Reading Time: 2 minutes

नेट बँकिंग किंवा पेटीयम, तेझ (आता गुगल पे)अशा अॅपचा बोलबाला देशभर होत असताना तुम्ही अजूनही बँकांच्या रांगांमध्ये तास वाया घालवताय? का? ऑनलाईन प्रक्रिया किचकट आणि वेळखाऊ वाटते? मोबाईलवर बँकांचे तपशील भरताना चुका होण्याची भीती वाटते?

समजा तुमच्या ह्या सगळ्या समस्या सोडवणारे साधन तुमच्या हातात आणून ठेवले तर? बँक खाते क्रमांक किंवा कोणतेही तपशील न भरता केवळ तुमच्या मोबाईल नंबर किंवा आधार क्रमांक वापरून तुम्ही पेमेंट करू शकत असाल तर? अथवा, फक्त एक युनिक आयडी वापरून तुम्ही क्षणार्धात पैसे पाठवू किंवा मिळवू शकत आहात तर? याहीपेक्षा सोप्पा! केवळ एक क्यूआर कोड स्कॅन करून झटपट आर्थिक व्यवहार करू शकताय? स्वप्नवत वाटतंय? होय! हे शक्य आहे!! आजच भीम अॅप डाउनलोड करा.

भीम अॅप डाउनलोड प्रक्रिया –

  1. प्ले स्टोअरवरून अँड्रॉइड वापरकर्ते BHIM नावाचे अॅप डाउनलोड करू शकतात. अद्याप आयएसओ वापरकर्त्यांसाठी अॅप उपलब्ध नाही.
  2. अॅप इंस्टॉल करा आणि आपली भाषा निवडा. अॅप आपल्याला एसएमएस वापरून आपला फोन नंबर तपासण्याची सूचित करेल. पुढील क्लिक करा आणि व्हेरीफिकीशेन प्रक्रिया पूर्ण होण्याची प्रतीक्षा करा.
  3. एकदा व्हेरीफिकीशेन पूर्ण झाल्यानंतर चार अंकी पासकोड प्रविष्ट करा.
  4. पासकोड सेट झाल्यानंतर, अॅप आपल्याला आपल्या बँकेची निवड करण्यास सांगेल. एकदा बँक निवडल्यानंतर, अॅप आपोआप आपला फोन नंबर वापरून आपला तपशील उचलतो. आपल्या सर्व व्यवहारांसाठी प्राथमिक बँक खाते निवडा.
  5. आपला युपीआय पिन सेट करा.
  6. ‘प्रोफाइल’ पर्यायाला भेट द्या आणि व्हर्च्युअल देयक पत्ता (व्हीपीआय) सेट करा. मोबाईल  अॅप वर प्रति वापरकर्ता दोन व्हीपीए वापरू शकतो.
  7. प्राथमिक वर्च्युअल देयक पत्ता म्हणून एक व्हीपीए सेट करा.

भीमचा वापर करून पैसे पाठवावे/मिळवावे कसे?

  • अॅप तीन पर्याय दाखवतो – पाठवा, मिळवा आणि स्कॅन पे (हा व्यवहार केवळ व्हेरीफाईड फोन नंबर दरम्यान शक्य आहेत.)

  • एखाद्यास पैसे पाठविण्यासाठी, त्यांचा फोन नंबर आणि हस्तांतरित करण्याची रक्कम टाइप करा. अॅप आपल्याला MPIN टाकण्यासाठी सूचित करेल, हा पिन चार किंवा सहा अंकी कोड असेल, जो मोबाइल व्यवहार प्रमाणीकृत करेल.

  • त्याप्रमाणे, तुम्ही एखाद्याच्या फोन नंबरचा वापर करून एखाद्याकडून पैसे मिळवू शकता.

  • स्कॅन आणि पे चा तिसरा पर्याय वापरकर्त्यांना क्यूआर कोड वापरून पैसे हस्तांतरित करण्याची परवानगी देतो. स्मार्टफोन किंवा टॅबलेटद्वारे डीकोड करता येईल असा चौकटीत काळा आणि पांढरा बारकोड तिथे येईल. 

  • प्रत्येक फोन नंबरला असा क्युआर कोड नियुक्त केला जातो जो होम स्क्रीनवरील प्रोफाइलमध्ये प्रवेश करू शकतो.

हे लक्षात ठेवा –

  • पैसे पाठविणे आणि प्राप्त करण्याव्यतिरिक्त, आपण भीम अॅपद्वारे आपली बँक बॅलन्स आणि व्यवहार तपशील देखील तपासू शकता.

  • भीम अॅपद्वारे व्यवहार करण्यासाठी कोणतेही शुल्क नाही. परंतु तुमचा बँक यूपीआय किंवा आयएमपीएस काही शुल्क ‘स्थानांतर शुल्क’ म्हणून आकारेल.

  • भीम अॅप वापरण्यासाठी मोबाइल बँकिंगसाठी आपले बँक खाते जोडणे आवश्यक नाही. परंतु, आपला मोबाईल क्रमांक बँकेकडे नोंदवणे आवश्यक आहे.

  • सध्या, भीम अॅप फक्त एका बँक खात्याशी जोडले जाऊ शकते. पण  एखाद्या अन्य बँक खात्याशी जोडले जाऊ इच्छित असल्यास, आपल्याला मुख्य मेनूमध्ये जाऊन करता येते.

  • खाते सेटअपच्या वेळी, आपण आपल्या पसंतीच्या बँक खात्याचा ‘डीफॉल्ट खाते’ म्हणून निवडू शकता. आपला मोबाइल नंबर किंवा पेमेंटचा पत्ता वापरून तुमच्याकडे हस्तांतरित केलेले कोणतेही पैसे तुमच्या डीफॉल्ट खात्यात जमा होतील.

  • जर नंबर किंवा युपीआय आयडी नसेल तर तुम्ही बँक खाते आणि आयएफएससी कोड वापरून पैसे पाठवू शकता. 

  •  एका दिवसात, एका वेळी किमान रू. १०,००० ते कमाल रु.२०,००० इतक्या रुपयांचे हस्तांतर होऊ शकते.

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutesभारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes  सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutesकंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutesभाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.