जर्मन भाषा – का, कशी आणि कुठे?
Reading Time: 3 minutes जूनचा साधारण पहिला आठवडा म्हणजेच दहावी बारावीचा निकाल लागण्याची वेळ आणि असे प्रश्न घेऊन आम्हा परकीय भाषेच्या शिक्षकांना फोन यायची वेळ ही एकच असते. एखादी परकीय भाषा का शिकावी? या प्रश्नाला बरीच उत्तरं आहेत. पुण्यासारख्या विद्येच्या माहेरघरी तर जर्मनपासून अगदी मँडरीन भाषेपर्यंत सर्व भाषा शिकता येतात. मी या लेखात प्रामुख्याने जर्मन भाषा – का? कशी? कुठे? या तीन मुद्द्यांवर विस्तृत लिहिणार आहे म्हणजे वरील प्रश्नांची उत्तरं शोधायला सोपं जाईल.