Reading Time: 2 minutes

कर भरणाऱ्याला जो आयटीआर फॉर्म लागू होतो त्याची निवड करणे हे फॉर्म भरत असताना सर्वात कठीण काम असते. कर दात्यांना आयटीआर १ पासून आयटीआर ७ पर्यंतचे फॉर्म निवडता येतात. त्यामध्ये उत्पन्नाचा मार्ग, उत्पन्नाचे स्वरूप आणि इतर घटकांची माहिती सविस्तर भरायची असते. 

 

ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने सर्वांसाठी एकच फॉर्म बनवण्याचे निश्चित केले आहे. त्यांनी एक सामान्य फॉर्म बनवला असून सामान्य लोक आणि भागीदारांकडून फॉर्म बद्दलचे फीडबॅक मागवले आहेत. आयकर फॉर्म भरत असताना अचूक माहिती टाकणे महत्वाचे असते. 

 

सामान्य आयटीआर फॉर्ममागील तर्क – 

  • सामान्य आयटीआर फॉर्मचा उद्देश कर भरण्याची प्रक्रिया सोपी आणि कमी वेळेत व्हावी अशी अपेक्षा असते. सर्वच आयटीआर फॉर्म सामान्य फॉर्म मध्ये बदलले जाऊ शकत नाहीत. 
  • काही आयटीआर फॉर्म पूर्वीच्या पद्धतीनेच भरावे लागतील. पण सामान्य लोकांना योग्य प्रकारे उपयोग व्हावा म्हणून आयटीआर फॉर्मचे स्वरूप बदलण्यात आले आहे. 

 

आयटीआर फॉर्मचे वर्गीकरण –

  • आयटीआर १ चा भरणा हा तुमचे स्वतःचे घर असल्यास करावा लागतो. वर्षभरात ५० लाखांपर्यंतची कमाई असल्यास आयटीआर १ भरण्याचा सल्ला दिला जातो. करदात्याला महिन्याला नोकरी करून पगार येत असल्यास किंवा इतर मार्गानी पैसे येत असल्यास आयटीआर १ मधूनच फॉर्म भरावा लागतो. 
  • आयटीआर २ फॉर्मचा वापर करदात्याकडे भांडवली नफ्याच्या स्वरूपात उत्पन्न असल्यास, एकापेक्षा जास्त घरांचे भाडे येत असेल, परदेशात मालमत्ता असेल किंवा परकीय उत्पन्न कमावत असले तर ते भरावे लागू शकते. आयटीआर २ फॉर्म तेव्हा भरावा लागतो  जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीवर संचालक पदी असता किंवा  स्वतःच्या नावावर असूचिबद्ध शेअर असतात तेव्हा हा फॉर्म भरावा लागतो. 
  • आयटीआर ३ हा उद्योजक आणि व्यावसायिकांना भरायचा सल्ला दिला जातो कारण त्यांना पगारी उत्पन्न मिळत नसते. आयटीआर २ भरणारे करदाते आयटीआर ३ भरण्यासाठी पण पात्र आहेत. 
  • आयटीआर ५ आणि आयटीआर ६ हा फॉर्म मर्यादित दायित्व भागीदारी आणि व्यवसायांमध्ये असलेल्या करदात्यांना भरावा लागतो. हे सगळे फॉर्म ज्यांना नोकरी करून पगार येत नाही त्यांच्यासाठी आहेत. सामान्य करदात्यांना होय किंवा नाही पद्धती मध्येच फॉर्म भरावा लागतो आणि त्यानुसारच माहिती विचारलेली असते. 

 

नक्की वाचा : जाणून घ्या आयटीआर फॉर्म ५ बद्दलची सविस्तर माहिती 

 

सामान्य फॉर्म मध्ये ४० प्रश्न अशा पद्धतीने विचारण्यात आलेले असतात की एखाद्या प्रश्नाचे उत्तर नाही आल्यास त्याच्याशी संबंधित इतर प्रश्न त्याला विचारण्यात येत नाहीत. 

 

आयटीआर फॉर्ममधील बदलावर तज्ज्ञांचे मत –

  • आयटीआर फॉर्म मध्ये बदल होण्याची ही पहिली वेळ नाही. तज्ज्ञांच्या मते आयटीआर फॉर्ममध्ये बदल करणे चांगले नाही. कर खात्याने हे ध्यानात घ्यायला हवे की कर भरण्याच्या प्रक्रियेत कायमच बदल केल्यामुळे करदात्यांना अस्वस्थता निर्माण होत असते.
  •  नवीन प्रक्रिया शिकून आयटीआर भरणे सामान्य करदात्यांनी शिकून घ्यायला हवे. 

 

मागील वर्षी नवीन पोर्टल सुरु झाल्यानंतर अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यावेळी असे झाल्यामुळे अनेक जणांना कर भरताना अडचण निर्माण झाली होती. 

नक्की वाचा : बँक व्यवहार, परदेशी सहली आणि वीज बिल ठरवणार तुमचा ‘आयटीआर’

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

TDS: टीडीएस म्हणजे नक्की काय?

Reading Time: 2 minutes अनेक खर्च एखाद्या देशाच्या सरकारला देशासाठी करायचे असतात. त्यासाठी सरकारच्या तिजोरीत काही पैसे प्रत्यक्ष जमा व्हावे लागतात. त्यासाठी सरकार नागरिकांकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर (Direct-Indirect Taxes) गोळा करत असते. सरकारसाठी/ सरकारच्या अर्थ खात्यासाठी हे कर गोळा करण्याचे काम आयकर खाते (Income Tax Department) करते. टीडीएस (TDS) ही आयकर खात्याने यासाठीच सुरू केलेली एक प्रणाली आहे. हिच्यामुळे सरकारच्या तिजोरीत वेळच्या वेळी कर जमा होतो.  या प्रणालीमुळे प्रत्यक्ष कर गोळा करणे सरकारला सोपे जाते.

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…