माझे पैसे कोणत्या बँकेत कसे ठेऊ किती ठेऊ?
Reading Time: 4 minutes बचत आणि गुंतवणूक यांच्या अनेक योजना आहेत. आपल्याकडील पैसे, जोखीम स्वीकारण्याची क्षमता, भविष्यकालीन गरज या सर्वांचा विचार करून कमी अधिक प्रमाणात पैशांची विभागणी करावी लागते. यात सुरक्षितता, परतावा आणि रोकडसुलभता यांचाही विचार करावा लागतो. या सर्वाचा विचार करून काहीतरी रक्कम आपल्याला बँकेत ठेवावी लागते. बँकेत ठेवलेले पैसे, जरी ते कोणत्याही योजनेत असले तरी आपल्याला मागणी केल्यास ताबडतोब मिळू शकतात. तेव्हा आपण कोणत्या बँकेत किती पैसे ठेवावे? कसे ठेवावेत? असे प्रश्न पडणे साहजिकच आहे.