women's day special
https://bit.ly/3v0DTgM
Reading Time: 3 minutes

women’s day special

आज ८ मार्च. जगभरात आजचा दिवस जागतिक महिला दिन म्हणजेच International women’s day साजरा केला जातो. राजकारण असो वा समाजकारण, व्यवसाय असो किंवा नोकरी, आज प्रत्येक क्षेत्रात महिला आपला ठसा उमटवताना दिसत आहेत. याचबरोबर आपला संसार आणि करियर या सर्व आघाड्या यशस्वीपणे सांभाळत आहेत. पण या सक्षम आणि सुशिक्षित महिला ‘अर्थसाक्षर’ आहेत का? 

हे नक्की वाचा: विवाहानंतरचे आर्थिक नियोजन

International women’s day:महिलांची अर्थसाक्षरता 

 • महिलांमध्ये नियोजन कौशल्य, मल्टिटास्किंग हे गुण जन्मतःच असतात. त्या उत्तम आर्थिक नियोजन व गुंतवणूक नियोजन देखील करू शकतात. 
 • असे असूनही अनेक कुटुंबांमध्ये पुरुषच आर्थिक निर्णय घेतात. याचे महत्वाचे कारण म्हणजे आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असणाऱ्या महिलादेखील  गुंतवणूक, आर्थिक नियोजन यासारख्या गोष्टींमध्ये फारशी रुची दाखवत नाहीत. 
 • एकट्या राहणाऱ्या स्त्रिया यामध्ये अविवाहित, घटस्फोटित किंवा वैधव्य आलेल्या स्त्रिया नाईलाजाने किंवा गरज म्हणून आर्थिक बाजू सांभाळतात,पणआर्थिक नियोजन, गुंतवणूक, विमा आदी गोष्टींसाठी त्या बरेचदा वडील, भाऊ, किंवा कुटुंबातील ज्येष्ठ पुरुषावर अवलंबून राहतात.
 • कुटुंबाच्या आर्थिक निर्णयात सहभाग घेणाऱ्या महिलांचे प्रमाण मुळातच कमी. त्यातही बहुतांश वेळा दागिने, घरगुती खरेदी आणि टिकाऊ वस्तू खरेदी करण्याचा निर्णय घेतात, तर गुंतवणूक, बचत, घर खरेदी अशा मोठ्या खरेदीचे निर्णय पुरुष घेताना दिसतात. 

International women’s day: आर्थिक नियोजनाची ७ सूत्र

१.  आरोग्यम धनसंपदा ! आपल्या आरोग्याची काळजी घेणे आपल्याच हातात असते. 

 • कुटुंबातील स्त्री म्हणजे कुटुंबाचा आधारस्तंभ असते. ती सर्वांची काळजी घेते, पण स्वतःला होणाऱ्या त्रासाकडे मात्र दुर्लक्ष करते 
 • सतत शिळे अन्न खाणे किंवा संपवायचे म्हणून नको असताना खाणे टाळा. सकस व ताजे अन्न सेवन करा. रोजचा किमान अर्धा तास व्यायामासाठी राखून ठेवा. आपले छंद जोपासा आणि आनंदी राहा. 
 • आपलं आरोग्य ही आपली सर्वात पहिली जबाबदारी आहे. त्यामुळे महिलांनी स्वतःच्या आरोग्यालाही प्राधान्य द्यायला हवं. 
 • कुटुंबाच्या आर्थिक नियोजनात आरोग्य विमा, आरोग्य तपासणीची या गोष्टींचा समावेश आहे का याची खात्री करा. अचानक उद्भवणारा आजार कुटुंबाचे आर्थिक नियोजन बिघडवू शकतो. 
 • नियमित आरोग्य तपासणी करणे, वेळच्यावेळी आरोग्य विमा नूतनीकरण करणे ही कामे लक्षात ठेवा. 

महत्वाचा लेख: ‘आकस्मिक निधी’ हाताशी हवाच!

२. अर्थसाक्षर आणि  अर्थसंस्कारी 

 • तुम्ही गृहिणी असा अथवा स्वतंत्र व्यावसायिक किंवा नोकरदार तुमच्या कुटुंबाचे आर्थिक नियोजन करताना त्यामध्ये तुमचाही सहभाग असणे आवश्यक आहे. 
 • बहुतांश वेळा अविवाहित मुली आपल्या कुटूंबातील आर्थिक नियोजनामध्ये भाग घेत नाहीत किंवा त्यांना त्यामध्ये सामावून घेतलं जात नाही. अशावेळी आपली कौटुंबिक परिस्थिती समजून घेऊन त्यानुसार आर्थिक नियोजन करा. 
 • ज्याप्रमाणे एक स्त्री साक्षर झाल्यावर संपूर्ण घर साक्षर होते त्याचप्रमाणे एक “अर्थसाक्षर” स्त्री संपूर्ण कुटुंबाला अर्थसाक्षर बनविते. 
 • लहान मुले निरीक्षणातून शिकत असतात. तुमचा कुटुंबातील आर्थिक नियोजनातील सहभाग बघून मुलांवरही तेच संस्कार होतील व पुढच्या पिढीमध्ये स्त्री व पुरुष दोघेही आर्थिक नियोजनामध्ये समसमान वाटा उचलतील. 

३. आपली स्वप्ने विसरू नका.

 • आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांसाठी झटताना, कुटुंबातील सदस्यांच्या आवडी-निवडी जपताना अनेकदा महिला आपल्या आवडी-निवडींचा विचारही करत नाहीत.
 • कोणे एके काली तुम्हीही काही ना काही स्वप्न बघितली असतीलच. ती आठवा. आपली स्वप्न पूर्ण करणं ही आपली स्वतःचीच जबाबदारी असते.
 • कुटुंबाचा अर्थसंकल्प तयार करताना कौटुंबिक आर्थिक उद्दिष्टांबरोबर वैयक्तिक आर्थिक उद्दिष्ट्ये निश्चित करा. यामुळे तुम्हाला तुमच्या स्वतंत्र आर्थिक जबाबदारीची जाणीव होईल. तुमच्या आर्थिक उद्दिष्टांमध्ये तुमच्या वैयक्तिक स्वप्नांचा समावेश करा.
 • तुमचं कुटूंब तुमच्यासाठी सर्वस्व असेल, त्यांच्याप्रती तुमची जी काही कर्तव्ये आहेत ती पूर्ण करताना आपली स्वतःप्रती असणारी कर्तव्ये विसरू नका.

४. बचतीचे रूपांतर गुंतवणुकीमध्ये करा

 • काटकसरी स्वभाव ही भारतीय स्त्री ला मिळालेली सांस्कृतिक देणगी आहे. लहानपणापासून आपली आई, आजी, काकू, मावशी यांना घरखर्चासाठी मिळालेल्या पैशातून बचत करताना अनेकजणींनी बघितलेलं असतं. त्यामुळे ही सवय नकळतपणे लहानपणीच मुलींच्या मनात रुजते. 
 • आपल्या मागच्या पिढीमध्ये फारच कमी स्त्रियांना गुंतवणुकीचे ज्ञान होते. ज्यांना हे ज्ञान होते त्यामधील बहुतांश स्त्रियांनी सोने, चांदी, दागिने, आरडी, एफ डी फारफार तर, रिअल इस्टेट अशा पारंपरिक पर्यायांनाच पसंती दिली होती. 
 • बचत केलेल्या बचतीचे योग्य गुंतवणुकीत रूपांतर करून आपल्या बचतीचे मूल्य वाढवणे आवश्यक आहे.

५. पारंपरिक व आधुनिक गुंतवणुकीचा संगम करा 

 • गुंतवणूक नियोजन हे शास्त्र आणि कला यांचा अनोखा संगम आहे. एकाच पर्यायामध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा पारंपरिक आणि आधुनिक अशा दोन्ही पद्धतीमध्ये गुंतवणूक करा. 
 • म्युच्युअल फंड, शेअर्स, बॉण्ड्स, ईटीएफ गोल्ड अशा गुंतवणुकीच्या आधुनिक पर्यायांची माहिती घेऊन आवश्यकता वाटल्यास गुंतवणूक तज्ज्ञांचा सल्ला घेऊन गुंतवणूक सुरु करा. 
 • गुंतवणूक करताना तुम्हाला आधुनिक पर्याय जास्त जोखमीचे वाटत असतील तर,एसआयपी सारख्या आधुनिक परंतु तुलनेने सुरक्षित पर्यायापासून सुरुवात करा.

विशेष लेख: Female Investor: यशस्वी महिला गुंतवणूकदार होण्यासाठीची ३ महत्वाची सूत्र

६. आपत्कालीन निधीचे महत्व 

 • कोरोना काळाने आर्थिक नियोजनाचे महत्व तर पटवून दिलेच आहे. त्यामुळे आपात्कालीन निधी किती आवश्यक आहे हे सर्वांच्या चांगलेच लक्षात आले असेल.
 • वेळ सांगून येत नाही. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाण्याची आर्थिक तयारी ठेवा. आपत्कालीन परिस्थितीला तोंड देताना पुरुषांपेक्षा जास्त धैर्य स्त्रियाच दाखवतात
 • गुंतवणूक पोर्टफोलिओ चांगला नसल्यास आपल्या सर्व गुंतवणूकीच्या योजना असफल होऊ शकतात. त्यामुळे आपल्या आर्थिक नियोजनामध्ये आपत्कालीन निधीची तरतूद करा.
 • किमान सहा महिन्यांच्या घरगुती खर्चाची चिंता मिटेल इतपत निधीची तरतूद तुमच्या बचत/ गुंतवणुकीमध्ये असणं आवश्यक आहे. अविवाहित असाल तर, मुदत विमा अवश्य घ्या. 

७.  आर्थिक हक्क व कर्तव्य दोन्हींची जाणीव ठेवा .

 • आर्थिक हक्क व कर्तव्ये समजून घेणे याचा अर्थ असा नाही की आपण आपल्या स्वतःच्या बचत, गुंतवणूकीचा उपयोग स्वतःसाठी अथवा कुटुंबासाठी करणे.
 • आपले आर्थिक हक्क व कर्तव्य म्हणजे आपल्या आसपासची “इकोसिस्टम” समजून घेणे. आपल्या जोडीदाराची मालमत्ता, दोघांची संयुक्त खाती याबद्दल तुम्हला माहिती असणे आवश्यक आहे. तसेच, आपल्या बचत व गुंतवणुकीची जोडीदाराला माहिती द्या. 
 • अविवाहित असाल तर, कुटुंबाप्रती आपली आर्थिक जबाबदारी, कुटुंबातील मालमत्तेमध्ये तुम्हाला मिळणारे हक्क, यासंदर्भात माहिती घ्या. एक लक्षात घ्या, माहिती घेण्याचा अर्थ हक्क गाजवणे नव्हे. 
 • आयुष्य सोपं नाही. वैवाहिक जीवनात निर्माण होणाऱ्या समस्या अथवा कौटुंबिक हिंसेसारख्या प्रसंगांमुळे घटस्फोट घ्यायची वेळ आली, तर घाबरून मागे येऊ नका. यासंदर्भात कायद्याने मिळणाऱ्या हक्कांची माहिती घ्या. 

टीम अर्थसाक्षरतर्फे सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

web search : women’s day,  women’s day Marathi, women’s day special in Marathi, Financial Planning of women, mahila din, mahila din vishesh, Arthik niyojn mahilanche arthik niyojan marathi

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

वाचनाचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Reading Time: 2 minutes वाचायचे कशासाठी? त्यातही नेमके काय वाचायचे, त्याचा फायदा काय? असे प्रश्न तुम्हालाही पडतात का? वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी काय करावे? ज्ञान मिळवण्याशिवाय वाचनाचा काय फायदा असतो? अशा सगळ्या प्रश्नांची उकल आपण या लेखात करूया.

बी.ए. नंतरचे सर्वोत्तम करिअर पर्याय

Reading Time: 4 minutes बी.ए. नंतरचे करिअर पर्याय  ग्रॅज्युएशननंतर करिअरचे कोणकोणते पर्याय उपलब्ध असतात याबद्दलची माहिती…

बी.कॉम. नंतरचे १० करिअर पर्याय

Reading Time: 5 minutes बी.कॉम. नंतरचे करिअर… ग्रॅज्युएट झाल्यावर चांगल्या करिअरसाठी पुढचे शिक्षण घेणे आवश्यक असते. ग्रॅज्युएशन…

सहलीचे नियोजन करताना लक्षात ठेवा या ७ महत्वाच्या गोष्टी

Reading Time: 3 minutes सहल म्हटलं की आठवते ती शाळेची बस, ते मित्र-मैत्रिणी आणि शाळेचे हवेहवेसे वाटणारे दिवस! या कल्पना त्याकाळीही खूप आनंददायी वाटायच्या. हल्ली मात्र सहलीच्या कल्पना बदलल्या आहेत. हल्ली ट्रीपसाठी बाहेर पडायचं म्हणजे व्यवस्थित नियोजन करणे आवश्यक आहे. आपल्या सहलीची ठिकाणे, सोबतीला लागणारे साहित्य, खाण्याचे पदार्थ वगैरे वगैरे. योग्य नियोजन नसेल, तर अचानक येणा-़या अडचणींमुळे सहलीचा आनंद घेता येत नाही. सहलीच्या नियोजनासाठी काही महत्त्वाच्या टिप्स –