महापूर आणि आयकर विवरणपत्रासाठीची (ITR) मुदतवाढ

Reading Time: 2 minutes ३१ ऑगस्ट २०१९ ही आयकर विवरणपत्र दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. परंतु सध्या ठिकठिकाणे आलेले महापूर आणि त्यामुळे विस्कळीत झालेले जनजीवन याचा विचार करता, किमान पूरग्रस्तांसाठी आयकर विवरणपत्र (ITR) भरून देण्यासाठी मुदतवाढ देणे आवश्यक होतं. सदर मुदत वाढवून देण्यासाठी कायदेशीर मागणीही करण्यात आली होती. परंतु त्याकडे सरकारकडून सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात आले आहे.

निवृत्तीपश्चात सुरक्षित मुद्दल आणि नियमित उत्पन्न देणाऱ्या योजना

Reading Time: 3 minutes गुंतवणुक करताना आपल्यासाठी प्राधान्यक्रम हा मुद्दलाची सुरक्षितता, रोखता आणि नियमित उत्पन्न अशा प्रकारे असतो. त्याशिवाय चलनवाढीला तोंड देण्यासाठी दीर्घकालीन गुंतवणूकदेखील करावी लागते आणि इन्कम टॅक्स देखील कमीत कमी बसेल हे पाहावे लागते. मात्र ‘आखूड शिंगी बहुदुधी’ अशी सर्वगुणसंपन्न गुंतवणूक योजना कुठलीच नसते. विविध प्रकारच्या गुंतवणूक पर्यायांमध्ये वेगवेगळे गुणधर्म असतात आणि त्यांची एकत्र मोट बांधून, पोर्टफोलिओ बनवून आपल्याला मार्ग काढावा लागतो. हे रिटायर्ड लोकांना माहिती असलेच पाहिजेत असे विविध गुंतवणूक पर्याय कुठले आणि त्यांचे गुणधर्म काय, हे आपण आज पाहू. मात्र प्रत्येक पर्यायात किती रक्कम गुंतवावी हा प्रत्येकाच्या परिस्थितीवर अवलंबून असेल.

ऋण व्याजदराने गृहकर्ज?

Reading Time: 2 minutes घरांच्या वाढलेल्या किमती आणि त्यावरील व्याज यामुळे घर घेणाऱ्याची सर्व मिळकत पणास लागते. आयुष्यातील उमेदीची वर्ष फक्त कर्ज फेडण्यासाठी खर्च होतात, इतर खर्चाना मुरड घालावी लागते. जरी हे कर्ज ८.५% दराने इतक्या कमी व्याजदराने घेतले तरी १ लाख रुपये कर्ज १० वर्षात फेडण्यासाठी साधारणत: दीड लाख, २० वर्षात २ लाख १० हजार तर, ३० वर्षात २ लाख ७५ हजार रुपयांची परतफेड करावी लागते. 

गृह विम्याच्या या पाच गोष्टी माहीती असायलाच हव्यात

Reading Time: 3 minutes नैसर्गिक आपत्ती कधीच कोणाला सांगून येत नाहीत. भूकंप,महापूर, वादळे, आग लागणे अशा नैसर्गिक आपत्तींच्या काळात स्वतःचा जीव सहीसलामत वाचणे हे महत्वाचे आहेच. सध्या महाराष्ट्रासह देशभरातील अनेक राज्यात महापूराने थैमान घातले आहे. धुवांधार पाऊस आणि नद्यांची वाढलेली पाणी पातळी यामुळे गावाच्या गाव महापूराच्या पाण्यात बुडाली आहेत. यामध्ये सर्वात जास्त आणि मोठे नुकसान झाले आहे ते राहत्या घरांचे. घरांची पडझड झाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. ही घरे पुन्हा नव्याने उभी करणे हे तर आव्हान आहेच पण अशा काळात घराचा उतरवणे ही सुद्धा काळाची गरज बनली आहे. 

कर्जमुक्त कसे व्हावे? – भाग ३

Reading Time: 4 minutes तुमची सगळ्यात जास्त काळजी घरातल्या सख्ख्या लोकांपेक्षा कर्ज देणाऱ्या सावकाराला असते. त्याचबरोबर कर्ज परतफेड करायची चिंता भरपूर कर्ज घेतलेल्यांना सुद्धा असते. आर्थिक स्वातंत्र्य प्राप्तीसाठी लवकरात लवकर कर्जमुक्त होणे आवश्यक आहे.  या कर्जमुक्तीच्या लेखमालेतील हा तिसरा लेख ! मागील भागापर्यंत आपण कर्जमुक्तीसाठी  एकूण ४ कृती बघीतल्या होत्या. आता या भागात कृती क्रमांक ५ व कृती क्रमांक ६ पाहूया.

म्युच्युअल फंड क्या है? – भाग १

Reading Time: 4 minutes शेअर घेऊ की रोखे की कमोडीटी घेऊ याचा गुंतवणूकदाराने विचार करण्यापेक्षा पात्रताधारक फंड व्यवस्थापक गोळा झालेल्या रकमेचे नियोजन करत असतात. वैयक्तिक गुंतवणूकदार म्युच्युअल फंडातील एकरकमी गुंतवणूक किमान १,००० रुपयांपासून तर मासिक गुंतवणूक किमान ५०० रुपयांपासून सुरु करू शकतो. काही फंड घराणी मासिक १०० रुपयांपासून देखील गुंतवणूकीची सुविधा देतात. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक रोकड सुलभ असून गरज पडल्यास विना थांबा तुम्ही काढू शकता. म्युच्युअल फंडा व्यतिरिक्त इतर गुंतवणूक साधनांमधे एकल जोखीम – एकल परतावा असे धोरण दिसून येते.

हिंदू अविभक्त कुटुंबाला (HUF) मिळणारे करलाभ

Reading Time: 4 minutes हिंदू अविभाज्य कुटुंब हे व्यक्ती पेक्षा वेगळे आहे हे मान्य करण्यात आले. पुढे सन १९६१ मध्ये आलेल्या आयकर कायद्याने त्याचे स्वतंत्र अस्तित्व मान्य करून त्याला व्यक्तिप्रमाणे सोई सवलती देण्याचे ठरवले. याचा फायदा अनेक लोक स्वतःचे हिंदू अविभक्त कुटुंब निर्माण करून आपली एकंदर करदेयता कमी करीत आहेत. यासाठी यातील कर्त्याला स्वताचे आणि ‘एचयुएफ’चे (HUF) असे वेगवेगळे विवरणपत्र (ITR) भरावे लागते.

निवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन

Reading Time: 3 minutes सेवानिवृत्तीपश्चात आपल्या आर्थिक समीकरणांमध्ये अमुलाग्र बदल होतो. आता आपली आर्थिक गुंतवणूक हाच मासिक उत्पन्नाचा स्रोत बनतो. त्यामुळे साहजिकच गुंतवणुकीकडे बघण्याचा दृष्टीकोन आणि आपली उद्दिष्टे पूर्णपणे बदलून जातात.