कार घेताय? थांबा… आधी हे वाचा
Reading Time: 3 minutes भारतामध्ये स्वतःची कार असणे हा प्रेस्टीज इशू असतो. घरात चार चाकीचा ऐरावत उभा असणे म्हणजे मोठेपणा मानला जातो. भारतीय लोक स्वतःच्या गाडीबद्दल, चारचाकी बद्दल, कारबद्दल, खूप भावनिक असतात. शेजाऱ्याने कार घेतली किंवा नातेवाईकांमध्ये कुणी कार घेतली की आपणसुद्धा कार घ्यायलाच हवी असं वाटतं. पण कार म्हणजे नक्की काय भानगड आहे? खरंच ती घ्यायला हवी का? आपण ती खरंच घेण्याच्या परिस्थितीत आहोत का? कार घेण्याचे फायदे व तोटे याचा विचार खोलात जाऊन प्रत्येक जण करत नाही.