Reading Time: < 1 minute

आरोग्यम् धनसंपदा! आरोग्य हिच संपत्ती असं आपल्या पूर्वजांनी सांगितलं आहे आणि ते खरंच आहे. पण आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण आपल्या आरोग्याचा फारसा विचारच करत नाही. महागडी घरं ,उत्तम फर्निचर, आलिशान कार यांवर मुक्तहस्ते  खर्च करताना विचार न करणारी मंडळी मात्र, आरोग्य तपासणीच्या बाबतीत मात्र उदासीन असतात. आरोग्यविमा (मेडिक्लेम) बद्दलची जागरूकता बऱ्यापैकी दिसून येत असली, तरीही “आरोग्य तपासणी” बद्दल एकूणच उदासीनता दिसून येते. पूर्वी काही विमा कंपन्या आरोग्य तपासणी केल्याशिवाय ग्राहकाला पॉलिसी देत नसत. सद्ध्या ही तपासणी बंधनकारक नसली, तरी अनेक विमा कंपन्या आरोग्य विमा घेण्याऱ्या ग्राहकांसाठी मोफत आरोग्य तपासणीची सुविधा देतात. पण किती ग्राहक या सुविधेचा लाभ घेतात, हा मुद्दा विचार करण्यासारखा आहे. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, “Prevention is better than cure”. म्हणजेच “उपचार करण्यापेक्षा काळजी घेणं कधीही चांगलं.  अनेक हॉस्पिटल्स / लॅबोरेटरीज वेगवेगळ्या आरोग्य तपासण्यांवर काही ट्क्क्यांची सूट (डिस्काऊंट) देतात अथवा  “आरोग्य तपासणी शिबीर” आयोजित करतात.  आपल्या सरकारनेही आरोग्य तपासणीवर (प्रिवेंटीव्ह मेडिकल चेकअप) करसवलत (एक्झम्पशन) दिली आहे. 

आयकर कायदा १९६१ च्या, कलम ८०डी नुसार व्यक्ती (इंडीव्हिज्यूअल) किंवा हिंदू अविभक्त कुटुंब यांना स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबासाठी केलेल्या प्री मेडीकल चेकअप वर वजावट (डिडक्शन) मिळू शकते.

कलम ८०डी नुसार व्यक्ती अथवा हिंदू अविभक्त कुटुंब

  1. स्वतःसाठी 
  2. अवलंबून असणारी मुले (डिपेन्डेन्ट चिल्ड्रन)
  3. पालक (डिपेन्डेन्ट/नॉन-डिपेन्डेन्ट पॅरेन्ट्स)

यांसाठी केलेल्या प्री मेडीकल चेकअपच्या खर्चावर करवजावट मागू शकतात. 

प्री मेडीकल चेकअप आणि कर-वजावटीच्या मर्यादा-

स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी मिळून प्री मेडीकल हेल्थ चेकअप वर केलेल्या खर्चापैकी एकूण रु. ५०००/-  इतकी रक्कम कर-वजावटीस पात्र आहे. 

कलम ८०डी नुसार आरोग्यविम्याच्या हप्त्यासाठीची कर-वजावटाीची मर्यादा रु. २५,०००/- इतकी आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी ही मर्यादा रु. ३०,०००/- इतकी आहे. प्री-मेडीकल हेल्थ चेकअप आणि आरोग्यविम्याचा  हप्ता असे दोन्ही मिळून ह्या मर्यादा ठरविण्यात आल्या आहेत. 

खालील तक्त्यावरुन आरोग्य विमा आणि आरोग्य तपासणीसाठी असणारी वजावट स्पष्ट होते. 

काही महत्वाचे मुद्दे-

  1. आरोग्य तपासणीवर (प्रिवेंटीव मेडिकल चेकअप) फक्त रु. ५०००/- इतक्या  रकमेपर्यंतच्या खर्चावर कर-सवलत (exemption) मिळू शकते.
  2. सन २०१७ पासून सर्व आर्थिक व्यवहारांवर १८% GST लागू केला जातो.

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.