Courtesy – istockphoto
Reading Time: 2 minutes

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महिला सक्षमीकरणाच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात काही योजना सादर केल्या.  त्यापैकी एक म्हणजे महिला सन्मान बचत पत्रिका. (MSSC information Marathi)

घराचा उंबरठा ओलांडून महिलावर्ग बाहेर पडला आणि आर्थिकदृष्ट्या ही आधार बनू लागल्या. त्यांनी हिमतीने कमावलेले हे पैसे भविष्य काळात सुरक्षित राहावे, आर्थिक स्वावलंबनाची सुरुवात छोट्या अवधीच्या बचतीपासून होऊन मोठ्या गूंतवणुकीकडे वाढत जावी, उपजत अंगी असलेल्या काटकसर आणि बचत या गुणांना प्रोत्साहन मिळावे या विचारांनी महिला सन्मान बचत पत्रिका योजना सुरू करण्यात आली असून ही योजना म्हणजे खऱ्या अर्थाने महिलांना आर्थिकदृष्ट्या सन्मानाने जगण्याची संधी उपलब्ध करून देते. 

महिला सन्मान बचत पत्रिका  –  (MSSC)

कालावधी : या योजनेचा कालावधी दोन वर्षासाठी आहे  म्हणजे मार्च 2025 पर्यंत. या योजने अंतर्गत 2 लाख रुपये पर्यंत गुंतवणूक करता येते. 

व्याज (fix Interest rate)महिला सन्मान बचत पत्रिकेचा व्याज दर 7.5 % निश्चित केला आहे. 

पैसे काढण्याची सुविधा : 2  वर्षाच्या कालावधी मध्ये गरज पडल्यास काही प्रमाणात पैसे काढण्याची मुभा देण्यात आली आहे. 

योजनेची अंमलबजावणी : येत्या आर्थिक वर्षांपासून ( 1 एप्रिल 2023 ) तुम्ही बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये खाते उघडून या योजनेचा लाभ घेऊ शकता. 

 

हे ही  वाचा : women’s day special: महिलांसाठी आर्थिक नियोजनाची ७ सूत्र

महिला सन्मान बचत पत्रिकेचे फायदे: (benefits of MSSC)

  • मुली आणि महिला यांच्यासाठी असलेल्या इतर योजना उदा. सुकन्या समृद्धी योजना यांच्याशी तुलना केल्यास तुम्हाला लक्षात येईल,

अ ) गुंतवणूक : 

सुकन्या समृद्धी योजना –  जास्तीत जास्त  ₹ 1.5 लाख वार्षिक गुंतवणूक  

महिला सन्मान बचत पत्रिका  – जास्तीत जास्त  ₹ 2 लाख वार्षिक गुंतवणूक 

ब ) कालावधी : 

सुकन्या समृद्धी योजना –   21 वर्ष ( लॉक इन पिरेड)

महिला सन्मान बचत पत्रिका  –  2 वर्ष 

महत्वाचे  : महिलांचे आर्थिक नियोजन – आर्थिक नियोजनाची सप्तपदी

क ) परतावा : 

MSSC योजनेवरील परतावा: (Returns on MSSC) इतर छोट्या बचत योजने च्या तुलनेत महिला सन्मान बचत पत्रिका अंतर्गत मिळणारा   परतावा जास्त आहे.

बँकेच्या फिक्स्ड डिपॉझिट शी तुलना केल्यास महिला सन्मान बचत पत्रिकेचा परतावा अधिक आहे.

निष्कर्ष : 

  • छोट्या कालावधीसाठी बचत करण्याचे नियोजन असेल तर महिला सन्मान बचत योजना नक्कीच लाभदायी आहे. 
  • कमी कालावधी,जास्त परतावा हा नक्कीच आकर्षक पर्याय आहे.
  • जास्तीत जास्त महिला अर्थविश्व, बचत,गुंतवणूकीच्या दिशेने वळावे आणि पर्यायाने आर्थिक दृष्ट्या निर्भर असावे यासाठी महिलांनी नवनवीन योजनांचा विचार करावा. 
  • “यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः” या श्लोका प्रमाणे स्त्रियांचा केलेला हा सन्मान भारताच्या आर्थिक विकासात महिलांचे स्थान उंचवणारा आणि अमूल्य योगदान देणारे असेल. 
Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…