गृहकर्जाबद्दलचे पहिले पाच गैरसमज आपण मागील भागात वाचले. आता पुढील गैरसमज ह्या भागात दूर करू.
६. सगळ्या बँका सारखाच व्याजदर देतात :
होम लोनसाठी सगळ्या बँका सारखाच व्याजदर देतात असा जर तुम्ही विचार करत असाल, तर तुमचं संशोधन थोडं कमी पडतंय. काही थोड्या मोठ्या बँका जरी इतर बँकाप्रमाणेच व्याजदर देत असल्या, तरी त्यांचे प्रोसेसिंग चार्जेस आणि इतर चार्जेसमध्ये बरीच तफावत आढळते.
७. सरकार आणि केंद्रिय बँका उदाहरणार्थ, रिझर्व्ह बँक, हेच होम लेनचे व्याजदर ठरवतात :
रिझर्व्ह बँक किंवा सरकार यांचा होम लोनचे व्याजदर ठरवण्याशी थेट संबंध नसतो. प्रत्येक बँक किंवा एनबीएफसी त्यांच्या संचित निधीच्या सरासरी किमतीवरून व्याजदर ठरवतात.
८. बँक किंवा एनबीएफसी ह्यांच्याकडे थेट अर्ज करण्यातच हुशारी आहे :
एकाच बँकेत अर्ज करण्यापेक्षा वेगवेगळे पर्याय शोधण्यातच खरी हुशारी आहे. ऑनलाईन मार्केटप्लेसवर अर्ज करणं हे काहीही अभ्यास न करता बँकेत थेट अर्ज करण्यापेक्षा उत्तम होय. ह्यात तुमचा वेळ आणि पैसा तर वाचेलच, शिवाय तुम्हाला चांगली डील मिळवून देण्यात आणि तज्ज्ञांचा मोफत सल्ला मिळवून देण्यातही मदत होईल.
९. सध्या तुमचे व्यवहार ज्या बँकेत चालू असतील, तीच बँक निवडणं चांगलं :
‘निवड करण्यापूर्वी पूर्ण अभ्यास करा आणि कोणत्याही निर्णयाप्रत जाण्याआधी नीट विश्लेषण करा’ हा लोन घेणार्या हुशार लोकांसाठीचा मंत्र आहे. कमी व्याजदर, कमी चार्जेस आणि चांगली वैशिष्ट्यं असलेलं लोन मिळवून देण्यात हा मंत्र तुम्हाला उपयोगी ठरू शकतो.
१०. जास्त उत्पन्न असणार्या लोकांना जास्त लोन मिळतं :
डीटीआय (डेट टू इन्कम रेशियो / कर्ज आणि उत्पन्न यांचं गुणोत्तर) आणि तुमच्या मिळकतीची किंमत किंवा बांधकामाचा खर्च ह्यांवर तुम्हाला होम लोन किती मिळणार हे ठरतं. डीटीआय याचा अर्थ अगदी साध्या शब्दांत सांगायचा तर, रकमेचा तो आकडा जो ठरवतो की तुम्ही दर महिन्याला किती पैसे देऊ शकता.
आणखी काही गैरसमज पुढल्या भागात जाणून घेऊ.
तोपर्यंत गृहकर्जाबद्दलचे हे लेख वाचले आहेत का?
गृहकर्जाची प्राथमिक पात्रता व निकष
कर्ज घेताना आवर्जून लक्षात ठेवायच्या ५ गोष्टी
(चित्र सौजन्य- https://goo.gl/psSFq6)