Reading Time: 4 minutes

 पी व्ही सुब्रमण्यम हे भारतातील अग्रगण्य प्रशिक्षक असून त्यांनी आर्थिक नियोजन या विषयावर पुस्तकेही लिहली आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळून नुकतीच 75 वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्ताने आपण स्वातंत्र्याचा अमृतमोहोत्सव साजरा करीत आहोत परंतु आजही भारतातील 70% जनतेस आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते, आर्थिक स्वातंत्र्य कसं मिळवायचे? हे जर आपण जाणून घेतले तरच भविष्यात आपण आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होऊ. बरेचदा आपण ध्येयनिश्चिती करत असतो, परंतु त्यापर्यत पोहचू शकत नाही. आपल्या आयुष्यात एक क्षण असा येतो जेव्हा आपण सर्व गोष्टी स्वतःच करण्याचा प्रयत्न करीत असतो. स्वतःच घर, स्वतःची गाडी, विविध खर्च जसे आरोग्यावरही खर्च, मनोरंजन इतर खर्च इत्यादी. ही पात्रता येण्यासाठी बरच काही ज्ञान मिळवावं लागतं, त्याचा योग्य तो वापर करावा लागतो. याच विषयावरील चर्चेनेही आपला जीवनक्रम/ प्राधान्यक्रम बदलू शकतो. सरांचे ज्ञान, एवढ्या वर्षाचा विविध क्षेत्रातील अनुभव लक्षात घेता त्यातून महत्वाची माहिती मिळणे हे स्वाभाविकच होतं.

या विषयांवर त्यांच्याशी चर्चा करण्यापूर्वी –

त्याच्या मनात स्वातंत्र्य या विषयी कोणते विचार आहेत? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

त्यांच्यामते, स्वातंत्र्य संकल्पनाच खूप व्यापक आहे, महात्मा गांधींनी या सर्वाचा विचार खूप खोलवर केला होता. फक्त आर्थिक नव्हे तर प्रत्येक गोष्टींपासून त्यांना स्वातंत्र्य मिळवायचं होतं. स्वावलंबन हे त्याचं महत्वाचं सूत्र होतं. ते स्वतः सूतकताई करत कापड विणत, त्यांनी पाळलेल्या बकरीचे दूध ते स्वतः काढत असत, साफसफाई ते स्वतःच करत असत, फारसे आजारी पडत नसत. आपण व्यवस्थित राहिलो, श्रम केले, योग्य वेळी योग्य आहार घेतला तर आजार होणार नाही. समस्या या आपण स्वतःच ओढवून घेत असतो असं ते म्हणत. हे थोडं मजेशीर वाटत असलं तरी यामागील तथ्य तपासून पाहू माझं डोकं दुखत असेल तर मी तेच धरून बसतो. त्याचा विचार करताकरता मी पडून पाय मोडला तर माझे लक्ष डोकं दुखतंय त्यावरून उडून पायावर केंद्रित होतं. जेव्हा तुम्ही मला बरं नाही म्हणता तेव्हा मला कोणताच विकार होऊ नये यासाठी मी  काय केलं याचा विचार प्रथम करावा. मी जर व्यवस्थित काम केलं असतं, योग्य आहार घेतला असतापैसे , व्यायाम केला असता तर ही वेळच माझ्यावर आली नसती तेव्हा मी आजारी आहे असं म्हणायची आपल्याला शरम वाटायला हवी. आता लोकांना अस वाटतं माझ्याकडे  आहेत त्यामुळे मी आजारी पडल्यास उत्तम हॉस्पिटलमध्ये भरती होऊ शकतो, वेगळा सेवक ठेऊ शकतो, आचारी ठेवू शकतो, ड्रायव्हर बाळगू शकतो. लोकांना समस्या मुळातून सोडवावी असे वाटतच नाही. त्यांना व्यायाम करा सांगणारा डॉक्टर आवडत नाही. त्यांनी तुम्हाला ब्लड प्रेशर आहे डायबिटीस आहे सांगणारा डॉक्टर आवडतो जणू काही त्यांना असलेले विकार त्यांच्या प्रतिष्ठेत भर घालणारे आहेत असे वाटते. तेव्हा स्वातंत्र्य या संकल्पनेचा विचार करताना मला हवं असणार स्वातंत्र्य, हे नक्की कशापासून हवंय? ताणापासून हवंय, आजारापासून हवंय? अनारोग्यापासून हवंय? अस पूर्ण सामाजिक स्वातंत्र्य, मानसिक स्वातंत्र्य, आर्थिक स्वातंत्र्य हवंय अस यातून अभिप्रेत आहे. एक गोष्ट आहे आणि दुसरी नाही याचा अर्थ आपण कोणावरतरी अवलंबून आहोत.  तेव्हा या गोष्टी लक्षात ठेवूनच आपल्याला आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे काय हे स्वतः निश्चित करायचं आहे.

★आता तुम्ही आरोग्याचा विषय काढलात पण बरेचदा आपण पैसे मिळवण्यावर लक्ष केंद्रित करीत असतो त्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होतं, तेव्हा आरोग्य आणि आरोग्यविमा या कडे आपण कसं पहाता? याची आवश्यकता का आहे? याबाबत काही सांगू शकाल?

आपल्याकडे थोडे जास्त पैसे आले की आपल्या आहाराच्या सवयी बदलतात. जगभरात याबद्दल काय होते ते मला माहिती नाही पण भारतात पैसे असलेला माणूस दिवसांतून सातवेळा खातो प्रत्यक्षात त्याची खरी गरज दोनदा जेवण आणि एकदा न्याहारी अशी फक्त तीन वेळाच आहे. तेव्हा आपलं आरोग्य राखण्यासाठी तीन वेळाहून अधिक खाण्याची गरज नाही जर तुम्ही दिवसभरातून 6/ 7 वेळा खात असाल तर हळू हळू ते कमी करा. तेव्हा आहार कमी आणि तुलनेत व्यायाम अधिक केलात तर आरोग्याच्या समस्या उद्भवणार नाहीत. तरीही काही झालंच तर आरोग्यविमा आहे याचा अर्थ तुमचं बिल तुम्ही नाही तर अन्य कोणीतरी भरणार आहे पण तुमच्या वेदना तुम्हालाच भोगाव्या लागतील त्या कोणी घेऊ शकत नाही. तेव्हा आरोग्याची काळजी घ्या सकस आहार घ्या, प्रोसेस फूड टाळा नियमित व्यायाम करा. हेल्थ इन्शुरन्स तुमच्या आर्थिक सुरक्षेशी संबंधित आहे. तो असावा पण वापरला जावा अशी इच्छा बाळगू नका. आपल्याला इन्शुरन्स वापरावा न लागणे म्हणजे आपण खुश (वाढलेला प्रीमियम आपल्याला अलीकडे नाराज करत असतो तो भाग वेगळा)  लोकांचा प्रीमियम मिळत राहून क्लेम आला नाही म्हणजे आपली इन्शुरन्स कंपनी खुश. माझ्या टर्म इन्शुरन्सचा हप्ता फुकट जावा अशी मी प्रार्थना करत असतो. माझा इन्शुरन्स वापरला न जाणे म्हणजे मी जगणे, इन्शुरन्स असल्याने आपल्या मागे काय होईल याबद्दल निश्चितता तर क्लेम न आल्याने कंपनी यांना आनंद मिळेल.

★इन्शुरन्स नक्की किती रकमेचा असावा?

माझ्या दृष्टीने प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. तो कुटुंबाच्या गरजा पूर्ण करणारा असावा. मेडिकल इन्शुरन्स ही माझ्या दृष्टीने अतिशय विरोधाभास असलेली अत्यंत हास्यास्पद संकल्पना आहे. ज्याला जरुरी नाही त्याला तो सहज मिळतो आणि ज्याला खरोखरच जरुरी आहे तो त्याच्या आवाक्यातील नाही. ज्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत त्याच्या दृष्टीने यासाठी केला जाणारा खर्च तुलनेने किरकोळ असतो तर ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्याच्या दृष्टीने काही खर्च करायची वेळ आली तर तो आपली मोठी कमाई हरवून बसतो. ज्यांच्याकडे कोट्यवधी रुपये आहेत त्याला 30 लाख हॉस्पिटल बिल ही किरकोळ गोष्ट असते पण ज्यांच्याकडे 2 कोटी रुपये आहेत त्याला हेच तीस लाख खूप जास्त वाटतील तर अनेकांच्या दृष्टीने ही न परवडणारी रक्कम होईल. तेव्हा आपण जितका हप्ता सहज भरू शकतो तेवढे टॉपअपसह किमान कव्हर असावे हे सरसगट सर्वांसाठी निश्चित रक्कम ठरवणे कठीण आहे. जरी तुमच्याकडे तुमच्या मालकाने दिलेला आरोग्यविमा असला तरी स्वतःचा विमा असणे जरुरीचे आहे.

★राखीव निधी म्हणून किती रक्कम असावी आणि ती कुठे ठेवावी.

याचंही उत्तर व्यक्तीनुसार बदलेल. ही गरज नेमकी किती असेल याचा तुम्हीच अंदाज घेऊ शकता. तेवढी रक्कम तुम्ही रोखीने घरात, सेव्हिंग खात्यात, मुदत ठेवीत विभागून ठेऊ शकता. पैशाच काम पैसाच करू शकतो, तुम्हाला तुमची मुले किंवा आईवडील यांच्याकडून आणीबाणीच्या प्रसंगी पैसे मिळू शकतील याची खात्री असेल तर तुमच्याकडे स्वताकडे पैसे नसतील तर चालू शकतं. या सर्व शक्यता तपासून पहा. म्युच्युअल फंडाच्या लिक्विड फंडात पैसे ठेवण्याचा अनेकजण सल्ला देतात पण हे पैसे मिळण्यास 1 ते 3 दिवसाचा कालावधी लागू शकतो हे समजून घ्या. अशाच व्यक्ती किंवा नातेवाईक यांच्यावर विश्वास ठेवा जे तुम्हाला नक्की उपयोगी पडू शकतील. नाहीतर तुम्हाला जेव्हा पैसे हवे असतील तेव्हा हे लोक वेगवेगळी कारणे पुढे करतील. असे लोक कोण हे अनुभवाने तुमच्या लक्षात आले असेलच किंवा मोठ्या रकमेचे लिमिट असलेल्या  क्रेडिट कार्डनेही ही गरज भागू शकते. त्याचा वापर आपले मित्र नातेवाईक यांच्यासाठीही अडीअडचणीसाठी करता येईल.

★गुंतवणूक काढून घेता येईल असे कोणते सहज गुंतवणूक पर्याय आपण सांगू शकाल?

सर्वच गुंतवणूक सहज काढता यावी अस नाही नाहीतर त्यातून सुयोग्य परतवा मिळणार नाही. तेव्हा आपली गरज ओळखून तेवढीच रक्कम सहज मिळेल अशी ठेवावी. ही गरज व्यक्तीनुसार वेगवेगळी असू शकते. सहज परत मिळणाऱ्या गुंतवणुकीतून फारसा परतावा मिळू शकत नाही हे सत्य आहे.

(अपूर्ण)

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…