लॉकडाऊनचे रिअल इस्टेटवर होणारे परिणाम
Reading Time: 8 minutes रिअल इस्टेट उद्योग हा अनाथासारखा आहे (कुणी “माय बाप” नाही) व याच्याशी संबंधित बहुतेक घटकांसाठी घरून काम करणे शक्य नाही; म्हणजे जोपर्यंत आपण व्हर्च्युअल घरे बांधून त्यात लोकांना व्हर्च्युअली राहायला सांगून त्याचे बिट-कॉईनमध्ये पैसे घेई पर्यंत तरी नक्कीच नाही! कोरोना विषाणू ज्या वेगानं पसरतोय त्याचं गांभीर्य मला समजतंय पण त्याचवेळी लॉकडाऊनमुळे गरीबांचा मानसिक व आर्थिक ताण वाढतोय (रिअल इस्टेट तसंच इतर सर्व उद्योगांमधल्या) या वस्तुस्थितीकडे आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही, एवढाच मुद्दा मला मांडायचा आहे.