Reading Time: 2 minutes
  • सामान्य व्यक्तीसाठी कर्ज घेताना कायदेशीर बाबी समजून घेणे हा क्लिष्ट विषय असतो. जेव्हा कर्ज घेण्याचा विषय येतो तेव्हा सामान्यपणे त्यातील काही कलमे तुम्हाला मक्कीच माहिती असायला हवीत. 
  • गृहकर्ज (Home Loan) घेताना भावनेच्या भरात फसवणूक होऊ नये म्हणून पुढील १० कलमे समजून घ्या. गृहकर्ज करारातील कलमे समजून घेणे गरजेचे असून वेळप्रसंगी बँकेला अटींमध्ये बदल करण्याचा अधिकार तुम्हाला देतात. 

 

१) व्याज दर कलम (Interest Rate Clause)

  • व्याज दर  कलम आरबीआय द्वारे निर्धारित केलेल्या निधी दरातील कर्ज दरांच्या संदर्भातील आहे. 
  • कर्ज दरातील किरकोळ खर्चाच्या चढ उतारांमधील  व्याजदर बदलण्याबाबत  हे कर्जदारास माहिती देते. जेव्हा आपण गृहकर्ज घेतो तेव्हा त्यातील व्याजदर फिक्स्ड आहे की बदलता आहे याची खात्री करायला हवी. 

 

२) प्रिपेमेन्ट क्लॉज ( Prepayment Clause)

  • जेव्हा तुम्ही गृहकर्ज घेता तेव्हा ईएमआय पेक्षा जास्त रक्कम भरता तेव्हा या अतिरिक्त रकमेला कर्जाचे प्रिपेमेन्ट म्हटले जाते. आपले कर्ज लवकर संपण्यासाठी प्रीपेमेन्ट करणे ग्राहकाचा हक्क आहे. 
  • कर्ज घेतानाच प्रिपेमेन्ट कलम व्यवस्थितपणे तपासा आणि जास्तीची रक्कम भरण्यासाठी बजेट तयार ठेवा.

 

३) सुरक्षा कव्हर क्लॉज (Security Cover Clause)

  • जेव्हा तुमच्या कर्जासाठीच्या तारण मालमत्तेचे मूल्य कर्जापेक्षा कमी होते तेव्हा अतिरिक्त रक्कम भरण्यास आपण बांधील असता. 
  • कर्ज घेत असताना या कलमाचा अभ्यास करावा कारण त्याचा परिणाम ग्राहकाच्या आर्थिक परिस्थितीवर पडत असतो. 

 

४) डिफॉल्टची व्याख्या (Definition of Default)

  • जेव्हा ग्राहक कर्जाच्या कालावधीमध्ये त्याची परतफेड करण्यास अयशस्वी होतो तेव्हा डिफॉल्ट होतो असे म्हटले जाते. 
  • बँकेच्या दृष्टीने नक्की कसा व केव्हा डिफॉल्ट होतो हे समजून घेण्यासाठी डिफॉल्टच्या व्याख्येतील अटी आणि परिणाम अभ्यासा. 

 

नक्की वाचा – तरुण वयात घर विकत घेण्यासाठी ‘या’ १० स्मार्ट टिप्स

 

५) अधिसूचना क्लॉज (Notification Clause)

  • अधिसूचना खंड ग्राहकाने त्याच्या बदललेल्या नोकरी, व्यवसाय, उत्पन्न, पत्यातील बदल आणि निवासी स्थिती यासंदर्भातील आहे. 
  • जेव्हा यामधील कोणत्याही बाबीत बदल होतो तेव्हा त्यासंदर्भातील माहिती बँकेला देण्यात यावी असे यामध्ये सूचित करण्यात आलेले असते. 

 

६) तृतीय पक्ष असाईनमेंट क्लॉज (Third-Party Assignment Clause)

  • तुम्ही कर्ज बुडवल्याच्या संदर्भात तृतीय पक्ष असाईनमेंट क्लॉज आहे. या कलमात दिल्यानुसार तुमचे कर्ज दुसऱ्या पक्षाकडे हस्तांतरित केले जाते.
  • तुमचे कर्ज म्हणजे बँकेच्या दृष्टीने मालमत्ता असते.  कर्जदार डिफॉल्ट झाल्यास बँक तुमचे कर्ज तुमच्या परवानगीशिवाय वसुलीसाठी असेट कन्स्ट्रक्शन कंपनीला विकते. 

 

७) फोर्स मॅज्योर  (Force Majeure) 

  • फोर्स मेज्योर या कलमाच्या साहाय्याने गृहकर्जावर निश्चित व्याजदर ठरवून परतफेड करू शकता. पण जेव्हा अपवादात्मक परिस्थिती उद्भवते तेव्हा यामध्ये बदल केले जाऊ शकतात. 
  • जेव्हा तुम्ही गृहकर्जाची बारकाईने शहनिशा करता तेव्हा फोर्स मॅज्योर पूर्णपणे टाळला जाऊ शकतो. 

 

८) दुरुस्ती कलम (Amendment Clause)

  • दुरुस्ती कलम हे कर्जाची परतफेड करण्यात अडचण आल्यास अटींमध्ये बदल करण्यास मान्यता देते. हे बदल शक्यतो ग्राहकांच्या गैरसोयीचे ठरू शकतात. 
  • कर्ज प्रकरणातील कोणत्याही अटी बदलण्यापूर्वी ग्राहकाने लिखित संमती घेणे आवश्यक असते. प्रत्येक पक्षाचे दायित्वे आणि अधिकार यामध्ये स्पष्ट करण्यात आलेले असतात. 

 

महत्वाचा लेख – कर्जासाठी जामीन राहताय? थांबा आधी हे वाचा

 

९) इतर शिल्लक रक्कम (Other Balances Clause)

  • इतर शिल्लक रक्कम  कलमामध्ये कर्जदाराने केलेले पेमेंट प्रथम अथवा इतर शिल्लक रक्कम प्रथम वसूल केली जाईल. उशिरा करण्यात आलेले पेमेंट हे आधी प्रक्रिया शुल्कात किंवा दंड व्याजात वळवले जाते. 
  • जेव्हा इतर शिल्लक रक्कम पूर्णपणे वसूल केली जाते तेव्हाच ईएमआय आणि मूळ परतफेडीची रक्कम वसूल केली जाते. 

 

१०) वितरण कलम ( Disbursement Clause)

  • जेव्हा ग्राहक  गृहकर्ज घेतो  तेव्हा बँक किंवा संबंधित संस्थेकडून मिळणारे कर्ज नेहमीच त्याला दिले जात नाही. तुमचे कर्ज घर विकणाऱ्या बिल्डरच्या अकाउंटला वर्ग केले जाते. 

 

गृहकर्ज घेताना कर्ज करारामधील काही कलमे योग्य नाहीत असे समजले तर करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी त्यासंदर्भातील स्पष्टीकरण बँकेकडून मागा. गृहकर्ज घेण्याचा निर्णय अभ्यासपूर्ण पद्धतीने घ्या. 

नक्की वाचा  – Interest on Home Loan: तुम्ही तुमच्या गृहकर्जाची परतफेड करताना व्याजच अधिक भरताय?

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

TDS: टीडीएस म्हणजे नक्की काय?

Reading Time: 2 minutes अनेक खर्च एखाद्या देशाच्या सरकारला देशासाठी करायचे असतात. त्यासाठी सरकारच्या तिजोरीत काही पैसे प्रत्यक्ष जमा व्हावे लागतात. त्यासाठी सरकार नागरिकांकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर (Direct-Indirect Taxes) गोळा करत असते. सरकारसाठी/ सरकारच्या अर्थ खात्यासाठी हे कर गोळा करण्याचे काम आयकर खाते (Income Tax Department) करते. टीडीएस (TDS) ही आयकर खात्याने यासाठीच सुरू केलेली एक प्रणाली आहे. हिच्यामुळे सरकारच्या तिजोरीत वेळच्या वेळी कर जमा होतो.  या प्रणालीमुळे प्रत्यक्ष कर गोळा करणे सरकारला सोपे जाते.

आयकर विभागाची नोटीस आली आहे? घाबरू नका, आधी हे वाचा

Reading Time: 4 minutes टॅक्स, टॅक्स रिटर्न हे शब्द जरी ऐकले तरी करदाता काहीसा नाराज होतो. त्यात जर का आयकर विभागाकडून कुठली नोटीस आली तर ही नाराजी भीतीमध्ये बदलते. आयकर विभागाकडून आलेल्या कोणत्याही नोटीसमुळे अथवा पत्रामुळे करदाते घाबरून जातात. तथापि, कलम १४३(१) सूचना म्हणजे काळजी करण्याची गरज नाही. या लेखात आम्ही कलम १४३(१) च्या अंतर्गत पाठविलेल्या सूचनांबद्दल तपशीलवार चर्चा करणार आहोत जेणेकरून करदात्यांना याबद्दलची संपूर्ण माहिती मिळेल.

कलम ८० अंतर्गत करबचतीचे विविध पर्याय

Reading Time: 3 minutes आयकर कायदा १९६१, नुसार कलम ८० मध्ये करबचतीचे विविध पर्याय नमूद करण्यात आले आहेत. मागील भागात कलम ८० सी अंतर्गत नमूदकेलेल्या विविध पर्यायांची माहिती घेतली. या भागात उर्वरित सबसेक्शन अंतर्गत नमूद करण्यात आलेल्या करबचतीचे विविध पर्यायांची माहिती घेऊया.

आयकर खात्याच्या मदतीने आयटीआर फॉर्म भरणे होईल सुलभ

Reading Time: 2 minutes कर भरणाऱ्याला जो आयटीआर फॉर्म लागू होतो त्याची निवड करणे हे फॉर्म…