Reading Time: 3 minutes

चार्ल्स एच. डाऊ यानी “डी जोन्स आर्थिक वृत्तसेवा” (WSJ) भागीदारीमधे सुरू केली. ते डाऊ जोन्स अँड कंपनीचे सह-संस्थापक आणि डाऊ जोन्स इंडस्ट्रियल अ‍ॅव्हरेज (DJIA) चे निर्माते होते. कंपनीतील 27 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी लिहिलेल्या लेखांना नंतर “डाऊ थिअरी” असे संबोधलं गेलं. ही एक वित्तीय संकल्पना आहे, जी जगासमोर आणण्याचं श्रेय “विल्यम्स पी हॅमिल्टन” यांना जातं. त्यांनी या थिअरीसंदर्भातले लेख, उदाहरणांसहीत संकलित केले. ते शेअर बाजाराच्या प्रवाहाचं विश्लेषण करण्यासाठी आणि बाजाराच्या प्रवाहाचा अंदाज घेण्यासाठी आजही उपयोगी पडतात. डाऊ यांच्या स्मरणार्थ त्या संकल्पनेला “डाऊ थिअरी” असं संबोधण्यात येतं. 

जगभरात वापरली जाणारी सर्वांत जुनी आणि सर्वाधिक प्रचलित पद्धतींपैकी एक म्हणजे “डाऊ थिअरी” आहे. आताची लोकप्रिय कॅडलस्टिक पद्धत येण्यापूर्वीची ही पद्धती आहे. डाऊ थिअरीचा मुख्य गाभा असा आहे, की शेअर बाजार विशिष्ट प्रवाहाच्या (trends) अधीन असतो आणि या प्रवाहाची दिशा ओळखून गुंतवणूक निर्णय घेतले जाऊ शकतात. ही थिअरी काही महत्त्वाच्या गृहितकांवर आधारित आहे:

  • डाऊ थिअरीची मुख्य गृहीतकं: 
  1. बाजार प्रवाहाच्या स्वरूपात चालतो (Market Moves in Trends): डाऊ थिअरीनुसार, बाजार तीन प्रकारच्या प्रवाहांमधे चालतो.
  • प्राथमिक प्रवाह (Primary Trend): दीर्घकालीन प्रवाह (काही महिन्यांपासून अनेक वर्षांपर्यंत) जो वरच्या दिशेने (बुल मार्केट) किंवा खालच्या दिशेने (बेअर मार्केट) असतो. त्याला मेगा ट्रेंड असंही म्हणतात. 
  • माध्यमिक प्रवाह (Secondary Trend): माध्यमिक प्रवाह (आठवड्यांपासून महिन्यांपर्यंत), जो सामान्यतः प्राथमिक प्रवाहाच्या विरुद्ध असतो. तो मुख्य प्रवाहातील दुरुस्ती (करेक्शन) समजला जाते.
  • त्रृतीय प्रवाह (Tertiary Trend): अल्पकालीन चढ-उतार (30 दिवसाहून कमी कालावधीचे), जे  प्राथमिक प्रवृत्तीवर फारसा परिणाम करत नाही. त्याला बाजारात गोंधळ (Noise) म्हणून संबोधलं जातं.

हे नक्की वाचा: नव्या वर्षातल्या महत्वाच्या तारखा पाहिल्यात का? 

  1. प्राथमिक प्रवाहाचे तीन टप्पे (Three Phases of a Primary Trend):
  • संचयन टप्पा (Accumulation Phase): जेव्हा जाणकार गुंतवणूकदार संभाव्य बदलांचा अंदाज घेत खरेदी किंवा विक्री करतात. या टप्प्यात व्यापार कमी प्रमाणात होतो आणि संशयास्पद वर्तन दिसतं.
  • सार्वजनिक सहभाग टप्पा (Public Participation Phase): जेव्हा प्रवाह स्पष्ट होतो, तेव्हा अधिकाधिक गुंतवणूकदार प्रवाहात सामील होतात. या टप्प्यात बाजार स्पष्टपणे वर किंवा खाली जातो.
  • वितरण टप्पा (Distribution Phase): जेव्हा पुढे जाणाऱ्या प्रवाहाची गती कमी होते आणि जाणकार गुंतवणूकदार विक्री सुरू करतात.मात्र सामान्य गुंतवणूकदार अजूनही खरेदी करत असतो, त्याला उलट्या प्रवाहाची जाणीव नसते. बाजार कमी कमी होत असताना गुंतवणूकदारांचं वर्तन त्याहून वेगळं दिसून येतं.
  1. औद्योगिक आणि वाहतूक निर्देशांकांची पुष्टी (Averages Must Confirm Each Other): डाऊ यांच्या मते, औद्योगिक आणि वाहतूक निर्देशांकाने (उदा. DJIA आणि Dow Jones Transportation Average) एकमेकांची पुष्टी करायला हवी. जर औद्योगिक शेअर्स आणि वाहतूक शेअर्स दोन्ही वाढत असतील तर ही खरीखुरी वाढ आहे, असं मानलं जातं. अन्यथा, ती कमकुवत असू शकते.
  2. व्यापाराची संख्या प्रवृत्तीला पुष्टी करते (Volume Confirms the Trend): डाऊ यांच्या मते, व्यापाराची संख्या (volume) प्रवाहाला पुष्टी करायला हवी. वाढत्या प्रवाहामधे (uptrend) किंमत वाढताना व्यापार वाढायला हवा. कमी होणाऱ्या प्रवाहामधे (downtrend) किंमत घसरताना व्यापार वाढायला हवा.
  3. प्रवृत्ती स्पष्ट उलट्या संकेतांपर्यंत टिकून राहतात (Trends Persist Until Clear Reversal Signals): डाऊ थिअरीचे सर्वात प्रसिद्ध तत्त्व म्हणजे प्रवृत्ती उलट्या संकेतांपर्यंत कायम राहते. एकदा प्रवाह स्थिर झाला की, तो उलटण्याचे स्पष्ट संकेत मिळेपर्यंत त्याचं अनुसरण करणं, अधिक फायदेशीर असतं.

6.किंमत सुधारणा आणि प्रवास: किंमती खूप आधी दुरुस्त होऊ लागतात आणि इतर मूलभूत घटकांपेक्षा आधी मोठा प्रवास सुरु करतात. प्राथमिक मेगाट्रेंडच्या दिशेने उच्चांकी किंमत (Higher high) हा पुढील चढाईचा संकेत आहे.

  1. मूलभूत मर्यादा आणि चार्टवरील प्रतिबिंब: बाजारातील मूलभूत मर्यादा चार्टवर प्रतिबिंबित होऊ शकतात, बाजार भविष्यातील उत्पन्न आणि चक्राकडे लक्ष देतो.
  • डाऊ थिअरीचा शेअर बाजारातील वापर-
  1. बाजार प्रवाह ओळखणं (Identifying Market Trends): गुंतवणूकदार आणि ट्रेडर्स बाजाराच्या दिशा (बुलिश किंवा बेअरिश) ओळखण्यासाठी डाऊ थिअरीचा वापर करतात. प्राथमिक प्रवाह ओळखून, ते खरेदी (buy) किंवा विक्री (sell) याबाबत निर्णय घेतात.
  2. गुंतवणुकीसाठी योग्य वेळ निवडणं (Timing Entries and Exits): डाऊ थिअरी गुंतवणूकदारांना आणि ट्रेडर्सना बाजारात प्रवेश (entry) किंवा बाजारातून बाहेर पडण्याचा (exit) निर्णय घेण्यास मदत करते. उदाहरणार्थ, बुल मार्केटच्या संचयन टप्प्यात खरेदी करणं किंवा बेअर मार्केटच्या वितरण टप्प्यात विक्री करणं. बाजाराची अल्पकालीन दिशा ओळखून व्यापार करणं इ.
  3. प्रवृत्तीची पुष्टी (Confirming Market Trends): गुंतवणूकदार विविध निर्देशांकांची तुलना करून प्रवाहाची पुष्टी करतात. उदा. DJIA वाढत असेल, पण Dow Jones Transportation Average वाढत नसेल, तर त्यातून तेजीचा प्रवाह मजबूत नसल्याचं सूचित होऊ शकतं.
  4. जोखीम व्यवस्थापन (Risk Management): प्रवाह विश्लेषणाच्या आधारे डाऊ थिअरी गुंतवणूकदारांना जोखीम व्यवस्थापित करण्यात मदत करते. बाजार घसरणीच्या प्रवृत्तीत असेल तर शेअर गुंतवणूक कमी करून ते संरक्षणात्मक क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करतात.
  5. व्यापार संख्येचं विश्लेषण (Volume Analysis): किंमतीतील हालचालींसह व्यापाराचं विश्लेषण करून, गुंतवणूकदार प्रवाहाची ताकद ओळखू शकतात.
  • डाऊ थिअरीच्या मर्यादा (Limitations of Dow Theory)
  1. मागील डेटा आधारित संकेत (Lagging Indicator): डाऊ थिअरी प्रवाह ओळखते, तेव्हा तो आधीच सुरू झालेला असतो, त्यामुळे बराचसा फायदा कदाचित गमावला जाऊ शकतो.
  2. तंतोतंत खरेदी-विक्री संकेत नाहीत (No Specific Buy/Sell Signals): डाऊ थिअरीद्वारे विशिष्ट खरेदी किंवा विक्रीच्या वेळेचा अंदाज दिला जात नाही.
  3. आधुनिक बाजाराचे गुंतागुंतीचे स्वरूप (Modern Market Complexity): सध्याच्या जागतिक घडामोडी, धोरणं, गुंतवणूकदारांच्या बदलत्या अपेक्षा इत्यादी कारणांमुळे डाऊ थिअरी पूर्णतः लागू होऊ शकत नाही. 
  4. वैयक्तिक व्याख्या (Subjectivity): ट्रेंड्स आणि टप्पे ओळखणं, काहीवेळा व्यक्तिनिष्ठ ठरतं. व्यक्तीच्या मनात असलेले पूर्वग्रह त्याच्या निर्णय क्षमतेवर प्रभाव पडत असतात.

निष्कर्ष-

डाऊ थिअरी ही तांत्रिक विश्लेषणामधली एक जुनी मूलभूत संकल्पना आहे. बाजार प्रवाह, व्यापार आणि निर्देशांक पुष्टी यावर आधारित विश्लेषणाद्वारे गुंतवणूकदारांना बाजाराच्या संभाव्य दिशेबद्दल महत्त्वपूर्ण माहिती त्यातून निश्चित मिळू शकते. मात्र सध्याच्या काळात ही थिअरी स्वतंत्रपणे ना वापरता इतर पूरक साधनांबरोबर वापरणं अधिक फायदेशीर ठरतं.

©उदय पिंगळे 

अर्थ अभ्यासक

(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सलोखा मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत आहेत लेखात व्यक्त केलेली मते पूर्णपणे वैयक्तिक आहेत.)

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutesभारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes  सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutesकंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutesभाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.