आरोग्य आणि स्वास्थ्याच्या माध्यमांतून कर वजावटी देणारी कलमं

Reading Time: 2 minutes

कर वाचवण्यासाठी आरोग्य आणि स्वास्थ्याच्या माध्यमांतून कर वजावटी देणारी कलमं-

1. ८० डी-

 • आयकर कायद्याच्या कलम ८० डी अंतर्गत पुढील गोष्टींवर कर-सवलत मिळते-
 • स्वतःच्या, जोडीदाराच्या किंवा आपल्यावर अवलंबून मुलांच्या आणि आई-वडिलांच्या मेडिक्लेम किंवा आरोग्य विम्यासाठी भरले जाणारे हप्ते
 • वय वर्ष ६० च्या खालील व्यक्तींसाठी जास्तीत जास्त रू. २५,००० आणि वय वर्ष ६० वरील व्यक्तींसाठी जास्तीत जास्त रू. ३०,००० इतकी वजावट मिळू शकते.
 • आपल्या पालकांसाठी आरोग्यविमा घेतल्यास रू. २५,००० ची जास्तीची वजावट घेता येऊ शकते. पालकांपैकी कोणी एक ज्येष्ठ नागरिक असल्यास ही वजावट रू.३०,००० इतकी वाढवून मिळते.
 • ही वजावट आई-वडिल तुमच्यावर अवलंबून असले अथवा नसले तरी मिळते.
 • अशी वजावट सासरच्या व्यक्तींसाठी मिळणार नाही.
 • कुटुंबाच्या कोणत्याही व्यक्तीसाठी भरलेल्या हप्त्यावर हिंदू अविभक्त कुटुंब अशा प्रकारची वजावट उचलू शकते.
 • फक्त रोख भरलेल्या रकमेवरच ही वजावट मिळते.

2. ८० डीडी

 • तुमच्यावर अवलंबून असणाऱ्या अपंगत्व असलेल्या व्यक्तीच्या देखभालीची आणि वैद्यकीय खर्चाची वजावट ८० डीडी अंतर्गत मिळते.
 • अशा परिस्थितीत प्रत्यक्ष झालेला खर्च किंवा रू. ७५,००० ह्यापैकी कमी असलेल्या रकमेचा खर्च वजावट म्हणून प्राप्त होतो. (अपवादात्मक गंभीर परिस्थितीत हा खर्च रू. १,२५,००० इतका मान्य होतो.)
 • अवलंबून असणाऱ्या व्यक्तींमध्ये आई-वडिल, जोडीदार, मुले किंवा भावंड यांचा समावेश होतो, परंतू ह्यांपैकी कोणीही वैयक्तिक वजावट मिळवलेली नसावी.
 • गंभीर अपंगत्व म्हणजे ८०% किंवा त्याहीपेक्षा जास्त अंपगत्व.
 • ही वजावट मिळवण्यासाठी राज्य किंवा केंद्र सरकारच्या मेडिकल बोर्डाने सादर केलेले अंपगत्वाचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
 • आरोग्य विमा हा करदात्याच्या नावाने असावा आणि लाभार्थी म्हणून अपंग व्यक्तीचे नाव असावे.
 • लाभार्थीचा तुमच्या आधी मृत्यू झाल्यास विम्याच्या मूळ रक्कमेची परतफेड होऊन ते तुमचे उत्पन्न म्हणून धरले जाते आणि करपात्र असते.
 • खालीलपैकी ४०%  किंवा त्यापेक्षा अधिक अपंगत्व असणाऱ्या आजारांचा खर्च वरील नियमांप्रमाणे करमुक्त असेल.

१ .अंधत्व आणि दृष्टीसंबंधित इतर समस्या

२. श्रवण समस्या

३. कुष्ठरोग

४. लोकोमोटर अपंगत्व

५. मानसिक दुर्बलता व आजार

 • पुढीलपैकी एकाच मार्गे ही सवलत प्राप्त करता येईल.

१. वैद्यकीय उपचार, प्रशिक्षणासाठी केलेला खर्च किंवा आपल्यावर अवलंबून असणाऱ्या अपंग व्यक्तीचं पुनर्वसन(नर्सींगचा खर्च धरून)- किंवा

२. तुमचा अकाली मृत्यू झाल्यास तुमच्यावर अवलंबून अपंग व्यक्तीच्या विम्यासाठी भरलेली रक्कम

3. ८० डीडीबी-

 • बजेट २०१८मध्ये या कलमात करण्यात आलेल्या नविन सुधारणांनुसार इथून पुढे या खर्चाची मर्यादा ज्येष्ठ व अतिज्येष्ठ वर्गासाठी एक लाख रूपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
 • अशी वजावट मिळवण्यासाठी पुढील आजार गणनापात्र आहेत-

१.मज्जासंस्थेसंबंधित (न्युरॉलॉजिकल) आजार

२. पार्किन्सन्स आजार

३. घातक (मॅलिग्नंट) कर्करोग

४. एड्स

५. क्रोनिक रेनल फेल्युअर

६. हिमोफिलीया

७. थॅलेसिमीया

4. ८० यू-

 • या कलमाअंतर्गत करदाता काही विशिष्ट अपंगत्व किंवा आजाराशी सामना करत असेल तर तो कर-वजावटीस पात्र होतो.
 • ४० टक्के किंवा त्याहून अधिक अपंगत्वासाठी रू. ७५,००० इतकी तर ८० टक्के व त्यापेक्षा अधिक अपंगत्वासाठी रू. १,२५,००० इतक्या रकमेपर्यंतची कर-वजावट मागता येते.
 • ही वजावट मिळवण्यासाठी न्युरॉलॉजिस्ट किंवा सिव्हिल सर्जन किंवा सरकारी इस्पितळाच्या आरोग्य अधिकाऱ्याने सादर केलेले अंपगत्वाचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
 • अशी वजावट मिळवण्यासाठी पुढील आजार गणनापात्र आहेत-

१. अंधत्व आणि इतर नजरदोष

२. कुष्ठरोग

३. श्रवणदोष

४. लोकोमोटर अपंगत्व

५. मानसिक दुर्बलता व आजार

६. ऑटिजम

७. सेरेब्रल पॅल्सी

(चित्र सौजन्य- https://goo.gl/5J7F95 )

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!