‘गुगल पे’ च्या या सुविधांबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
Reading Time: 2 minutes सरकारच्या चलन बंदीच्या (demonetization) निर्णयानंतर देशात डिजिटल पेमेंट स्वीकारण्यात वाढ झाली. क्रेडिट आणि डेबिट कार्ड्सबरोबरच पेटीएम सारख्या मोबाइल वॉलेट आणि पेमेंट् लोक वापरू लागली.
‘तेझ’ चा बोलबाला गेल्या वर्षात याच मुळे वाढला. पण डिजिटल पेमेंट च्या या स्पर्धेत टिकण्यासाठी वेगवेगळ्या कंपन्या आपलं काहीतरी वैशिष्ट प्रस्तापित करण्याचा प्रयत्न करत आहेत. तेझ म्हणजेच सध्याच्या गुगल पे ने देखील आपल्या अॅपची खासियत म्हणून काही वैशिष्ट जाहीर केले आहेत. तुम्हाला त्याबद्दल माहित आहे? नाही? मग जाणून घ्या.