‘शेअरबाजार – रिलायन्सचा राईट्स इश्यू ..’ 

Reading Time: 3 minutes रिलायन्सचा  राईट्स इश्यू  काल (२० मे )  चालू  झाला असून, तो  ०३ जून २०२० पर्यंत खुला असेल. १४ मे २०२० रोजी जे कंपनीचे भागधारक होते त्यांना त्यांनी धारण केलेल्या प्रत्येकी १५ समभागांकरिता ०१ समभाग रु. १२५७/- प्रमाणे मिळणार आहे. यापेक्षा कमी वा अपूर्ण संख्या असलेल्या भागधारकांना (उदा १९ पैकी उर्वरित ०४) त्यांच्या उर्वरित  शेअर्सच्या प्रमाणात मोबदला रोख स्वरुपांत मिळेल अर्जासोबत प्रत्येक शेअरकरिता पूर्ण रक्कम न भरता फक्त २५% म्हणजेच रु. ३१४.२५ भरावयाचे आहेत.