Reading Time: 3 minutes

आयकर कायदा १९६१, नुसार कलम ८० मध्ये करबचतीचे विविध पर्याय नमूद करण्यात आले आहेत. मागील भागात कलम ८० सी अंतर्गत गुंतवणुकीच्या विविध पर्यायांची माहिती घेतली. या भागात उर्वरित सबसेक्शनस् अंतर्गत नमूद करण्यात आलेल्या करबचतीचे विविध पर्यायांची माहिती घेऊया.

आरोग्य विमा ८० डी (Health Insurance 80D):

सध्याच्या काळात आरोग्य विमा ही अत्यावश्यक गोष्ट आहे. व्यक्ती स्वतःसाठी व स्वतःच्या कुटुंबासाठी आरोग्य विमा पॉलिसी खरेदी करू शकते. आरोग्य विम्यामध्ये केलेली गुंतवणूक करवजावटीस (Tax Deduction) पात्र आहे.

  • असेसमेंट इअर २०१८-१९ साठी आरोग्य विम्यांतर्गत मिळणारी करवजावट:
    • स्वतंत्र व्यक्तीसाठी (Individual) आरोग्य विमा मर्यादा रु. २५,०००/- पर्यंत (आरोग्य तपासणी खर्चासाहित)
    • ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य विमा मर्यादा रु. ३०,०००/- पर्यंत (आरोग्य तपासणी खर्चासाहित).
    • करदात्याने स्वतःसाठी किंवा स्वत: च्या कुटुंबातील किंवा पालकांच्या कुटुंबियांना रु. ३०,०००/- रूपयांपर्यंत आरोग्य खर्च केल्यास वैद्यकीय/ आरोग्य खर्चाचा दावा केला जाऊ शकतो. वर नमूद केलेल्या मर्यादेनुसार करदात्याला जास्तीत जास्त ६०,,०००/- रुपयांपर्यंत टॅक्स बेनिफिट (करवजावट )मिळू शकते.
    • २०१९ – २० या आर्थिक वर्षासाठी वरिष्ठ (Senior) आणि वरिष्ठ ज्येष्ठ नागरिकांसाठीची (Super Senior citizens) मर्यादा ५०,०००/- रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यानुसार करदात्याला जास्तीत जास्त रु. १,००,०००/- रुपयांपर्यंतची कारवाजावत मिळू शकते. मिळतो. सदरची करवजावट फक्त वरिष्ठ (Senior) आणि वरिष्ठ ज्येष्ठ नागरिकांसाठीच (Super Senior citizens) लागू करण्यात आलेली आहे.

बचत खात्यावरील व्याज (८० टीटीए ):

  1. बचत खात्यावर मिळणाऱ्या व्याजावर रु. १००००/- पर्यंतची करवजावट मिळते.
  2. आर्थिक वर्ष २०१८-१९ पासून वरिष्ठ (Senior) आणि वरिष्ठ ज्येष्ठ नागरिकांसाठी बचत खात्यावर मिळणाऱ्या व्याजाच्या रकमेवरील वजावटीची मर्यादा रु.१०,०००/- वरून रु.५०,०००/- रकमेपर्यंत वाढविण्यात आली आहे.
  3. एफडी (FD) वर मिळणाऱ्या व्याजासाठी करवजावट मिळत नाही.

बचत खाते आणि एफडीवरील व्याज (८० टीटीबी):

  1. आर्थिक वर्ष २०१८-१९ पासून (असेसमेंट इअर २०१९-२०) वरिष्ठ (Senior) आणि वरिष्ठ ज्येष्ठ नागरिकांसाठी बचत खाते आणि एफडीवर मिळणाऱ्या व्याजाच्या रकमेवरील वजावटीची मर्यादा रु.५०,०००/- करण्यात आली आहे.
  2. कलम ८० टीटीए अंतर्गत करवजावटीचा लाभ घेणाऱ्या करदात्यांना कलम ८० टीटीबी अंतर्गत करवजावट मिळत नाही.
  3. कलम ८० टीटीए आणि कलम ८० टीटीबी या दोन्हीसाठी करवजावट मर्यादा रु. ५०,०००/- आहे.

शैक्षणिक कर्जावरील व्याज (८० इ):

  1. यासाठी कोणतीही मर्यादा निश्चित करण्यात आलेली नसून व्याजाच्या रकमेवर संपूर्णतः करवजावट मिळते.
  2. स्वतःसाठी, जोडीदारासाठी, स्वतःच्या मुलांसाठी अथवा ज्या मुलांचे कायदेशीर पालकत्व (legal guardianship) स्वीकारले आहे अशा मुलांसाठी; यापैकी कोणाच्याही उच्चशिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज घेतलेले असल्यास त्यावरील व्याजावर संपूर्णतः करवजावट मिळते.
  3. शैक्षणिक कर्जाच्या मुद्दलाच्या रकमेवर मात्र करवजावटीसाठी क्लेम (दावा) करता येत नाही.
  4. करवजावट ही ८ वर्ष अथवा व्याजाची रक्कम संपूर्ण भरून होईपर्यंतचा कालावधी, यापैकी जो कालावधी आधी असेल तेवढ्याच कालावधीसाठी उपलब्ध आहे.

देणगी (Donations) ८०जी:

  1. करपात्र उत्पन्न ठरवण्यापूर्वी एकूण निव्वळ उत्पन्नातून (gross total income) ठराविक संस्थांना अथवा कपात धर्मादाय संस्थांना देण्यात आलेली डोनेशन्स (देणग्या) वजा केल्या जातात.
  2. कलम 80 जी अंतर्गत डोनेशन्सवरील वजावट टक्केवारी नियमांनुसार निश्चित केली जाते. देणगी देण्यात आलेल्या रकमेच्या वजावटीसाठी नियमांनुसार १००% अथवा ५०% रकमेसाठी दावा करता येतो.

देणगी (Donations) ८०जीजीए:

  1. वैज्ञानिक संशोधन किंवा ग्रामीण विकासासाठी दिल्या जाणा-या देणग्यांच्या रकमेसाठी संपूर्णत: करवजावट मिळते. परंतु;
    1. रोख रक्कम वगळता रु. १०,०००/- पेक्षा देण्यात आलेल्या जास्तीच्या रक्कमेवर करवजावट मिळत नाही.
    2. ज्या करदात्याचं एकूण उत्पन्न (gross total income) “प्रॉफिट अँड गेन्स फ्रॉम बिझनेस ऑर प्रोफेशन” या शीर्षकाखाली चार्जेबल असेल तर करदात्याला या कलमाअंतर्गत करवजावटीसाठी क्लेम (दावा) करता येणार नाही.

देणग्या (Donations) ८०जीजीसी:

  1. मान्यताप्राप्त राजकीय पक्ष किंवा मतदारसंघ यांना देण्यात आलेल्या देणगीवर संपूर्णतः करवजावट मिळते.
  2. मात्र यासाठी सदरची देणगी चेक, डिमांड ड्राफ्ट किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे देणे आवश्यक आहे. देणगी रोख रकमेच्या (कॅश) स्वरूपात असल्यास करवजावट मिळण्यास पात्र नाही.

(चित्रसौजन्य: https://bit.ly/2QN0I29 )

करबचतीचे सोपे मार्ग, योग्य आरोग्य विम्याची निवड, आरोग्य आणि स्वास्थ्याच्या माध्यमांतून कर वजावटी देणारी कलमं,

३१ मार्चच्या आधी कर वाचवायचे ७ पर्याय

(आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला [email protected] वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर‘ या नावाने सेव्ह करून ह्या नंबरवर ‘अपडेट’ (Update) असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)

Disclaimer: आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/ या लिंकवर क्लिक करा.आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/ | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.
Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

TDS: टीडीएस म्हणजे नक्की काय?

Reading Time: 2 minutes अनेक खर्च एखाद्या देशाच्या सरकारला देशासाठी करायचे असतात. त्यासाठी सरकारच्या तिजोरीत काही पैसे प्रत्यक्ष जमा व्हावे लागतात. त्यासाठी सरकार नागरिकांकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर (Direct-Indirect Taxes) गोळा करत असते. सरकारसाठी/ सरकारच्या अर्थ खात्यासाठी हे कर गोळा करण्याचे काम आयकर खाते (Income Tax Department) करते. टीडीएस (TDS) ही आयकर खात्याने यासाठीच सुरू केलेली एक प्रणाली आहे. हिच्यामुळे सरकारच्या तिजोरीत वेळच्या वेळी कर जमा होतो.  या प्रणालीमुळे प्रत्यक्ष कर गोळा करणे सरकारला सोपे जाते.

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…