Reading Time: 2 minutes

धोक्याची सूचना!!

 • इंटरनेट बँकिंग वापरताना कळत नकळत अशा काही चुका होऊन जातात की ज्यामुळे तुमची जमापुंजी धोक्यात येते. मोठे आर्थिक नुकसान होण्यापासून बचाव करायचा असेल तर इंटरनेट बँकिंग चा काळजीपूर्वक वापर करणं फार महत्वाचं आहे.
 • इंटरनेट बँकिंग हे साधन जितकं सोईस्कर आहे तितकंचधोक्याचंहीआहे. इंटरनेट बँकिंगबद्दलची अपुरी माहिती फार महागात पडू शकते. ‘Half knowledge is always dangerous’, हे अगदी खरं आहे.
 • ऑनलाईन आर्थिक व्यवहार हाताळताना, मग ते लहान रकमेचे असोत की करोडोंचे, पुढील काही गोष्टी कटाक्षाने टाळल्या गेल्या पाहिजेत. तरच तुम्ही खऱ्या अर्थाने नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेऊ शकता अथवा ऑनलाईन फ्रॉड आणि तत्सम धोक्याची टांगती तलवार तुमच्या डोक्यावर असेल.

१. कोणाबरोबरही आपली माहिती शेअर करू नका-

 • आपल्या वैयक्तिक तपशीलांची माहिती शेअर करणे टाळा. ते आपले नातेवाईक किंवा जवळचे मित्र असले तरीही आपले पासवर्ड, ओटीपी इत्यादी माहिती सांगणे धोक्याचे ठरू शकते.
 • कोणतीही बँक आपली गोपनीय माहिती फोन किंवा ईमेलद्वारे कधीही विचारणार नाही. त्यामुळे बँकेकडून आलेला फोन कॉल किंवा आपल्या तपशीलाची विनंती करणारा ईमेल अशा कोणालाही आपली गोपनीय माहिती (लॉगिन आयडी) देऊ नका.
 • आपल्या लॉगिन आयडी आणि संकेतशब्दाचा वापर फक्त बँकेच्या अधिकृत लॉगिन पृष्ठावर करा.ती सुरक्षित वेबसाइटअसते. लॉग इन करताना युआरएल मध्ये ‘https: //’ पहा; याचा अर्थ वेबसाइट सुरक्षित आहे.

२. सार्वजनिक वाय-फाय वापरणे टाळा-

 • मोफत वाय-फाय नेटवर्कचा सर्वात मोठा धोका म्हणजे हॅकर. अगदी हॉटस्पॉट द्वाराही एखादा हॅकर तुमच्या ‘डिव्हाईस’ मधील सर्व डेटा शोधू शकतो.
 • हॅकर्स असुरक्षित कनेक्शन द्वारा मालवेअरचा वापर करून डिव्हाइसमध्ये प्रवेश करतात. म्हणून, इंटरनेट किंवा मोबाइल बँकिंगसाठी सार्वजनिक वाय-फाय हॉटस्पॉट्स वापरणे टाळावे.
 • जर तुम्ही नियमित सार्वजनिक वाय-फाय वापरकर्ता असाल, तर संगणकावर ‘व्हीपीएन’ सॉफ्टवेअर सेट अॅपचा वापर करा. हे संगणक आणि इंटरनेट दरम्यान एक सुरक्षित नेटवर्क तयार करते आणि हॅकर्सना ट्रॅफिकमध्ये व्यत्यय आणण्यास प्रतिबंधित करते.

३. सार्वजनिक संगणकांचा वापर करू नका-

 • सायबर कॅफे किंवा लायब्ररीमधील सामान्य संगणकांवर आपल्या बँक खात्यात लॉग इन करणे टाळा. ही गर्दीची ठिकाणे आहेत. त्यामुळे कोणीही आपला पासवर्ड शोधण्याची किंवा पाहण्याची शक्यता असते.
 • आर्थिक व्यवहार करण्यासाठी तुम्ही जर सार्वजनिक संगणक वापरत असाल तर आपली लॉगिन माहिती असुरक्षित आहे. आपल्याला अशा ठिकाणी लॉगिन करायची गरज पडल्यास, आपली माहिती आणि ब्राउझिंग इतिहास (History) क्लिअर करा आणि संगणकावरील सर्व फाइल्स डिलीट करा (हटवा). तसेच ब्राउझरला आपला आयडी आणि पासवर्ड लक्षात ठेवण्याची परवानगी देऊ नका.

४. इंटरनेट कनेक्शन सुरु ठेऊ नका-

 • बहुतेक ब्रॉडबँड वापरकर्ते संगणकचा वापर करत नसतानाही इंटरनेट कनेक्शन डिस्कनेक्ट करत नाहीत. अशा सुरु ठेवलेल्या इंटरनेट कनेक्शनद्वारे हॅकर्स आपल्या संगणकावर प्रवेश करू शकतात आणि आपली गोपनीय बँकिंग माहिती चोरू शकतात.
 • आपला डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी, जेव्हा आवश्यकता नसते तेव्हा आपण इंटरनेट डिस्कनेक्ट केले असल्याचे निश्चित करा.

५. ऑटोलॉगिन सुरु ठेऊ नये-

 • कोणत्याही वेब ब्राउझरला आपल्या ऑनलाइन बँकिंग वेबसाइट्ससाठी खाजगी युजरनेम आणि संकेतशब्द (Password) माहिती संग्रहित (Save) करण्याची परवानगी देऊ नका.
 • काही वेब ब्राउझर स्वयंचलितपणे लॉगिन माहितीचा गैरवापर करू शकतात म्हणून आपल्या वेबसाइटसाठी ‘ऑटोसेव्ह’ हे वैशिष्ट्य शक्यतो वापरू नका.

६. ब्लूटूथ (Bluetooth) प्रवेश बंद करा-

 • ब्लूजॅकिंग, ब्ल्यूझनर्फिंग किंवा ब्लूबगिंगबद्दल आपण कधी ऐकले आहे का? हे असे धोके आहेत जे ब्लूटुथद्वारे हॅकिंगचा वापर करू शकतात.
 • सायबर क्रिमीनल्स केवळ ब्लूटूथद्वारे फोन किंवा कॉम्प्यूटरमध्ये टॅप करतात आणि नंतर आपल्या कार्यांचे नियंत्रण करतात. या समस्येस टाळण्यासाठी, जेव्हा त्याचा वापर करीत नसता तेव्हा आपले ब्लूटुथ बंद करा.  

अशाप्रकारे योग्य ती काळजी घेतल्यास इंटरनेट बँकिंग त्रासदायक नाही तर लाभदायक ठरते. इंटरनेट बँकिंग ही एक चांगली सुविधा आहे. त्यामुळे वेळ तर वाचतोच शिवाय त्रासही कमी होतो. गरज आहे ती फक्त योग्य ती काळजी घेण्याची.

(चित्रसौजन्य: https://bit.ly/2PbbzXD)

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.