Reading Time: 3 minutes

राष्ट्रीय पेन्शन योजना (National Pension Scheme) म्हणजे सेवानिवृत्तीनंतर नियमित उत्पादनाद्वारे आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी केलेली तरतूद आहे. वृद्धापकाळात आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असावे आणि निवृत्ती नंतरचे आयुष्य स्थिर आणि सन्मानपूर्वक जगावे यासाठी तुम्ही या योजनेचा नक्की लाभ घेतला पाहिजे. आज आपण या लेखातून राष्ट्रीय पेन्शन योजना सविस्तरपणे जाणून घेऊ. (NPS information Marathi)

  • वयाची 18 वर्षे पूर्ण केलेली कुठलीही व्यक्ती राष्ट्रीय पेन्शन योजने मध्ये पैसे गुंतवू शकते.
  • यासाठी वय वर्षे 18 ते 70 वयोमर्यादा निश्चित केली आहे. 
  • राष्ट्रीय पेन्शन योजने अंतर्गत दोन प्रकारची खाती आहेत.  (NPS marathi)

a ) टियर 1 b )टियर 2 

  • टियर 1 – या पेन्शन खात्यामध्ये मुदतपूर्व पैसे काढण्यास काही मर्यादा आणि अटी आहे. 
  • टियर 2-  या खात्यामध्ये तुम्ही मुदतपूर्व पैसे काढू शकता.हे बचत खात्याप्रमाणे आहे. यात तुम्ही      गरजेप्रमाणे केव्हाही पैसे काढू शकता.  
  • टियर 2 मधील खाते उघडण्यासाठी पेन्शन खाते उघडणे आवश्यक आहे.
  • राष्ट्रीय पेन्शन योजनेतील पैसे पुढील तीन प्रकारच्या ठिकाणी गुंतवले जातात – 
  • इक्विटी
  • गव्हर्नमेंट आणि डेट बॉन्ड 
  • गव्हर्नमेंट बॉन्ड 

किमान गुंतवणूक मर्यादा

  • राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये कमीत कमी 500 (टियर 1) रक्कम भरून खाते उघडू शकतात. 
  • किमान 1000 वार्षिक रक्कम भरू शकतो .

फंड व्यवस्थापनासाठी आकारण्यात येणारे शूल्क NPS मध्ये कमी आहे. 

 

हे ही वाचा  :  मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

 

काही महत्त्वाचे मुद्दे

  • इक्विटी गुंतवणुक करायची असल्यास कमाल मर्यादा 50% आहे.
  • निवृत्तीच्या वेळेस म्हणजेच वय वर्ष 60 नंतर पॉलिसीधारकाला 60% रक्कम  काढता येऊ शकते. उर्वरित 40% रक्कम पेन्शनच्या स्वरूपात मिळत राहते. 
  • पॉलिसीधारकाने गुंतवलेली रक्कम 5 लाख पेक्षा कमी असल्यास निवृत्तीच्या वेळेस पूर्ण रक्कम काढण्याची मुभा मिळते. 
  • मात्र ही रक्कम पाच लाख पेक्षा जास्त असल्यास 60% रक्कम काढून 40% रक्कम ही पेन्शन फंडामध्ये जमा करण्यात येते. काढलेली 60% रक्कम ही करमुक्त आहे. 
  • योजनेअंतर्गत पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास त्याने नमूद केलेल्या वारसाला योजनेचे सर्व अधिकार आणि लाभ मिळतात. 

राष्ट्रीय पेन्शन योजने मधून पैसे काढायचे काही नियम :  

  • योजनेमध्ये पैसे गुंतवल्यानंतर किमान तीन वर्षे पैसे भरणे गरजेचे आहे.आपत्कालीन परिस्थितीत पैसे काढायचे असल्यास तीन वर्षानंतर  25% रक्कम काढली जाऊ शकते.
  • योजनेअंतर्गत 3 वेळा पैसे काढण्याची मुभा देण्यात आलेली आहे. 
  • तीन वर्षे पूर्ण होण्याआधी पैसे काढल्यास प्री मॅच्युअर एक्झिट समजली जाते.
  • निवृत्तीनंतर 60% रक्कम काढता येऊ शकते. 

NPS मधील कर सवलत  आणि करबचत : (NPS tax benefits)

    • राष्ट्रीय पेन्शन योजने मध्ये इन्कम टॅक्स कलम 80CCD (1), 80CCD (2) आणि  80CCD (1b) अंतर्गत कर बचत होऊ शकते . 
    • राष्ट्रीय पेन्शन योजना अंतर्गत  टियर 1 या पेन्शन खात्यामध्ये पॉलिसीधारकाला इन्कम टॅक्स 80 C नुसार 1.5 लाख रुपयांपर्यंत कर कपात मिळू शकते.
  • 80CCD (2) नुसार कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी टियर 1 खात्यामध्ये जी रक्कम जमा करते त्या रकमेवर पॉलिसी धारकाला कर सवलत मिळू शकते. कंपनी कर्मचाऱ्याच्या पगाराच्या 10 % रक्कम टियर 1 खात्यात जमा करू शकते. मात्र ही रक्कम पगाराच्या 10 % पेक्षा जास्त नसावी. 
    • तसेच 80 CCD (1b) नुसार 50,000 रुपयांपर्यंत कर कपात मिळू शकते.  
  • राष्ट्रीय पेन्शन योजना अंतर्गत टियर 2 या खात्यामध्ये पॉलिसीधारकाला कुठल्याही प्रकारचा कर सवलत मिळत नाही. 

 

NPS वरील परतावा : (Return on NPS Investments)

  • राष्ट्रीय पेन्शन योजनेचा मागील दहा वर्षाचा सरासरी वार्षिक परतावा 10 %  एवढा जास्त आहे. 

 

टेबल मध्ये दाखवल्याप्रमाणे काही निवडक अश्या NPS च्या  टियर 1 आणि टियर 2 च्या 5 वर्षापर्यंतच्या परताव्याची टक्केवारी दिसते. (आकडेवारी 08/02/2023 च्या तारखेनुसार आहे)

निष्कर्ष : 

  • आधी केवळ सरकारी कर्मचाऱ्यांपुरताच मर्यादित असलेली राष्ट्रीय पेन्शन योजना सरकारने सर्वांसाठी लागू केल्यापासून अनेकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. 
  • अल्पावधीतच राष्ट्रीय पेन्शन योजना अनेक लोकांपर्यंत पोहोचली आहे. 
  • सेवानिवृत्तीनंतर ठराविक रक्कम मिळावी,आर्थिक तणाव जाणवू नये,आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास आर्थिकदृष्ट्या सक्षम असावे असा विचार करत असाल तर राष्ट्रीय पेन्शन योजनेत  पैसे गुंतवणे केव्हाही उत्तम!
Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…