Month: June 2021
25 posts
Rule of 4% – यशस्वी निवृत्तिनियोजसाठी ४% चा नियम
Reading Time: 3 minutes या भागात आपण “फायर लाइफस्टाइल” म्हणजेच जीवनशैली बद्दल माहिती घेऊया. निवृत्तीपश्चात आयुष्याची तरतूद करून आपण लवकरात लवकर निवृत्त होऊ शकतो का? आपण फायर जीवनशैली आचणरणात आणण्यात यशस्वी झालो आहोत, हे कसं समजू शकेल? यासाठी “फायर” तज्ज्ञ ४% चा नियम वापरतात. काय आहे ४% चा नियम?
F.I.R.E. Movement: निवृत्तीनंतरही आर्थिक स्वातंत्र्य देणारी फायर मुव्हमेंट
Reading Time: 2 minutes फायर मूव्हमेंट म्हणजे आपल्या भविष्याची आर्थिक तरतूद करून, सर्वसामान्य लोकांपेक्षा साधारणतः वीस वर्ष लवकर निवृत्त होणे. अर्थात ही काही अगदीच सोपी गोष्ट नाही. काही कमवायचे असेल तर, त्यासाठी काही ना काही गमवावे हे लागतेच. इथे तर तुम्हाला चक्क वीस वर्ष अगोदर आर्थिक स्वातंत्र्यासह निवृत्ती घ्यायची आहे. काटकसर आणि वेळ व पैशाचे योग्य नियोजन या गोष्टींना प्राधान्य देऊन तुम्हाला तुमचं निवृत्ती नियोजन करावं लागतं. जर तुम्ही तुमच्या ९ ते ६ च्या आयुष्याला, कंटाळवाण्या आफिस कामाला कंटाळले असाल, तर “फायर” तुमच्यासाठी संजीवनी प्रमाणे काम करू शकेल.
Compound Interest: चक्रवाढ व्याज – ज्याला समजलं, तो पैसे कमावतो; नाही तो गमावतो
Reading Time: 2 minutes वेळ आणि पैशाचं योग्य मूल्य जाणणारे आणि माणसाला पैसा आणि वेळ यांचं महत्व पटवून देणारे तत्व म्हणजे चक्रवाढ व्याज. खरं सांगायचं तर हे तत्व जसं फायदा करून देतं तसंच, खूप मोठ्या प्रमाणावर नुकसानही करून देतं. त्यामुळे चक्रवाढ व्याज आपला सर्वात चांगला मित्र किंवा आपला सर्वात वाईट शत्रू असू शकतो.
Credit Score: क्रेडिट स्कोअर चांगला असेल, तर त्याचा खरंच फायदा होतो का?
Reading Time: 2 minutes कर्जदायी संस्था कर्ज देताना एकाच गोष्टीची पुन्हा पुन्हा खात्री करून घेतात, ती म्हणजे अर्जदाराची आर्थिक विश्वासार्हता. कर्ज मान्य केल्यावर त्याची पूर्ण परतफेड होणार आहे का, आणि ती ठराविक वेळेत होणार आहे का ह्या दोन प्रश्नांची खात्रीशीर सकारात्मक उत्तरं मिळाल्याशिवाय कोणतीही संस्था ग्राहकाला कर्ज मान्य करताना दिसत नाही. आता ही उत्तरं बँकांना किंवा कर्जदायी संस्थांना कशी मिळतात? अर्थातच सिबिल कडून.
SIP Investment:“एसआयपी” गुंतवणूक करताना या ४ चुका टाळा
Reading Time: 2 minutes गुंतवणुकीच्या आधुनिक पर्यायांमध्ये म्युच्युअल फंडातील गुंतवणूक सुरक्षित मानली जाते कारण यामध्ये स्टॉक मार्केटसारखे सतत चढउतार, रिअल इस्टेट सारखी मोठी गुंतवणूक नसते. म्युच्युअल फंडात वार्षिक आणि मासिक पद्धतीने गुतंवणूक करता येते. सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच एसआयपी (SIP) हा सध्या अनेक गुंतवणूकदारांचा आवडता पर्याय आहे. मात्र यातून आपली आर्थिक उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी काही चुका टाळल्या पाहिजे.
जीडीपी (GDP): सकल राष्ट्रीय उत्पन म्हणजे काय?
Reading Time: 3 minutes आपलं रोज सकाळचं वर्तमानपत्र असो नाहीतर संध्याकाळच्या बातम्या; मुख्यत्वे दोनच महत्वाचे मुद्दे असतात, राजकीय पटलावरच्या घडामोडी आणि देशाची “सुधारणारी” नाहीतर “ढासळती” अर्थव्यवस्था. आणि अर्थविषयक बातम्यांमध्ये एक सतत कानावर पडणारा शब्द म्हणजे, जीडीपी! आजच्या लेखात आपण याच ठेवणीतल्या संज्ञेविषयी म्हणजेच सकल राष्ट्रीय उत्पन (GDP) बद्दल जाणून घेणार आहोत.
Hofstadter Law: दैनंदिन जीवनासोबत आर्थिक नियोजन करतानाही हॉफ्सटॅडर सिद्धांताचा विचार करा
Reading Time: 3 minutes मर्फीच्या सिद्धांताप्रमाणे, जर एखादी गोष्ट चुकीची घडणार असेल, तर ती घडतेच. थोडक्यात परिस्थितीच तशी होते. पण हॉफ्सटॅडरच्या म्हणण्यानुसार, “आपण योग्य नियोजन केलं, तर आपण निश्चितच योग्य वेळेत आपले ध्येय गाठून यशाचा आनंद घेऊ शकतो. “