. 
  • मुलगी ५ व्या इयत्तेत गेल्यानंतर तिला वर्षाला २५०० रुपये दिले जातात. 
  • त्यानंतर १२ वी इयत्तेत गेल्यानंतर मुलीला ३००० रुपये दिले जातात. 
  • वयाच्या १८ वर्षानंतर मुलीला तिच्या शिक्षणासाठी वर्षाला १ लाख रुपये दिले जातात. 
  • महाराष्ट्र राज्यात राहणाऱ्या मुलींना या योजनेचा लाभ घेता येईल. 
  • दारिद्रयरेषेखालील घरात मुलीचा जन्म झालेला असावा. 

नक्की वाचा : प्रधानमंत्री मुद्रा योजना

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.

Franchise Business: फ्रेंचाइजी व्यवसाय कसा सुरु कराल?

Reading Time: 3 minutes कुठलाही व्यवसाय सुरू करताना सर्वात आधी, “तुम्हाला कशाची आवड आहे”, हे लक्षात घ्या. कोणते काम तुम्ही न थकता करू शकता याचा विचार करा. अर्थात सगळं काही तुम्हाला करावं लागत नाही. एखादे दुकान किंवा तो व्यवसाय चालवताना आपण त्या व्यवसायाचे स्वतः: मालक असतो. तेव्हा आपण वस्तूंची सेवा देण्यासाठी कामगारांची नेमणूक करू शकतो. फ्रेंचाइजी व्यवसाय चालविणे किंवा सुरु करणे सुरूवातीला सोपे वाटू शकते, पण ते यशस्वी होण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागतात. 

खाजगी कौटुंबिक न्यास

Reading Time: 3 minutes आर्थिक नियोजनाच्या बाबतीत करबचत Tax Savings करण्याचे जे मार्ग आहेत त्यात हिंदू…