Compound Interest
Reading Time: 3 minutes

Compound Interest: चक्रवाढ व्याज

शाळेत असताना चक्रवाढ व्याज (Compound Interest) आपण सगळ्यांनी शिकलेलं आहे. त्यामुळे तेव्हापासून आपल्याला त्याची ‘महती’ माहिती आहेच.  चक्रवाढ व्याजाची गणिते तुमचे मार्क्स कमी करत असेल, पण गुंतवणुकीच्या बाबतीत मात्र हे व्याज आपला फायदा करून देत असतं.

गुंतवणूक आपल्याला आता सवयीची झाली आहे. जगभरातील माणसं गुंतवणूक करतात, कोणी दरमहा ५०रु तर कोणी ५ करोड रुपयांची गुंतवणूक करत असेल. प्रत्येकजण आपापल्या उत्पन्नानुसार बचत करतो. पण सतत वाढणाऱ्या गरजा आणि अचानक कोसळणारी विविध आर्थिक संकटे यांच्यामुळे बहुतेक लोकांना आयुष्यात अनेकदा आर्थिक चणचण जाणवते.

गुंतवणुकीचे हे गणित ‘बचत कमी पडते’ हे रडगाणं गात, “आमचं सगळं आयुष्य काटकसरीत गेलं” या ऐतिहासिक डायलॉगवर येऊन थांबत. जेव्हा आपलं आर्थिक नियोजन कमी पडल्याची जाणीव होते तेव्हा हातातून वेळ निघून गेलेली असते.

त्यामुळे तुम्हाला परफेक्ट नियोजन हवं असेल तर इतरांपेक्षा काहीतरी वेगळं सूत्र वापरलं पाहिजे. तुम्ही तरुण असाल तर आजच हे नियोजन शिकून घ्या आणि जर तुम्ही वयस्कर असाल तर आपल्या पुढच्या पिढीला या कानमंत्राची भेट जरूर द्या.  

Compound Interest: हटके सूत्र- चक्रवाढ व्याज:

  • गुंतवणूक अनेक पटीने वाढवण्याचा प्रश्न येतो तेव्हा हटके सूत्र म्हणजे शेयर मार्केट किवा लॉटरी, सट्टा ते जुगार पर्यंत धोकादायक आणि बेकायदेशीर पर्याय दिसतात. पण एक कायदेशीर आणि खात्रीशीर पर्याय आहे ‘चक्रवाढ व्याज दराने गुंतवणूक’ हे आपण विसरतो.
  • आपण सर्वजण गणितात ‘सरळव्याज’ किंवा ‘simple interest’ ही संकल्पना शिकतोच पण त्याच बरोबर चक्रवाढ व्याज (Compound Interest) नावाचा कठीण वाटणारा व्याजाचा प्रकारही शिकतो. काळाच्या ओघात हा प्रकार आपण विसरूनच गेलो आहोत. गणितात जरी हा कठीण प्रकार वाटत असला तरीही गुंतवणुकीसाठी मात्र हा पर्याय अत्यंत किफायतशीर आहे.
  • आपली आजपर्यंतची गुंतवणूक सरळव्याज तत्वावर चालू आहे. पण तुम्हाला हे माहित आहे का की तुम्ही चक्रवाढ तत्वावरही गुंतवणूक करू शकता आणि त्याच मुद्दल रकमेवर सरळव्याजाहून किती तरी पटीने जास्त परतावा मिळवू शकता!

Compound Interest: काय आहे चक्रवाढ व्याज?

  • गुंतवणूक करताना एक मूळ मुद्दल रक्कम असते आणि पहिल्यांदा त्या मुद्दल रकमेवर व्याज मिळते.
  • पण पुढच्या वेळी फक्त मूळ मुद्दल किमतीवरच व्याज नाही मिळत तर मूळ किमत अधिक त्यावरील व्याज अश्या एकूण रकमेवर हे व्याज मिळते.
  • म्हणजे पुढची प्रत्येक मुद्दल ही आधीच्या मुद्दल आणि त्यावरील व्याज याची बेरीज असते.
  • अशा प्रकारे प्रत्येक वेळी तुम्ही मुद्दल वाढलेली असते. त्यामुळे स्वाभाविकपणे या वाढीव रकमेवर मिळणारे व्याजही वाढीव असते. व्याजाचे प्रमाण इतके जास्त असते की तुम्ही एरवी पेक्षा कितीतरी पतीने गुंतवणूक वाढवू शकता.

सरळव्याज आणि चक्रवाढ व्याज यांच्यातील फरक-

  • समजा तुमच्या मित्राने सरळव्याज तत्वावर काही रक्कम काही टक्के व्याजावर गुंतवली आणि तिच रक्कम तुम्ही चक्रवाढ व्याज तत्वावर त्याच टक्के व्याजाने गुंतवली तर दोन्हीमधून गुंतवणुकीच्या शेवटी मिळणाऱ्या रकमेमध्ये प्रचंड तफावत दिसते.
  • याचे कारण म्हणजे, जेव्हा सरळव्याज लावले जाते, तेव्हा सुरवातीला जे मुद्दल असते त्या रकमेवरच पुढील प्रत्येक व्याज लावले जाते. पण जेव्हा चक्रवाढ व्याजावर रक्कम गुंतवता, तेव्हा पुढील प्रत्येक मुद्दल वाढत गेलीली असते आणि जेव्हा मुद्दल वाढते तेव्हा त्यावर मिळणारे व्याजही वाढतेच!
  • हा फरक खाली दिलेल्या उदाहरणाच्या तक्त्यावरून जास्त चांगल्या प्रकारे समजून घेता येईल.
वर्ष/   गुंतवणूक अक्षय

सरळव्याज तत्व

(मुद्दल रु. १०० प्रतिवर्ष x  व्याज १०%)

विकास –

चक्रवाढ तत्व

(मुद्दल रु. १०० x  व्याज १०%)

वर्ष १  १० मुद्दल १०० x  व्याज १०% रु.१० = ११०
वर्ष २  १० मुद्दल- ११० x  व्याज १०% रु.११ =१२१
वर्ष ३  १० मुद्दल- १२१ x  व्याज-१०% रु.१२ = १३३  
वर्ष ४  १० मुद्दल- १३३ x  व्याज-१०% रु.१३ = १४६
वर्ष ५  १० मुद्दल- १४६ x  व्याज-१०% रु.१४ = १६०
एकूण= गुंतवणूक ५०० + व्याज ५० = ५५० गुंतवणूक १०० + व्याज  रु. ६० = ६६०

 

वरील उदाहरणामध्ये अक्षय आणि विकासाने समान गुंतवणूक आणि समान व्याज दरावर दोन वेगवेगळ्या मार्गाने गुंतवणूक केली. परंतु विकासाला चक्रवाढ व्याजाच्या सहाय्याने केलेल्या गुंतवणूकीने जास्त मोबदला मिळवून दिला.

अनेकदा गुंतवणुकीचे साधे सोपे पण जास्त फायदा मिळवून देणारे पर्याय आपल्या समोर असतात पण निव्वळ पुरेशा माहितीअभावी त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणुकीच्या विविध पर्यायांची माहिती करून घेतल्यास जास्त फायदा होऊ शकतो.

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…