Reading Time: 2 minutes
  • म्युच्युअल फंडात गुंतवणूक हा गुंतवणुकीचा जगभर लोकप्रिय मार्ग असून त्यात मागे असलेल्या भारतीयांनाही त्याचे महत्व अलीकडे पटले आहे. त्यामुळेच गेल्या चार पाच वर्षांत म्युच्युअल फंडातील गुंतवणूक वाढत चालली आहे.
  •  साहजिकच प्रसार माध्यमांमध्येही त्याची चर्चा वाढली आहे. अशी चर्चा वाढली की नवे गुंतवणूकदार या गुंतवणुकीकडे आकर्षित होतात. पण जेव्हा म्युच्युअल फंडाची निवड करण्याची वेळ येते तेव्हा ते गोंधळतात. 

महत्वाचे : म्युच्युअल फंडातून उत्कृष्ट परताव्यासाठी ‘ही’ काळजी घ्या !

अशा नव्या गुंतवणूकदारांनी सुरवात लार्ज कॅप स्कीमपासून करावी, असे मानले जाते आणि ते अगदी योग्य आहे, त्याची पुढील कारणे आहेत. 

  1. म्युच्युअल फंडाच्या लार्ज कॅप स्कीमना आपली ८० टक्के रक्कम शेअर बाजारातील लार्ज कॅप कंपन्यांमध्ये गुंतविणे बंधनकारक आहे. या अशा कंपन्या आहेत, ज्या आपल्या देशातील आकाराने एक ते १०० क्रमांकावर असतात. (निकष बाजारमूल्य) त्यामुळे त्या आर्थिकदृष्ट्या स्थिर कंपन्या मानल्या जातात. 
  2. नव्या गुंतवणूकदारांना शेअर बाजारातील तीव्र चढउताराची सवय नसते. मिड कॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांच्या भावात मोठी वधघट होत असते. त्यामुळे या प्रकारच्या म्युच्युअल फंडाच्या एनएव्हीमध्येही वधघट होत रहाते. ती नव्या गुंतवणूकदारांना घाबरवणारी असते. 
  3. लार्ज कॅप कंपन्या या काही दशकात मोठ्या झालेल्या असतात, त्यामुळे त्यांच्याकडे व्यवस्थापनाचा आणि आर्थिक व्यवहारांचा मोठा अनुभव असतो. शिवाय त्यात विदेशी गुंतवणूकदारांचाही सहभाग असल्याने त्यांना आपले आर्थिक व्यवहार पारदर्शक ठेवावेच लागतात. त्यामुळे गुंतवणूकदारांना अचानक फटका बसण्याची शक्यता कमी होते. 
  4. आर्थिक पेचप्रसंग निर्माण झाला तर त्यातून बाहेर पडण्याची अशा कंपन्यांची क्षमता चांगली असते. त्यामुळे शेअर बाजारात जेव्हा मोठी पडझड होते, त्यावेळी लार्ज कॅप कंपन्यांचे शेअर कमी प्रमाणात खाली येतात. 
  5. मिड कॅप आणि स्मॉल कॅप फंड अधिक परतावा देताना सध्या दिसत आहेत. मात्र आता भारतीय शेअर बाजाराने अनेक उच्चांक प्रस्थापित केल्यामुळे यापुढे लार्ज कॅप कंपन्यामध्ये चांगली वाढ होईल, असे सर्व तज्ज्ञ मानू लागले आहेत. त्याचा फायदा लार्ज कॅप फंडांना मिळू शकतो. अर्थात, म्युच्युअल फंडांत चांगल्या परताव्यासाठी किमान चार ते पाच वर्षाची गुंतवणूक गृहीत धरलेली असते.

माहितीपूर्ण : म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायचे हे 7 पर्याय तुम्हाला माहिती आहेत का?

  • भारतीय गुंतवणूकदार लार्ज कॅप म्युच्युअल फंडांत मोठी गुंतवणूक करतात. सध्या लार्ज कॅप म्युच्युअल फंडांच्या ३१ स्कीम असून त्यांची मत्ता ३.०४ लाख कोटी एवढी आहे. 
  • मिड कॅप आणि स्मॉल कॅप फंड अधिक परतावा देतात, असा अनुभव असला तरी त्यात असलेली जोखीम लक्षात घेता जोखीम कमी आणि स्थिर परतावा ज्यांना हवा आहे, अशांसाठी लार्ज कॅप म्युच्युअल फंडच योग्य आहेत. 

सध्याच्या परिस्थितीत (एप्रिल २०२४) असे कोणते लार्ज कॅप म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठी चांगले आहेत, हे आता पाहू. 

फंडाचे नाव  गुंतवणूक निधी  पाच वर्षांचा परतावा  किती वर्षात गुंतवणूक दुप्पट झाली? 
कॅनरा रोबिको ब्लूचिप इक्विटी फंड २.३८ लाख कोटी  १९ टक्के  तीन +
मिराई अॅसेट लार्ज कॅप फंड २.२६ लाख कोटी  १५ टक्के  तीन +
आयसीआयसीआय प्रुडनशियल ब्लूचिप फंड २.५७ लाख कोटी  २४ टक्के  तीन+
इडलवाईज लार्ज कॅप फंड २.४९ लाख कोटी  २२ टक्के  तीन +
बरोडा बीएनपी पारीबास लार्ज कॅप फंड २.५६ लाख कोटी  २४ टक्के  तीन +

  • यमाजी मालकर 

 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…