Reading Time: 2 minutes

बदल  हा निसर्गाचा नियम आहे. अनादी काळापासून अनेक गोष्टी बदलत आल्या आहेत आणि यापुढेही बदलत राहणार आहेत. पूर्वी बँकेत जायचं म्हटलं की जीवावर यायचं. पैसे काढणे, खात्यात पैसे जमा करणे, चेक /डीडी, इत्यादी अशा अनेक कारणांसाठी बँकेत ग्राहकांची गर्दी असायची. पुढे कम्प्युटर, नेट बँकिंग, डेबिट कार्ड्स, क्रेडिट कार्ड्स यांच्या आगमनाने बँक कर्मचारी आणि ग्राहक या दोघांचेही काम कमी झाले.

 • बँकेकडून प्रत्येक खात्यासोबत डेबिट कार्ड दिले जाते. या कार्ड्समध्येही व्हिसा (VISA), मास्टरकार्ड (MasterCard), रूपे (RuPay) असे अनेक प्रकार आहेत.
 • आरबीआयच्या आकडेवारीनुसार, ऑगस्ट २०१८ अखेरपर्यंत ४.१ कोटी क्रेडिट कार्ड आणि ९८.०१ कोटी डेबिट कार्ड्स आहेत. परंतु क्रेडिट आणि डेबिट कार्डाच्या संख्येत इतका मोठा फरक असूनही प्रत्यक्ष व्यवहारात मात्र क्रेडिट कार्डने बाजी मारली आहे. ऑगस्ट २०१८ च्या महिना अखेरपर्यंत  क्रेडिट कार्डद्वारे ४७,९८२ कोटी रुपयांचे तर डेबिट कार्डाद्वारे ४८,९७२ कोटी रुपयांचे व्यवहार केले गेले आहेत.
 • बँकेकडून देण्यात येणाऱ्या प्रत्येक कार्डमध्ये आता एक महत्वपूर्ण बदल करण्यात आला आहे, तो म्हणजे जुन्या मॅग्नेटिक स्ट्रीपऐवजी EMV (युरोपे, मास्टरकार्ड आणि व्हिसा) कार्ड्स आता चलनात येतील. 
 • तसेच रिझर्व बँकेच्या आदेशानुसार जुनी मॅग्नेटिक स्ट्रीप असलेली  सर्व कार्ड्स १ जानेवारी २०१९ पासून ब्लॉक केली जातील.
 • रिझर्व बँकेने २७ ऑगस्ट, २०१५ रोजी दिलेल्या आदेशानुसार दिनांक १ सप्टेंबर, २०१५ पासून बँकांनी EMV तंत्रज्ञान असणारे कार्ड जरी करणे बंधनकारक आहे.
 • हा नियम डेबिट, क्रेडीट, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कार्ड अशा प्रत्येक कार्डसाठी बंधनकारक आहे.
 • जुन्या कार्ड्ससाठी मॅग्नेटिक स्ट्रीप वापरली जात असे. अशी मॅग्नेटिक कार्ड व्यवहारातून पूर्णपणे बंद करण्यासाठी ३ वर्षांपेक्षा जास्त वर्षाची मुदत देण्यात आली होती. आता चालू वर्षाच्या शेवटी म्हणजेच ३१ डिसेंबर, २०१८ रोजी ही मुदत संपणार आहे व नवीन EMV कार्ड्स चलनात येणार आहेत.

काय आहे EMV  तंत्रज्ञान?
‘सोय तितकी गैरसोय’ या म्हणीनुसार डेबिट/क्रेडिट किंवा इतर कार्ड्समुळे व्यवहारात सुलभता आली असली तरी सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या प्रमाणाला आळा घालण्यासाठी रिझर्व्ह बँकेने EMV कार्ड्स वापरात आणण्याचा निर्णय घेतला आहे.

 • कार्ड क्लोनिंगची जोखीम वाढल्यामुळे चिप-आधारित कार्ड्समध्ये जागतिक पातळीवर बदल करण्यात आला आहे.
 • “मॅग्नेटिक स्ट्रीप कार्डमध्ये स्टॅटिक माहिती असल्यामुळे या कार्ड्सचे ‘क्लोनिंग’ करता येणे सहज शक्य होत असे.
 • क्लोनिंगद्वारे एटीएम मशीनमध्ये कार्ड वापरल्यावर त्यावरची माहिती सहज  मिळविता येत होती.
 • ईएमव्ही कार्डमध्ये स्टॅटिकऐवजी डायनॅमिक तंत्रज्ञान वापरण्यात आल्यामुळे या कार्डचे क्लोनिंग करणे कितीतरी पटीने अवघड आहे.
 • EMV (युरोपे, मास्टरकार्ड आणि व्हिसा) तंत्रज्ञान हे जागतिक मान्यताप्राप्त (global standard) कम्पुटराइज्ड तंत्रज्ञान आहे.
 • यामध्ये कार्डच्या डाव्या बाजूस सोनेरी रंगातील चीप दिसून येते.
 • EMV कार्ड वापरणे संपूर्णतः सुरक्षित आहे आणि यामध्ये फसवणूक होण्याची शक्यताही तुलनेने कमी आहे.
 • EMV कार्ड्सचा वापर करण्याची पद्धतही मॅग्नेटिक कार्डप्रमाणे असून स्वाईप होण्यासाठी मात्र मॅग्नेटिक कार्डाच्या तुलनेत थोडा जास्त वेळ लागू शकतो.
 • रिझर्व्ह बँकेच्या निर्णयानुसार भारतातील खाजगी तसेच सरकारी बँकांमार्फत ग्राहकांना विनामूल्य कार्ड्स बदलून दिली जात आहेत.
 • भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) यासंदर्भात केलेल्या ट्विट केले आहे. त्यामध्ये बँकेने १ डिसेंबर २०१८ पूर्वी आपल्या ग्राहकांना संबंधित डेबिट कार्ड बदलण्यास सांगितले आहे. ग्राहकांना नवीन EMV चिप डेबिट कार्ड विनामूल्य जारी केले जातील. तसेच त्याची प्रक्रियाही अगदी सोपी आहे.
 • सामान्यतः बँकेत खाते उघडल्यावर प्रत्येक खातेधारकास डेबिट कार्ड दिले जाते. त्यामुळे डेबिट कार्ड धारकांची संख्या जास्त आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या रेकॉर्ड्सनुसार ऑगस्टच्या अखेरीस एकट्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या डेबिट कार्डधारकांची संख्या ३०.७ कोटी होती.
 • नवीन EMV कार्ड हे बँक कार्ड्सच्या वाढत्या गुन्हेगारीला आटोक्यात आणण्यासाठी रिझर्व बँकेने उचलेले एक महत्वाचे पाऊल आहे.
 • कार्ड बदलून देण्याची प्रक्रिया तुलनेने सहज सोपी आहे. तसंच या प्रक्रियेत ग्राहकांना शक्यतो त्रास होऊ नये याची सर्वोतपरी काळजी बँकाकांडून घेण्यात येत आहे.
 • परंतु कार्ड्सची संख्या लक्षात घेता ग्राहकांनीही सामंजस्य दाखविणे आवश्यक आहे.

रिझर्व्ह बँकेचा हा निर्णय ग्राहकांच्या हिताचा विचार करूनच घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे ग्राहकांच्या बँक खात्यातील पैसे सुरक्षित राहण्यास मदतच होणार आहे.  

(चित्रसौजन्य: https://bit.ly/2Q16mSI )

Share this article on :
1 comment
 1. नमस्कार अर्थसाक्षर

  मी आपले लेख नियमितपणे वाचतो आपल्या लेखांच्या नोटिफिकेशन मला व्हाट्सअप ला येतात व आपले लेख खूप माहितीपूर्ण व्यवस्थित व विस्तृत असतात.
  तरी कृपया आपण शेतकरी कर्जमाफी महाराष्ट्रातील कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली व ज्या घरात नोकरदार असतील अशांना कर्जमाफी मिळाली नाही तर त्याचे नियम काय आहेत याबद्दल आपण लेख लिहावा.
  धन्यवाद असेच लेख लिहीत रहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.