तुम्ही अर्थसाक्षरतेशी निगडीत एखाद्या किंवा अनेक विषयांचे तज्ञ आहात का? त्यांविषयी लिहायला आवडेल ? पुढीलपैकी एक (किंवा अनेक!) विषय निवडा आणि वेळ न दवडता अर्थसाक्षरकरिता लिहायला घ्या. डिजीटल अर्थजागृतीत सहभागी व्हा !

आपल्याला अर्थसाक्षर.कॉमचा भाग व्हायचे असल्यास आणि आमच्या संकेतस्थळावर लेख प्रकाशित करायचे असल्यास असे लेख आपण आम्हाला पाठवू शकता. आम्ही लेखकाचे योग्य श्रेय देऊन आपले लेख प्रकाशित करू. अर्थसाक्षर.कॉमवर लेख प्रकाशित करण्यासाठी लेखांचे स्वरूप आणि गुणवत्तेबाबत आमची पुढीलप्रमाणे मार्गदर्शक तत्त्वे आहेत.

सुरूवात करताना-

  • लेखांच्या अपेक्षेबद्दल कल्पना येण्यासाठी तुम्ही अर्थसाक्षर.कॉमवर यापूर्वी प्रकाशित झालेले लेख वाचू शकता.
  • लेखनात विषयासंदर्भातील प्रात्यक्षिक किंवा व्यावहारिक दाखले दिल्यास वाचकांना समजण्यास सोपे जाते.
  • अर्थसाक्षरता हे आमचे ध्येय आहे. आपल्या यासंबंधित ज्ञानाचा व कौशल्याचा उपयोग करून अर्थसाक्षर.कॉमला वास्तविक आणि योग्य माहितीचा प्रसार करण्यासाठी मदत करा.
  • आपले मत व्यक्त करण्यास घाबरू नका. तथापि, राजकीय पक्ष, नेते आणि इतर संघटनांविषयी आपले मत व्यक्त करण्याचे हे व्यासपीठ नाही.
  • आपले लेख पाठवताना आपण मदत घेतलेल्या सर्व स्त्रोत म्हणजे संकेतस्थळांचा व पुस्तकांचा उल्लेख करायला विसरू नका. लेखाबरोबर आपण वापरलेल्या माहितीचे व चित्रांचे सर्व दुवे (यु.आर.एल.) पाठवण्यास विसरू नका. स्त्रोतांना प्रामाणिकपणे श्रेय बहाल करणे महत्त्वपूर्ण आहे.
  • आपले लेख सुस्पष्ट, वास्तविक आणि मुद्देसूद असू द्या.
  • अर्थसाक्षर.कॉम वर आपले मूळ आणि अभिनव लेख प्रकाशित करण्यासाठी आपले लेख येथे पाठवा: – [email protected]

 

अर्जाची रचना
आपला लेख लवकरात लवकर प्रकाशित व्हायला आमची मदत करण्यासाठी आपण खालील गोष्टी लक्षात ठेवू शकता

  • लेखांची लांबी – लेख साधारणपणे 2500 ते 4000 शब्दांचा असावा. (अपवादः यापेक्षा दीर्घ लेख त्या विषयाची गरज असल्यास प्रकाशित केले जाऊ शकतात. )
  • लेखाचा परिचय -सुमारे 200-300 शब्द.
  • लेखाचे शीर्षक – शीर्षक हे नेमके आणि लेखाचा विषय सूचित करणारे हवे (शक्यतो 12 शब्दांत)
  • मुख्य गाभा – ह्या भागाची संरचना व समक्रम व्यवस्थित असावेत. प्रत्येक परिच्छेदाला अनुरूप शीर्षक असावे. एक परिच्छेद गरज असल्यास काही उपपरिच्छेदात विभागला जाऊ शकतो. सारांश: लेखाच्या सुरूवातीला लेखाचा थोडक्यात सारांश लिहिलेला असावा.
  • निष्कर्ष -सुमारे 200 शब्द.

कोण लिहू शकतं-

  • प्राध्यापक
  • सी.ए.
  • कर सल्लागार
  • सी.एस. व गुंतवणूक सल्ला व्यवसायिक

लेखकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे

  • नाव, पत्ता आणि छायाचित्र – पासपोर्ट आकाराच्या फोटोसह नाव, पत्ता, शिक्षण, सध्या काम करत असलेली कंपनी, हुद्दा आणि संपर्क क्रमांक लेखासह ईमेलने पाठवावा.
  • कॉपीराइट – पाठवलेला लेख मूळ आहे आणि कोणत्याही व्यक्ती / संस्थेच्या कॉपीराइटचे उल्लंघन करीत नाही याची लेखकाने खात्री केली व दिली पाहिजे. असे कोणतेही उल्लंघन झाल्यास, अशा उल्लंघनासाठी, कोणत्याही परिणामी नुकसानीसाठी व नुकसान भरपाईसाठी लेखक स्वतः वैयक्तिकरित्या जबाबदार असेल. अर्थसाक्षर.कॉम वर प्रसिद्ध झालेल्या लेखांचे व संग्रहणांचे सर्व मालकी हक्क अर्थसाक्षर नॉलेज प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे असतील.
  • पाठवलेल्या एखाद्या लेखावरून अन्य काही लेख अर्थसाक्षरकडून तयार करण्यात आले तर अशा सर्व लेखांचे मूळ मालकी हक्क अर्थसाक्षर.कॉमकडे सुरक्षित असतील.
  • प्रत्येक लेख हा लेखकाचे मूळ योगदान असणे आवश्यक आहे.
  • विशेष प्रकाशनाकरिता संमती -लेख केवळ अर्थसाक्षर.कॉम ह्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्याकरिता पाठवलेले असावेत.
  • पाठवलेले लेख हे कुठेही पुर्वप्रकाशित नसावेत, आणि त्याच किंवा बदल करून नविन स्वरूपात प्रकाशनासाठी कुठेही पाठवलेले नसावेत. पाठवलेला मजकूर हा केवळ अर्थसाक्षरवर.कॉमवर प्रकाशित होईल याची काळजी व जबाबदारी लेखकांनी घेणे आवश्यक आहे.
  • कोणताही मजकूर/लेख संकेतस्थळावरील प्रकाशनासाठी स्विकारणे अथवा नाकारण्याचे किंवा त्यांत काही फेरबदल करून पुनःसंपदनासह प्रकाशित करण्याचे सर्व अधिकार अर्थसाक्षर.कॉमच्या संपादक मंडळाकडे आहेत.

हमीवजा घोषणापत्र-

  1. मी, श्री / सुश्री / प्रोफेसर ………………….. मी लेखकांसाठीचे दिशानिर्देश वाचले असून समजून घेतल्याची घोषणा करतो.
  2. मी जाहीर करतो की:
    • अ. “………………………………………………….” हे माझे अभिनव/नवनिर्मीत योगदान आहे आणि त्याचा कोणताही भाग इतर कोणत्याही स्त्रोतांमार्फत वापरण्यात आलेला
    • ब. हा लेख अर्थसाक्षर संग्रहासाठी एक विशेष/अभिनव योगदान आहे आणि तो प्रकाशनासाठी अन्यत्र पाठविला जाणार नाही; आणि
    • क. अर्थसाक्षर.कॉमवर प्रकाशित झाल्यास, या लेखाचे मालकी हक्क अर्थसाक्षर.कॉम कडे हस्तांतरित होतील.
    • ड. या लेखात व्यक्त केलेल्या मतांशी संकेतस्थळाचे संपादक मंडळ सहमत असतीलंच असे नाही.
  3. मी खालील हमी देतो:
    • अ. लेखकांसाठी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे,
    • ब. अर्थसाक्षरच्या दिलेला लेख जसाच्या तसा किंवा काही फेरबदलासंहित प्रकाशित होणे वा न होणे अशा निर्णयांचा मान राखणे.
    • क. या ‘हमीवजा घोषणापत्र’ विभागात नमूद केलेल्या कोणत्याही मुद्द्याच्या/निमयमाच्या उल्लंघनासाठी जबाबदारी स्विकारणे.

    (स्वाक्षरी)


    उपरोक्त प्रक्रियेचे अनुसरण करून आपण आपल्या लेखाचे कोणतेही सखोल संपादन आवश्यक नसून त्याचे प्रकाशन जलद व सुलभ होईल असे सुनिश्चित करत आहात.. आपले लेख- [email protected] वर पाठवा

विषय-

  • कर्ज (Loans)
    1. वैयक्तिक कर्ज Personal Loan
      • i. पगारदारांसाठीचे वैयक्तिक कर्ज (Personal loan for salaried)
      • ii. व्यवसायिक कर्ज (Business Loan)
      • iii. डॉक्टर कर्ज (Doctor Loan)
    2. गृहकर्ज (Home loan)
      • i. गृहकर्ज बॅलन्स ट्रान्सफर (Home loan balance transfer)
      • ii. प्रॉपर्टीवरील कर्ज (Loan against property)
    3. वाहन कर्ज (Car Loan)
    4. शैक्षणिक कर्ज (Education Loan)
    5. सोने तारण कर्ज (Gold Loan)
  • कार्ड्स (Cards)
    1. डेबिट कार्ड (Debit cards)
    2. क्रेडिट कार्ड (Credit cards)
    3. सिक्युअर्ड कार्ड (Secured cards)
  • गुंतवणूक (Investment)
    1. बचत खाते (Saving Accounts)
    2. फिक्स डिपॉजिट (Fixed Deposit)
    3. म्युचूल फंड (Mutual Funds)
    4. लोक भविष्य निधी (PPF /EPF)
  • आयकर(Income Tax)
    1. इतर स्त्रोतांपासूनचे उत्पन्न (Income from other sources)
    2. आयकर स्लॅब (IT slabs)
    3. पेन्शनरांचा आयकर (IT for pensioners)
    4. ज्येष्ठ नागरिकांचा आयकर( IT for senior citizens)
    5. आयकर विवरण पत्र (ITR)
  • जी.एस.टी (GST)
    1. जी.एस.टी (GST)
    2. नोंदणी (Registration)
    3. दर (Rate)
    4. परतावे व फायदे (Returns & Benefits)
    5. जी.एस.टी.मधील समाविष्ट आवक/आयात( Imports under GST)
    6. रिफंड प्रक्रिया (Refund process)
    7. बिलींग (Billing)
  • म्युचूअल फंड(Mutual Funds)
    1. इक्विटी फंड (Equity Funds)
    2. डेट फंड (Debt Funds)
    3. मनी मार्केट फंड(Money Market Funds)
    4. हायब्रिड/बॅलेन्स्ड फंड (Hybrid/Balanced Funds)
    5. सेक्टर फंड (Sector Funds)
    6. इन्डेक्स फंड (Index Funds)
    7. करबचत फंड (Tax Saving Funds)
    8. ओपन एन्डेड फंड (Open Ended Funds)
    9. क्लोज एन्डेड फंड (Close Ended Funds)
    10. ग्रोथ फंड (Growth Funds)
    11. लिक्वीड फंड (Liquid Funds)
  • विमा (Insurance)
    1. जीवनविमा (Life Insurance)
      • i. चाईल्ड प्लॅन्स (Child Plans)
      • ii. पेन्शन योजना (Pension plans)
      • iii. मनी बॅक पॉलिसी (Money back policy)
      • iv. एन्डोमेंट पॉलिसी (Endowment Policy)
      • v. आयकर (Income tax)
    2. आरोग्य विमा (Health Insurance)
      • i. कुटुंब विमा योजना ( Family health plan)
      • ii. ज्येष्ठ नागरिक विमा योजना (Senior Citizen health plan)
    3. वाहन विमा (Motor Insurance)
      • i. कार विमा (Car Insurance)
      • ii. दुचाकी विमा (Two wheeler Insurance)
      • iii. थर्ड पार्टी विमा (Third party Insurance)
    4. इतर विमा Other insurance
      • i. जनरल विमा (General Insurance)
      • ii. गृप मेडिक्लेम कव्हर (Group mediclaim cover)
      • iii. कॉर्पोरेट विमा (Corporate Insurance)
      • iv. प्रवास विमा (Travel insurance)
      • v. गृहविमा (Home Insurance)
      • vi. वैयक्तिक अपघात (Personal Accidents)
      • vii. कर्करोग विमा (Cancer Insurance)