मराठी भाषा दिन: अर्थसाक्षरचा मराठी प्रवास

Reading Time: 2 minutes साहित्याने समृद्ध आणि श्रीमंत असणाऱ्या मराठी साहित्य जगताच्या चंद्रावरचा एक डाग म्हणजे  डिजिटल माध्यमात आर्थिक विषयांची संपूर्ण माहिती देणारी एकही वेबसाईट उपलब्ध नव्हती. इंग्रजीमध्ये यासाठी शेकडो वेबसाईट असणं काही नवीन नाही. हिंदीमध्येही अशा वेबसाइट्सची संख्या लक्षणीय आहे. मग मराठीतच फक्त ‘आर्थिक विषयासाठी’ अशी एकही वेबसाईट का नाही? असा प्रश्न आमहाला पडला. ही कमी पूर्ण करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न म्हणून आम्ही आर्थिक विषयांची माहिती संपूर्णपणे मराठीतून देणारी अर्थसाक्षर.कॉम नावाची एक वेबसाईट चालू केली.

अर्थसाक्षर नागरिकांची संख्या का वाढली पाहिजे? 

Reading Time: 4 minutes अर्थसाक्षर नागरिकांची संख्या का वाढली पाहिजे?  भारत वेगळा देश आहे आणि त्याच्या…

नवरात्र विशेष: आर्थिक साक्षरता म्हणजे नक्की काय?

Reading Time: 3 minutes ‘अ’ अर्थनिर्भरतेचा… अर्थसाक्षर म्हणजे काय? असा प्रश्न विचारल्यास प्रत्येकाचे उत्तर वेगळे असू…

तुमच्या मनातही सिबिल स्कोअर बद्दल हे गैरसमज आहेत का?

Reading Time: 3 minutes सिबिल स्कोअर: काही गैरसमज  नेहमीच्या आर्थिक व्यवहारांवर देखरेख करणारी सिबिल संस्था आणि…

ITR: आयकर रिटर्न वेळेत दाखल करण्याचे ९ फायदे

Reading Time: 3 minutes दरवर्षी पगारदार व विना-ऑडिट व्यवसायिकांसाठी इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै असते. पण अनेकांचा असा गैरसमज असतो की जर आपण आपला टॅक्स भरला आहे तर रिटर्न भरायची गरज नाही. रिटर्न दाखल करणे हे इन्कम टॅक्स भरण्याइतकंच महत्वाचं आहे. जर रिटर्न वेळेवर दाखल केले नाही, तर वेळेत  रिटर्न भरल्यामुळे मिळणारे काही फायदे तुम्हाला मिळू शकत नाहीत.आजच्या लेखात वेळेवर आयकर रिटर्न भरण्याचे फायदे काय आहेत? याबद्दल माहिती घेऊया. 

वेबिनार – “पडत्या शेअर बाजारात SIP बंद करावी का?”

Reading Time: < 1 minute मंगळवार दिनांक १४ एप्रिल २०२० रोजी सकाळी ११ वा.  Join Zoom Meeting https://us02web.zoom.us/j/89865210901?pwd=TZ-IGeNfmzc Meeting ID: 898 6521 0901 Password: 444444

खरंच का मी अर्थसाक्षर?

Reading Time: 3 minutes गुंतवणूक क्षेत्रात अनेक क्लिष्ट संज्ञा वापरल्या जातात, त्यांचा अर्थ बऱ्याचशा लोकांच्या डोक्यावरून जातो, त्या सोप्या पद्धतीने समजावण्याचा प्रयत्न फारसा होत नाही, परिणामी गुंतवणूकदाराच्या मनात नेहेमीच काहीशी धाकधूक असते, गुंतवणूक प्रक्रियेवर आपले नियंत्रण नाहीये, समोरच्याचं म्हणणं, त्याचा युक्तिवाद आपल्याला ऐकून घ्यावा लागतोय अशी भावना निर्माण होत असते. आर्थिक साक्षरतेचा आणि अनुभवाचा अभाव ही जरी त्याची लगेच जाणवणारी कारणे असली, तरी ती दूर करण्याबाबतची अनास्था ही अनेकदा गुंतवणूक क्षेत्राविषयीच्या अविश्वासामुळे निर्माण होत असते.

आयटीआर: आयकर रिटर्न भरण्यासाठीची १० महत्त्वाची कागदपत्रे

Reading Time: 3 minutes जून जुलैचा सिझन अनेकांसाठी कंटाळवाणा असतो. भरपूर सुट्टीनंतर मुलांची शाळा सुरु होणार असते. भर पावसात वह्या-पुस्तके दप्तर ई शालेय वस्तूंची खरेदी, ॲडमिशन प्रोसेस हे सर्व चालू असत आणि त्यात भरीस भर म्हणून आयकर रिटर्न (ITR) भरण्याचं टेंशन. रिटर्न फाईल करण्यासाठी लागणारी कागदपत्रेे जमा करताना अनेकांची त्रेधा तिरपीट उडते. पण  रिटर्न फाईल करताना लागणारी महत्वाची कागदपत्रांची माहिती करुन घेतली तर कठीण वाटणारं कामही एकदम सोप होऊन जाईल. आजच्या लेखात आपण आयकर रिटर्न भरण्यासाठी लागणाऱ्या १० महत्वाच्या कागदपत्रांची माहिती घेऊया. 

‘आयटीआर (ITR)’ कसा भरावा?- पहिल्यांदाच रिटर्न भरणाऱ्यांसाठी मार्गदर्शन

Reading Time: 3 minutes जूनमध्ये एकीकडे मान्सून पिकनिक ठरत असतात, तर दुसरीकडे आयटीआर (ITR) फाईल करण्याची धावपळ सुरू असते. त्यातही जर कोणी पहिल्यांदाच आयटीआर फाईल करत असेल, तर अचानक आलेला पाऊस जशी तारांबळ उडवतो तशीच तारांबळ आयटीआर भरताना होत असते. आयटीआर भरताना खरंतर गोंधळून जायची काहीच गरज नाही. फक्त थोडीशी माहिती जाणून घेतली की आयटीआर भरणं एकदम सोपं होईल. 

मी अर्थसाक्षर!!

Reading Time: < 1 minute तळागाळातल्या जनतेपर्यंत पोचून त्यांना अर्थसाक्षर करायचे असल्यास पुस्तक हा सर्वात प्रभावी मार्ग आहे, अशी आमची खात्री पटली आणि आम्ही पुस्तक प्रकाशनाचा निर्णय घेतला आहे. या पुस्तकच्या आखणीसाठी आपलं मोलाचं सहकार्य आवश्यक आहे. यासाठी फक्त खालील लिंकला क्लिक करून त्यावरील फॉर्म भरून आम्हाला लेखांच्या निवडीसाठी मदत करा.