म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग १९
Reading Time: 2 minutes नमस्कार! ‘म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात’ या सदरात आज आपण जाणून घेणार आहोत, फंड मॅनेजमेंट शैली विषयी. चांगला फंड कसा निवडायचा हे आपण बऱ्याच वेळा फंडाची पूर्वीची कामगिरी पाहून ठरवतो. परंतु तो पुढेही तितकाच चांगला परतावा देईल हे खात्रीने नाही सांगता येत, अशावेळी काहीवेळा आपण त्याची सातत्यता किंवा कॉन्सिस्टंसी पाहतो. तसेच बाजाराच्या उताराच्या काळात फंड मॅनेजर ने कसा परतावा दिला आहे ते पाहतो.