रिअल इस्टेट – रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक न करण्याची ७ कारणे…
Reading Time: 3 minutes भारत हा शेतीप्रधान देश आहे. अर्थातच इथल्या प्रत्येकाची जमिनीशी नाळ जोडलेली असते. वडिलोपार्जित मिळालेली जमीन असो किंवा घर आधी आजोबांनी जपलेलं पुन्हा वडिलांनी त्यांच्या हयातीत पुढच्या पिढीसाठी राखून ठेवलेलं असतं, थोडक्यात काय तर घराचा संबंध भावनेशी जोडलेला असतो. साहजिकच आहे म्हणा, स्वत:च हक्काचं घर प्रत्येकाला हवं असतंच. भाड्याच्या घरात आपली हयात घालणारे मुलीचे वडील पैसा जमवून ठेवतात कारण त्यांना मुलीची पाठवणी त्यांच्या स्वत:च्या घरातूनच करायची असते. भाड्याच्या घरात राहण्यापेक्षा स्वत:च्या घरात रहायला आपल्याला नेहमीच आवडतं. त्या हक्काच्या घरात, आपण आणि आपलं कुटुंब राहत असल्याचं समाधान फार मोठं असतं. कारण त्यामागे आपले अनेक प्रयत्न आणि कष्ट असतात. पण हल्ली गुंतवणूकीचा पर्याय म्हणून आपण रिअल इस्टेट क्षेत्राकडे पाहत असल्यास, काही नुकसानकारक गोष्टींचा विचार करायला हवा.