बिल गेट्स आणि जेफ बीजोस भारतावर प्रसन्न का आहेत?

Reading Time: 3 minutesजगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मायक्रोसॉफ्टचे मालक बिल गेट्स आणि ॲमेझानचे मालक जेफ बीजोस भारतीय अर्थव्यवस्था, भारताची क्षमता आणि भारतातील संधी याविषयी प्रचंड आशावादी असताना आपला भारताच्या ‘ग्रोथ स्टोरी’वर विश्वास का नाही? ती ओळखण्यात आणि जागतिकीकरणाचा अपरिहार्य पुढील टप्पा स्वीकारण्यास आपण कमी पडत आहोत का ? 

शेअर बाजार: रिलायन्सचे वाढते बाजारमूल्य

Reading Time: 2 minutesरिलायन्स कंपनीच्या बाजारमुल्याने ( Market Capitalisation) आज दहा लाख कोटी (एकावर तेरा शुन्ये.. उगीच घोळ नको) रुपयांचा टप्पा पार करत एक नवा मैलाचा दगड गाठला. नऊ लाख ते दहा लाख हा टप्पा गाठायला फक्त ४० दिवसांचा आणि  २५ सत्रांचा अवधी लागला. म्हणजेच गेल्या महिनाभरांत कंपनीच्या शेअरने १०% च्या आसपास वाढ नोंदविली.

गृहकर्ज परतफेडीचे विविध पर्याय

Reading Time: 4 minutesआपल्या घरकुलाचे स्वप्न घेऊन अनेक जणांनी गेल्या आठवड्यात ‘बीकेसी’तील स्थावर मालमत्ता प्रदर्शनास भेट दिली. तिथे मुंबई ग्राहक पंचायतीने, ग्राहक जागृती आणि शिक्षणासाठी जे दालन सजवले होते, त्याचा लाभ अनेकांनी घेतला. प्रश्न विचारले समस्या सांगितल्या. मालमत्तेच्या किमती पाहता कर्जाशिवाय मालमत्ता खरेदी करणे जवळपास अशक्यच आहे. असे गृहकर्ज देणाऱ्या कंपन्या, बँका, एकसमान मासिक हप्त्याने कर्ज फेडण्याशिवाय कर्ज परतफेडीचे विविध पर्याय उपलब्ध करून देत आहेत त्यातील फरक आणि बारकावे समजले तर निर्णय घेण्यास मदत होऊ शकते. तेव्हा या पर्यायांचा तुलनात्मक आढावा घेण्याचा हा प्रयत्न.       

Mutual Fund: म्युच्युअल फंड बंद होऊ शकतो का?

Reading Time: 3 minutes“म्युच्युअल फंड बंद होऊ शकतो का?” ह्या प्रश्नाचे एका शब्दात उत्तर म्हणजे “नाही!!”. मात्र तरीही गुंतवणूकदारांच्या मनात बऱ्याच शंका असतात. आज आपण या विषयावर अधिक माहिती घेऊ. 

म्युच्युअल फंडाची कर प्रणाली किंवा टॅक्स इम्पलिकेशन्स

Reading Time: 2 minutesआज आपण जाणून घेणार आहोत म्युच्युअल फंडाची कर प्रणाली किंवा टॅक्स इम्पलिकेशन्स. म्युच्युअल फंडाच्या योजना प्रामुख्याने ३ प्रकारच्या असतात. डेट,  इक्विटी व हायब्रीड (Debt / Equity / Hybrid). 

व्यायाम का पैसा? तुम्ही काय निवडाल? 

Reading Time: 2 minutesपैसा आणि व्यायाम या दोन्ही गोष्टी एकमेकांवर काही प्रमाणात अवलंबून आहेत. साधारणतः जर पैसा आणि व्यायाम यापैकी कुठलीही एक गोष्ट निवडण्याचा विकल्प दिल्यास कुणीही पैसा निवडेल, कारण भौतिक गरजा पैशाशिवाय पूर्ण करणे अश्यक्य आहे. असे असले तरी  येल (Yale) आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठ मधील अहवालांमधून एक वेगळा निष्कर्ष समोर आला आहे. या अहवालनुसार पैशाच्या तुलनेत व्यायामामुळे माणूस जास्त आनंदी राहतो, आहे ना आश्चर्यकारक? शास्त्रज्ञांच्या मते, वर्षाला सुमारे १७,५०,००० रुपये कमावणाऱ्या व्यक्तीपेक्षा नियमित व्यायाम करणारी व्यक्ती जास्त आनंदी असते. 

बांधकाम व्यवसायाला,पॅकेजरूपी वेदनाशामक गोळी !

Reading Time: 6 minutesरिअल इस्टेट उद्योगासाठी (म्हणजे घर खरेदी करणाऱ्यांसाठी) २५,०००/- कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करून आपल्या सरकारनं रिअल इस्टेट उद्योगातील लोकांचं आयुष्य थोडसं सुकर व्हावं अशी इच्छा नक्कीच व्यक्त केली आहे. आता बरेच जण म्हणतील की, कोणत्या लोकांचं? ज्या बांधकाम व्यावसायिकांनी वर्षानुवर्षे या व्यवसायातून बक्कळ पैसा कमावला, त्यांना मदत का करायची? असा प्रश्न विचारला जाईल. बांधकाम व्यावसायिकांकडे बक्कळ (म्हणजे ढिगानं) पैसा असतो हे एक मिथक आहे, ज्यावर सामान्य माणसाचा ठाम विश्वास आहे. 

अर्थसाक्षर कथा – गुंतवणुकीचे मृगजळ

Reading Time: 4 minutes“अर्थसाक्षर कथा” या सदरामधील आजची कथा फसव्या योजनांच्या जाळ्यात अडकल्यामुळे एका हसत्या खेळत्या कुटुंबाला बसलेल्या लाखो रुपयांच्या भुर्दंडाची आहे.

बँक व्यवहार आणि तक्रार निवारण

Reading Time: 3 minutesबँकिंग व्यवसाय कसा चालतो, ते आपल्याला माहीत आहेच. जनतेकडून व्याजाने ठेवी स्वीकारून भांडवलाची जरुरी असलेल्या व्यक्ती आणि संस्था यांना अधिक व्याजाने देणे, हा कोणत्याही व्यापारी बँकेचा मुख्य व्यवसाय. या बँका सहकारी, सरकारी व खाजगी स्वरूपाच्या आहेत. तसेच, नव्याने अस्तित्वात आलेल्या पेमेंट बँक याही बँकांच असून रिझर्व बँकेचे त्यांच्यावर नियंत्रण आहे. मुख्य व्यवसायाशिवाय ग्राहकांना लॉकर पुरवणे, पैसे पाठवण्याची सोय उपलब्ध करून देणे, क्रेडिट कार्ड देणे, गुंतवणूक विमा यासंबंधी सेवा पुरवणे यासारखी अनेक कामे बँका करतात यातील काही सेवा विनामूल्य तर काही सेवा मूल्य आकारून देण्यात येतात. 

भारतातील अग्रगण्य कंपन्यांची माहिती -‘आयटीसी’ची यशोगाथा (भाग २)

Reading Time: 4 minutesभारतातील शेअर बाजारावर नोंद असलेल्या यशस्वी कंपन्यांमधली दादा कंपनी म्हणून “आयटीसी लिमिटेड” ओळखली जाते. हिंदीमध्ये आजोबांना “दादाजी” नावाने हाक मारतात. आयटीसी लिमिटेड मात्र भल्याभल्या कॉर्पोरेटर्ससाठी कर्तुत्वाबरोबरच वयाने सुद्धा दादाजी आहे. आयटीसीचा जन्म १९१० साली “इम्पेरियल टोबाको कंपनी” म्हणून कोलकाता येथे झाला. तेव्हा प्रमुख व्यवसाय तंबाखू आणि सिगारेट होता. ‘आयटीसी’ची यशोगाथा मागील भागावरून पुढे चालू-