विमा ग्राहकाची फसवणूक: आपण काय काळजी घ्याल?

Reading Time: 3 minutesपॉलिसीधारकाच्या परवानगीशिवाय त्याच्या पाच पॉलिसी बंद करून त्याच्या नावे दोन नवीन पॉलिसी परस्पर उघडून फसवणूक करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

Compound Interest: चक्रवाढ व्याजाची जादू

Reading Time: 3 minutesअनेकदा गुंतवणुकीचे साधे सोपे पण जास्त फायदा मिळवून देणारे पर्याय आपल्या समोर असतात पण निव्वळ पुरेशा माहितीअभावी त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणुकीच्या विविध पर्यायांची माहिती करून घेतल्यास जास्त फायदा होऊ शकतो.

१ जानेवारी २०१९ पासून ATM कार्ड्स अवैध ठरणार का?

Reading Time: 2 minutesबँकेकडून देण्यात येणाऱ्या प्रत्येक कार्डमध्ये आता एक महत्वपूर्ण बदल करण्यात आला आहे, तो म्हणजे जुन्या मॅग्नेटिक स्ट्रीपऐवजी EMV (युरोपे, मास्टरकार्ड आणि व्हिसा) कार्ड्स आता चलनात येतील. तसेच रिझर्व बँकेच्या आदेशानुसार जुनी मॅग्नेटिक स्ट्रीप असलेली  सर्व कार्ड्स १ जानेवारी २०१९ पासून ब्लॉक केली जातील. रिझर्व बँकेने २७ ऑगस्ट, २०१५ रोजी दिलेल्या आदेशानुसार दिनांक १ सप्टेंबर, २०१५ पासून बँकांनी EMV तंत्रज्ञान असणारे कार्ड जरी करणे बंधनकारक आहे.

नवीन वर्ष ग्राहक राजाचं … !! भाग १

Reading Time: 2 minutesमी माझ्या लेखाच्या सुरुवातीला दोन वेगळी अवतरणे का वापरली याबद्दल तुम्ही गोंधळून गेला असाल तर तुम्हाला सांगतो की हा विषयच दोन घटकांचं मिश्रण आहे, जे सकृतदर्शनी सारखेच वाटू शकतात मात्र त्या पूर्णपणे वेगळ्या संकल्पना आहेत. होय मी रिअल इस्टेट व घराविषयी बोलतोय, या दोन्ही संज्ञा एकमेकांशी संबंधित आहेत तरीही रिअल इस्टेट म्हणजे पैसे कमावणे (म्हणजेच व्यावसायिकांसाठी) व घर म्हणजे, इलियट यानं म्हटल्याप्रमाणे केवळ एक भौतिक गोष्ट नाही तर ती एक भावना आहे, जी सगळ्यांचीच महत्वाकांक्षा असते.

भारत – पाकिस्तानची करपद्धतीतील ‘भाऊबंदकी’ !

Reading Time: 4 minutesपाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईला आली असून त्यात जुनाट करपद्धतीचा मोठा वाटा आहे. पाकिस्तान सरकारला हे लक्षात आल्याने ते त्यामध्ये काही सुधारणा करण्याचा प्रयत्न करते आहे. पाकिस्तानचा मोठा भाऊ, भारताची आर्थिक स्थिती आज तुलनेने बरी असली तरी भारतानेही सध्याच्या आर्थिक सुधारणांना वेग देण्याची गरज आहे.

पॉवर ऑफ (रूपे कार्ड) कॉमन मॅन !

Reading Time: 3 minutesरूपे कार्डचा वापर देशात इतका वाढला की व्हिसा आणि मास्टरकार्ड या कंपन्यांना भारत सरकारची अमेरिकी प्रशासनाकडे तक्रार करावी लागली. भारतीय सामान्य नागरिकांची ताकद त्यातून दिसली. संख्येने प्रचंड असलेला हा सामान्य भारतीय नागरिक असे बदल करू लागला तर आपली लोकसंख्या ओझे न होता ती आपली संपत्ती होऊ शकते.

कर्जाच्या नावाने फायनान्स कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक !

Reading Time: 3 minutes‘फिर हेरा फेरी’ चित्रपटात बिपाशा बसू, राजूला (अक्षयकुमार) एक गुंतवणूक योजना सांगते. गोड बोलून, खोटं चित्र निर्माण करून त्याच्याकडून मोठी रक्कम घेऊन त्याला आणि त्याच्यासह बाबू भैय्या आणि शाम यांनाही फसवते. त्या खोट्या बोलण्याला फसून मोठी ‘रक्कम’ देण्याची ‘किंमत’ तिघेही भरतात. चित्रपटात बघताना हे सगळं गंमतीदार, विनोदी वाटतं. कारण परदुःख शीतल आणि पर-घटना विनोदी वाटतात.चित्रपटातील ‘हेराफेरी’ ही कितीही विनोदी वाटो पण वास्तविक आयुष्यात त्यातील एक टक्का जरी घटना घडली वा प्रसंग उद्भवला तरीही होत्याचं नव्हतं होतं. वास्तविक आयुष्यात दुःखाचे डोंगर कोसळतात. ज्याने विश्वास टाकला, ज्याची प्रत्यक्ष फसगत झाली त्याचं आयुष्य उध्वस्त होत. त्याच्या कुटुंबियांचं, जे प्रत्यक्ष निर्णयात सहभागी नसतात पण त्याच्याशी  संबंधित असतात त्यांनांही मोठी झळ पोचते. अशीच एक फसवेगिरीची घटना घडली महाराष्ट्रातच नेवासा, श्रीरामपूर आणि राहूरीमध्ये. येथील अनेक लोकांची फसगत झाली.

General Insurance -सर्वसाधारण विमा योजनेचे विविध प्रकार

Reading Time: 3 minutesविविध प्रकारच्या धोक्यातून होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण मिळवण्यासाठी विमा काढला जातो,  हे आपल्याला माहीत आहेच. विम्याद्वारे ही भरपाई पैशांच्या स्वरूपात केली जाते. आयुष्याची अशाश्वतता ही जीवनविमा (Life insurance) घेऊन सुरक्षित केली जाते तर इतर सर्व गोष्टीतील धोका हा सर्वसाधारण विमा योजना (General Insurance) घेऊन सुरक्षित केला जातो. असे अनेक प्रकारचे धोके निश्चित करून त्यावर मात करण्यासाठी सर्वसाधारण विमा घेतला जातो. हा ग्राहक आणि विमाकंपनी यातील कायदेशीर करार असून उभयपक्षी यातील अटींचे पालन करावे लागते. या योजनांची मुदत सर्वसाधारण पणे एक वर्ष असून क्वचित २/३  वर्षाचीही असू शकते. यातील काही योजना या कायद्याने आवश्यक असून अनेक योजना ऐच्छिक आहेत.

सुकन्या समृद्धी योजना – भाग १

Reading Time: 2 minutesघरात कन्यारत्नाचं स्वागत तर जोरदार झालं, पण तिच्या भविष्याची काळजी वाटते? पालक म्हणून तिच्या शिक्षण आणि लग्नासाठीच्या खर्चाची तरतूद काय आहे? तुमचं तुमच्या मुलीवर असलेलं प्रेम व्यक्त करण्याची सुवर्ण संधी एक सरकारी योजना तुम्हाला देते आहे. जिचं नाव आहे ‘सुकन्या समृद्धी योजना’. तुमची लाडकी लेक सज्ञान होई पर्यंत प्रती महिना गुंतवणूक करा आणि तिच्या भविष्य बद्दल निश्चिंत व्हा!

जीएसटीआर-९-ए चे वार्षिक रिटर्न ३१ डिसेंबरपूर्वी भरणे अनिवार्य

Reading Time: 2 minutesजीएसटीआर-९ए हा फॉर्म फक्त कंपोझिशन करदात्याद्वारे दाखल केला जाईल. जीएसटीआर ९ ए हा फॉर्म पुढील आर्थिक वर्षाच्या ३१ डिसेंबरपर्यंत दाखल करावा लागेल. उदा. जर करदात्याला आर्थिक वर्ष २०१७-१८ साठी जीएसटीआर-९ए दाखल करायचा असेल, तर त्याची देय तारीख ३१ डिसेंबर, २०१८ असेल.