Arthasakshar Reliance Right issue - how to apply Marathi info
Reading Time: 3 minutes

‘शेअरबाजार – रिलायन्सचा  राईट्स  इश्यू ..’ 

रिलायन्सचा  राईट्स इश्यू काल (२० मे )  चालू  झाला असून, तो  ०३ जून २०२० पर्यंत खुला असेल.

१४ मे २०२० रोजी जे कंपनीचे भागधारक होते त्यांना त्यांनी धारण केलेल्या प्रत्येकी १५ समभागांकरिता ०१ समभाग रु. १२५७/- प्रमाणे मिळणार आहे. यापेक्षा कमी वा अपूर्ण संख्या असलेल्या भागधारकांना (उदा १९ पैकी उर्वरित ०४) त्यांच्या उर्वरित  शेअर्सच्या प्रमाणात मोबदला रोख स्वरुपांत मिळेल अर्जासोबत प्रत्येक शेअरकरिता पूर्ण रक्कम न भरता फक्त २५% म्हणजेच रु. ३१४.२५ भरावयाचे आहेत.

मुकेश अंबानी यांच्या संपत्तीबद्दल ८ महत्वपूर्ण गोष्टी

अशा हक्कभाग मिळालेल्या भागधारकांना याकरिता तीन प्रकारे अर्ज करता येतील –

 1. नेट बँकिंग सुविधा वापरुन आपण एखाद्या ‘IPO’ करिता ज्याप्रमाणे अर्ज करतो, तीच  पद्धत  वापरुन आपल्याला अर्ज  करता येईल. आपल्या धारण (Holding) करीत रिलायन्सच्या शेअर्सचे तपशील (डीपी व क्लायंट आय.डी.ई.) अर्थातच  द्यावे  लागतील.  
 2. https://rights.kfintech.com/  या  लिंकवरुनही अर्ज करता  येईल. येथेही शेअर्सचे तपशील (डीपी व क्लायंट आय.डी ई.) द्यावे  लागतीलच. 
 3. याशिवाय  पारंपारिक पद्धतीने अर्ज हाताने भरणे व रजिस्ट्रार यांना पोस्टाने /प्रत्यक्ष सादर करणे, हे आहेच. यासाठी अर्ज वरील लिंकवरच उपलब्ध आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड”ची हक्कभाग विक्री

आता या प्रकरणी माझी भुमिका काय?? सांगतो..

 • मी मला प्राप्त हक्कभागांकरिता अर्ज करेनच, शिवाय  काही अधिक भाग मिळावेत यासाठीही अर्ज करेन. 
 • असे, किंमतीचा अंशतः भरणा (Partly Paid) झालेले समभाग (Shares) बाजारात वेगळया नाव व संकेतांकाने (ISIN Code ) नोंद  होतात. त्यांचे  वेगळे  सौदे  होतात, त्यांचा भावही वेगळा असतो.
 • माझ्या समजुतीने एखाद्या  शेअरची किंमत ज्या हिशेबाने ‘X-Div’ झाल्यावर कमी होते. तसेच  हे ‘पार्ट्ली पेड’  शेअरचे  सौदे.
 • मूळ  शेअर्सच्या चालू किमतीतून अजून न दिलेली किंमत (रु. ९४३) वजा करुन व्हायला हवेत. म्हणजेच रिलायन्सच्या मूळ शेअरचा  भाव रु. १४४० असल्यास, ह्या  राईटसचा  भाव (१४४०-९४३) साधारणतः रु.५०० च्या आसपास असायला हवा.
 • येथे हे केवळ उदाहरण दिले असून रिलायन्सचा भाव किती असेल? हे मी सुचविलेले नाही. उलट याचवेळी हे लक्षात ठेवायला हवे की आजच्या भावापेक्षा अशा राईटसच्या नोंदणीनंतर बाजारात विक्री स्वरुपात पुरवठा वाढल्याने भावावर अर्थातच थोडा विपरीत परिणाम होणे अपेक्षित आहे.
 • जर मी वर गृहित धरल्याप्रमाणे या राईटसची किंमत ठरली, तर रिलायन्सने आत्ता फक्त २५% रक्कमच मागितली असल्याने आधीच नावावर असलेला एक रिलायन्स शेअर विकून मी जर चार नवे राईट्स मिळवू शकतो, तर माझ्या दृष्टिने हा सौदा अधिक फायदेशीर आहे.
 • शिवाय समजा तसे नाही  झाले आणि  किंमत माझ्या सुत्रापेक्षा थोडी कमी राहिली तरीही फारसे बिघडत नाही कारण असे  ‘Partly Paid’ शेअर्स घेणे म्हणजे कंपनीचा दीर्घकालीन ‘Call Option’ घेण्यासारखेच, किंबहुना त्यापेक्षाही चांगले आहेत. 
 • समजा, रिलायन्सचा भाव खूपच खाली गेला, तर कंपनी राहीलेले पैसे मागू शकणार नाही आणि भाव वर गेला, तर पैसे द्यायला मला काहीच वाईट वाटणार नाही.. आहे की नाही गंमत !

भांडवलबाजार : समभाग आणि रोखे

 • कंपनी कायद्याच्या माझ्या माहितीनुसार कंपनीने अशा अंशतः भरणा झालेल्या समभागांची उर्वरित रक्कम कधी मागावी? याला कायद्याने कोणतीही शेवटची कालमर्यादा नाही.
 • अशा हक्कभागांची  विक्री करुन कंपनी व्यवस्थापनाने पैसे उभारणीची एक विश्वसनीय प्रासंगिक  व्यवस्था करुन ठेवली आहे ईतकेच. याचा अर्थ  ठरल्या  दिवशी  पैसे  मागायलाच  हवेत अशी सक्ति  कंपनीवर अजिबातच  नाही.
 • अशा बाकीच्या पैशांची मागणी केल्यास प्रसाद भागवतांबरोबरच स्वतः मुकेशभाई आणि कंपनीलाही त्यांच्या वैयक्तिक खिशातून भागवत आणि अन्य रिटेल गुंतवणुकदारांच्या भारंभार पैसे टाकावे लागणार असल्याने, अशी मागणी फार निकड लागल्याशिवाय, लगेचच्या काळात होईल असे  वाटत  नाही.
 • अशा इश्युत काही ना काही कारणाने अर्ज न करणारे असतातच अनेकांचे अर्ज तांत्रिक चुकीने बाद  होतात. असे न वाटले गेलेले शेअर्स जास्त मागणी केलेल्या अर्जदारांच्यात वाटले जातात, म्हणून आपल्याला हक्काने मिळालेल्या शेअर्सपेक्षा थोडी जास्त मागणी करणे उचित ठरते.
 • अर्थात अशी जास्तीची मागणी मान्य  होईलच, याची हमी मात्र नसते. असे अतिरिक्त शेअर्सकरिता अर्ज का करावे?? याचे स्पष्टीकरणार्थ एक तांत्रिक मुद्दाही (माहितीकरिता) सांगतो.

भांडवल बाजारामध्ये गुंतवणूक करताय? मग आधी हे वाचा

 • सर्वांना  माहिती आहेच की  रिलायन्स  हा आपल्या बाजाराच्या निर्देशांकातील  सर्वात जास्त  वजनाचा (Weightage)  शेअर आहे. सहाजिकच प्रत्येक ‘Index Fund’ मधील तो मोठा घटक असतो. मात्र ह्या नवीन राईट्सचे अस्तित्व मूळ रिलायन्स्पेक्षा वेगळे असल्याने तांत्रिकदृष्ट्या ते ‘Index’ चा घटक नसतील, म्हणून नियमावलीप्रमाणे ‘Index Fund’ रिलायन्सचे  शेअरहोल्डर असूनही या राईट्स करिता अर्ज करु शकणार नाहीत. (अर्थात ते हा हक्क विकू शकतातच )

एकुणांत या सर्व बाबींचा विचार करता ‘चार आण्यांत रुपयाच्या मालाचे’ बुकिंग का  करु  नये म्हणतो मी? – 

प्रसाद भागवत 

(महत्वाची सुचना-  ही पोस्ट केवळ माहिती म्हणूनच दिली आहे. कोणत्याही प्रकारच्या खरेदी किंवा विक्रीची शिफारस म्हणून नाही  )

Download Arthasaksharr App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…