-
गूगल पे या नवीन प्रणालीची ओळख तर आपण करून घेतली, पण इतर कोणत्याही पे अॅप पेक्षा यामध्ये वाढीव सुविधा असल्याने गुगल पे सिस्टीम समजून घेणे आवशक आहे.
-
या भागात आपण अॅन्डॉइड मोबाईल मध्ये गुगल पे कसे सुरु करावे, गुगल पे मध्ये कोणते नवीन वैशिष्टे आहेत, बँक खाते आणि विविध कार्ड कसे जोडावे यांची माहिती करून घेणार आहेत.
तेझ (TEZ) च्या ग्राहकांसाठी –
-
तुम्ही जर आधीपासूनच ‘अॅन्डॉइड पे’(तेझ) हे अॅप वापरात असाल तर ते जुने अॅपच अपडेट होऊन आता ‘गूगल पे’ म्हणून ओळखले जाईल.
-
ऑटोमॅटिक अपडेट सुरू असल्यास, तुम्हाला काहीही करण्याची आवश्यकता नाही. अॅप आपोआप Google Pay वर अपडेट केले जाईल.
- तुमच्याकडे जर ऑटोमॅटिक अपडेट सुरू नसल्यास, पुढील प्रकारे अपडेट करा –
– गुगल प्ले स्टोअर (Google Play Store) अॅप उघडा.
– मेनू टाईप करा- ‘माझे अॅप्स आणि गेम’(My apps & Games)
– उपलब्ध असलेल्या अॅप्सला ‘अपडेट’(Update) असा पर्याय दिसेल. गुगल पे(तेझ) म्हणजेच Google Pay (Tez) अॅप शोधा व अपडेट करा.
यामुळे तुमचे काम अजून सोपे झाले आहे. आधीच्या अॅपशी जोडलेली सर्व माहिती आणि तपशील नवीन अॅप मध्ये अपोआप हस्तांतरीत (Transfer) केली जाईल.
नवीन ग्राहकांसाठी –
नवीन खाते तयार करण्यासठी तुमच्याजवळ पुढील ३ गोष्टी असणे आवशक आहे-
१. चालू गुगल खाते (google account),
२. चालू भारतीय फोन नंबर ज्याची सुरवात (+९१)अशी असेल.
३. अॅक्टिव्ह भारतीय बँक खाते असणे आवश्यक आहे (Active Bank Account)
अॅन्डॉइड मोबाईल ग्राहकांसाठी-
१. अॅन्ड्रॉईड ४.४- कीटकॅट+ (Android 4.4 – Kitkat+) किंवा त्या पुढील आवृत्ती असलेल्या फोनवर प्ले स्टोर मधून ‘गुगल पे’ डाउनलोड पर्याय निवडा (किंवा येथे क्लिक करा- Google Pay डाउनलोड करा) .
२. तुमचा फोन नंबर टाईप करा.
३. तुमच्या गुगल खात्याद्वारे साइन इन करा.
आयफोन/आयपॅड ग्राहकांसाठी-
१. IOS 10.0 किंवा त्यापेक्षा पुढील आवृत्ती असलेल्या हे फोनवर डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा- Google Pay डाउनलोड करा .
२. तुमचा फोन नंबर टाईप करा.
३. तुमच्या गुगल खात्यामधून(google account) साइन इन करा.
बँक खाते जोडा/ कार्ड अॅड करा –
-
एकदा हे अॅप डाउनलोड केल्यानंतर त्यामध्ये दोन पर्याय उपलब्ध आहेत १.’होम’ २.‘कार्ड’
-
यापैकी ‘कार्ड’ या पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्ही तुमचे नवीन खाते अॅड करणे किंवा बँक डिटेल्स जोडणे ही कामे करू शकता. गुगल अकाउंट आणि मोबाईल क्र. पडताळणीची (Mobile no. verification) झाल्यावर पुढील प्रकारे खाते जोडावे-
– तुमची बँक युपीआय(UPI) सोबत काम करते का ते तपासून खात्री करा. करत नसल्यास, तुमचे बँक खाते गुगल पे सोबत काम करणार नाही.
– वर डावीकडे, तुमचा फोटो > बँक खाते वर टॅप करा.
– ‘बँक खाते जोडा’ वर टॅप करा.
– सूचीमधून तुमची बँक निवडा. तुम्हाला तुमची बँक दिसत नसल्यास, ती अजून गुगल पे सोबत काम करत नाही.
– गुगल पे ला तुमचे खाते जोडताना तुमच्या बँकेला पडताळणी एसएमएस पाठवण्याची परवानगी द्यावी लागू शकते. ही एकप्रकारची पडताळणी (व्हेरिफिकेशन) प्रक्रिया आहे.
– तुमच्याकडे आधीच UPI(युपीआय) पिन असल्यास, तुम्हाला तो एंटर करण्यास सांगितले जाईल. तुम्हाला तुमचा पिन आठवत नसल्यास, तुम्ही पिन विसरला तर त्यासंबंधित सूचनांचे पालन करावे.
– तुमच्याकडे UPI पिन नसल्यास, तुम्हाला तुमच्या डेबिट कार्डची माहिती टाकावी लागेल.
– यानंतर तुमचे खाते या अॅपशी जोडले जाईल.
(चित्रसौजन्य: https://bit.ly/2RNQujB)