Reading Time: 3 minutes

MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील MRF ही एक अग्रगण्य कंपनी आहे. शेअर बाजारात सगळ्यात जास्त किमतीला MRFचा शेअर विकला जातो. सध्या हा शेअर ऐंशी हजाराच्या आसपास खरेदीसाठी उपलब्ध आहे. (MRF Share Price Marathi)

गेल्या वर्षभरात सर्वात कमी बाजारभाव ₹ 63,000 इतका होता तर सर्वोच्च भाव ₹ 93,000 इतका होता. भारतीय शेअर बाजारात सर्वात जास्त मार्केट कॅपिटल असणारी कंपनी मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज आहे. लक्षात घ्या गेल्या आठवड्यत रिलायन्सचे मार्केट कॅपिटल ₹ 16.93 लाख कोटी इतके आहे तर एमआरएफचे मार्केट कॅपिटल ₹ 36,000 कोटी इतके आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की जवळपास 50 पट मोठ्या रिलायन्स पेक्षा एमआरएफची शेअर प्राईज का जास्त आहे? याच प्रश्नाचे उत्तर या लेखातून द्यायचा प्रयत्न आम्ही करणार आहोत.  

MRF कंपनीची माहिती – 

 • MRF म्हणजे मद्रास रबर फॅक्टरी ! अमेरिकेला टायर निर्यात करणारी भारतातील पहिली कंपनी बनण्याचा मान MRF कंपनीने 1967 साली मिळवला होता. 
 • कंपनीचे संस्थापक के. एम.मामेन मपपिल्लई यांनी 1946 साली टॉय बलून बनवण्यापासून या कंपनीची सुरुवात केली होती. त्या नंतर टायर बनवणे आणि रबरापासून इतर वस्तूही तयार केल्या गेल्या. त्यामध्ये क्रिकेटसाठी बॅटही बनवण्यात आली होती. 
 • इतर यशस्वी भारतीय कंपन्यांप्रमाणेच MRF कंपनीची सुरुवात लहान स्वरूपात झाली असली तरी भारतातील मोठ्या कंपन्यांमध्ये ती विराजमान झालेली आहे. 

 

 

 

MRF शेअर्स मधील गुंतवणूक – 

 • MRF कंपनी जेव्हा शेअर्स बाजारात लिस्ट झाली तेव्हा प्रति शेअर किंमत केवळ ₹11 होती. 1999 मध्ये तीच किंमत ₹1900 पर्यंत पोहोचली होती. 
 • MRF कंपनीचा एक शेअर्स 10 वर्षांपूर्वी ₹10,000 च्या आसपास खरेदीसाठी उपलब्ध होता. तेव्हा एखाद्या गुंतवणूकदाराने 5 शेअर्स घेतले असते तर आज त्याचे मूल्य तब्बल ₹4.20 इतके झाले असते. MRF ने गेल्या दहा वर्षात अशाप्रकारे दरसाल 24% दराने परतावा दिला आहे. 

हे ही वाचा : मल्टीबॅगर स्टॉक म्हणजे काय?

एवढा नफा !

 • तुम्ही विचारात पडले असाल की MRF चा शेअर्सने चांगला परतावा दिला आहे. काही वर्षांपूर्वीसुद्धा हा शेअर लोकांना जास्त किमतीचा म्हणून महाग आहे वाटत असे.  मात्र कंपनीचा विस्तार, प्रगती होत गेल्याने शेअरच्या किमती वाढत गेल्या.
 • शेअरची जास्त किंमत म्हणजे तो शेअर महागडा आहे असे वाटणे ही बहुसंख्य गुंतवणूकदरांची पहिली चूक असते. याउलट फक्त बाजारभाव कमी आहे म्हणून एखादा शेअर्स स्वस्त आहे का असं म्हणायचं का? 
 • MRF च्या शेअर्सची किंमत एवढी जास्त का आहे आपण त्याबद्दल अधिक माहिती पुढील मुद्द्यांच्या आधारे अभ्यासू – 
 1. शेअर्स विभाजन
 • शेअर्स विभाजन हे नवीन गुंतवणूकदारांना कंपनी मध्ये गुंतवणूक करायला प्रोत्साहन देते. 
 • MRF कंपनीने आजपर्यंत शेअर्स विभाजन केले नाही कारण शेअर्स विभाजनामुळे शेअर्सचा बाजारभाव कमी होतो.बाजारभाव कमी झाल्यामुळे सामान्य माणसाला शेअर्स घेणे सोपे होते. साहजिकच बाजारामधील लिक्विडिटी वाढते. 
 • MRF ने मात्र कधीच बोनस शेअर्स दिले नाही आणि शेअर्स विभाजन केले नाही. त्यामुळे शेअर्स्स्सची किंमत कमी न होता वाढत गेलेली दिसते.

 

 1. नावाजलेली कंपनी
 • MRF कंपनी भारतामध्ये 50 वर्षापेक्षा जास्त काळ झाला स्थिरावलेली आहे. 
 • लोकांचा MRF च्या उत्पादनांवर विश्वास आहे. 
 • कंपनी नेहमीच चांगल्या सुविधा देत राहील आणि नवनवीन उत्पादने बाजारात येत राहतील हा लोकांचा कंपनीच्या ब्रँडवरचा प्रगाढ विश्वास कंपनीचा आलेख वाढविण्यास मदत करतो.
 • नव्याने MRF मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना चांगल्या परताव्याची हमी वाटते.त्यामुळे शेअर्सचे  मूल्य वाढत जाते.

 

 1. ग्रोथ रेट आणि  डेट फ्री :
 • MRF चा ग्रोथ रेट वर्षानुवर्षे वाढत आला आहे, प्रॉफिट मार्जिन चांगले आहे,त्यामुळे गुंतवणूकदार शेअर्स बाजारभाव जास्त असूनही गुंतवणूक करण्यास तयार असतात. 
 • कुठल्याही प्रकारचे कर्ज नसणारी कंपनी ही आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आहे, हे कंपनी आणि गुंतवणूकदार दोघांसाठी खूप महत्वाचे  असते.   

महत्वाचे  : ग्रोथ शेअर्स आणि व्हॅल्यूशेअर्स म्हणजे काय?

 

 1. दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार : 
 • MRF चा बाजारभाव हा त्याच इंडस्ट्री मधल्या इतर शेअर्सच्या बाजार भावाच्या तुलनेत जास्त असला तरी लोक का त्यात गुंतवणूक करत आहेत असाही प्रश्न अनेकांना असतो. उदा-  बालकृष्ण इंडस्ट्रीज,अपोलो टायर,JK टायर इ. 
 • MRF मध्ये गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार हे छोट्या कालावधीसाठी गुंतवणूक करणारे नाही,त्यामुळे शेअर्स च्या बाजारभावामध्ये चढ उतार पाहायला मिळत नाही किंवा तुलनेने कमी पाहायला मिळतात. 
 • कंपनीचे प्रवर्तक शेअर्स मध्ये दीर्घकालीन गुंतवणूक कशी होईल आणि कंपनीचा दर्जा कायम राखला जाईल यासाठी प्रयत्नशील असतात .

 

 1. कंपनीद्वारे दिला जाणारा डिव्हीडंड : 
 • कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना त्यांच्या शेअर्सवर डिव्हीडंड म्हणजे नफ्यातला हिस्सा देत असते.  
 • कंपनी जितका जास्त नफा कमावते तितका डिव्हीडंड जास्त देते. त्यामुळे आपोआपच कंपनीच्या शेअरची किंमत वाढत जाते. या गोष्टीचा MRF शेअर्सच्या किमती वर सकारात्मक परिणाम होतो. 

 

निष्कर्ष

 • कुठलाही शेअर्सची किंमत जरी जास्त वाटली तरी तो महाग किंवा स्वस्त आहे या निष्कर्षावर येऊ नका. गुंतवणूक करण्याआधी तुम्ही काही गोष्टी व्यवस्थितपणे समजून घ्या.
 • गुंतवणूक करतांना आपले गुंतवलेले पैसे योग्य शेअर्स मध्ये गुंतवले आहेत का हे पहा.   
 • कंपनी किती खात्रीशीर आहे,कंपनीचा दर्जा, कंपनीचे व्यवस्थापन ह्या गोष्टी पाहाव्या. 
 • कंपनीचे उद्दिष्ट,ध्येय ,पुढील काही दशकं कंपनीचे नियोजन ह्या सगळ्या गोष्टींची  

पूर्तता करणाऱ्या शेअर्सला नेहमीच मागणी असते. 

 • कष्ट,चिकाटी,प्रामाणिकपणा,जिद्द याच्या जोरावर एक छोटी कंपनी आज जागतिक पातळीवर अग्रगण्य समजली जाते, याचे MRF हे एक ज्वलंत उदाहरण आहे.
Share this article on :
1 comment
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…

वॉरेन बफेट यांनी दिलेले गुंतवणूकीचे धडे !

Reading Time: 2 minutes अर्थविश्वातील गुंतवणूकीमधील बाराखडीचे गुरु म्हणजे वॉरेन बफेट यांचे नाव घेतले जाते. वॉरेन बफेट हे नाव, त्यांचे गुंतवणूकीचे ज्ञान आणि शेअर बाजारातील अनुभवांचे…