संपूर्ण भारतीय आणि व्यवहार्य मॉडेल – सर्व ज्येष्ठांसाठी ‘यूबीआय’ योजना

Reading Time: 4 minutes भारतीय नागरिकांच्या मनात सध्या असुरक्षिततेने घर केले असून पुरेसा पैसा उपलब्ध नसणे, हे त्याचे सर्वात प्रमुख कारण आहे. सर्व ज्येष्ठ नागरिकांना राष्ट्रीय संपत्तीचा दर्जा जाहीर करून त्यांच्यात कोणताही भेदभाव न करता विशिष्ट मानधन देणे ही ‘गरजू नागरिकांना किमान पैसे देण्याची आदर्श (Universal Basic Income – UBI) योजना’ ठरू शकते. अर्थक्रांतीचा या प्रस्तावाची अमलबजावणी करण्याची हीच वेळ आहे. कारण, त्यामुळे अधिकाधिक नागरिकांना समृद्ध आयुष्य जगण्याचा हक्क मिळणार आहे.