Reading Time: 2 minutes

“हौस म्हणून किंवा इतर कोणत्याही कारणासाठी घेतलेले विविध स्वरूपातील सगळेच सोने आपल्याकडून रोजच्या रोज वापरले जात नाही. ते घरात ठेवायचे तर आपण स्वतः त्याच्या संरक्षणासाठी असमर्थ असतो. चोऱ्या-दरोड्यांची भीती वाटते. यावर उपाय म्हणून हे सोने आपण बँकेत लॉकरमध्ये ठेवतो आणि हुश्श करतो. आपलेच सोने सांभाळायची जबाबदारी देऊन वर आपणच त्यावर देखभाल शुल्क भरत बसणे, हे काही बरोबर नाही. याऐवजी अशी देखभाल जर खुद्द सरकार करत असेल, वर तुम्हाला त्यावर व्याजही देत असेल तर..? ”

सोन्याची आयात करणारा भारत हा चीन नंतर दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. हे खरेदी केलेले सोने कोणत्याही सुरक्षिततेशिवाय अक्षरशः घरातच पडून राहते किंवा मग बँकेत लॉकरमध्ये ठेवले जाते. लॉकर मध्ये ठेवण्यासाठी परत बँकेचे देखभाल शुल्क भरावे लागते. म्हणजे ही एक प्रकारे तोट्याची गुंतवणूक (dead investment ) ठरते. त्याऐवजी गोल्ड मोनेटायजेशन स्कीम अर्थात सुवर्ण संचय योजनेत गुंतवणूक केल्याने बराच फायदा होतो.

सुवर्ण संचय योजना तशी नवीन आहे. ही योजना मुदत ठेव स्वरूपाची आहे. या योजनेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे देशातील व्यक्ती, संस्था यांच्याकडे जे सोने नुसतेच पडून आहे, किंबहुना ज्याचा देशाच्या विकासासाठी कोणताही उपयोग होत नाही असे सोने एकत्रित करून त्याचा वापर देशाची उत्पादन क्षमता वाढवणे, तसेच सोन्याच्या आयातीची गरज कमी करणे असा होय. कोणत्याही खर्चाशिवाय सोन्याची सुरक्षितता आणि आपण जितके सोने जमा करू त्या सोन्याच्या रकमेवर व्याज असे या योजनेचे अनेक फायदे आहेत. दागिने, नाणी किंवा अन्य कोणत्याही स्वरूपात आपण सोने जमा करू शकतो. फक्त ज्या दागिन्यांमध्ये मौल्यवान खडे जडवले आहेत असे दागिने स्विकारले जाणार नाहीत.

या योजनेत कमीत कमी ३० ग्रॅम आणि जास्तीत जास्त कितीही सोन्याची गुंतवणूक करता येते. गुंतवणूक केलेल्या सोन्याची शुद्धता ९९.५ इतकी असणे गरजेचे आहे.

सुवर्ण संचय योजना म्हणजे काय ?

  • खरेदी केलेले सोने आपण सुवर्ण संचय योजनेत गुंतवले तर प्रत्यक्ष गरजेच्या वेळेपर्यंत ते  सुरक्षित राहते. शिवाय त्यावर व्याज मिळते आणि मुदत संपल्यावर सोने परत मिळवता येते. किंवा त्याऐवजी तुम्ही त्याचे रूपांतर पैशातही करू शकता. शिवाय यावर सोने दरवाढीचा लाभही मिळू शकतो. त्यामुळे एकंदरीत घरात किंवा लॉकर मध्ये तसेच सोने ठेवण्यापेक्षा ही योजना फायद्याची ठरते.

  • सोने घेऊन लॉकरमध्ये किंवा घरात ठेवल्याने व्यक्तीला किंवा देशाला कोणताही फायदा ना होता तोटाच होतो. यावर उपाय म्हणून भारत सरकारने २०१५-१६ मध्ये सुवर्ण संचय योजना सुरु केली आहे.

सुवर्ण संचय योजनेचे फायदे-

१. देखभाल शुल्क नाही- या योजनेत सोने गुंतवल्यावर बँकामध्ये भरावे लागते तसे कोणतेही देखभाल शुल्क भरावे लागत नाही.

२. व्याज- अशा प्रकारे सोने गुंतवल्यावर देखभाल शुल्क तर भरावे लागत नाहीच. उलट केलेल्या गुंतवणुकीवर गुंतवणुकीच्या कालावधीनुसार व्याज मिळते.

३. व्याज-प्रकार- व्याज स्विकारायचे दोन पर्याय उपलब्ध आहेत. हे व्याज तुम्ही पैसे स्वरूपातही घेऊ शकता, अथवा सोने म्हणूनही घेऊ शकता. गुंतवणूक करताना दोनपैकी एक पर्याय निवडण्याची मुभा मिळते.

४. गुंतवणूक-प्रकारावर बंधन नाही- या योजनेत सोने गुंतवताना ते फक्त दागिनेच असले पाहिजेत असे काहीच बंधन नाही. सोन्याची नाणी, बार, दागिने, इ. कोणत्याही प्रकारातील सोने गुंतवणूक म्हणून स्विकारले जाते.

सोने खरेदी करून प्रत्यक्ष वापराची वेळ येईपर्यंत ते सुवर्ण संचय योजनेत गुंतवले तर त्यावर मिळणाऱ्या व्याजातून आपला फायदाच होतो. एकूणच ही योजना म्हणजे सरकारने जनतेला दिलेली सुवर्णसंधीच होय.

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…