Reading Time: 2 minutes

पीएनजीएस गार्गी फॅशन ज्वेलरीचा ८ डिसेंबरला आयपीओ आला आहे. हा आयपीओ १३ डिसेंबर पर्यंत सबस्क्राईब करता येणार आहे. या आयपीओ मध्ये प्रामुख्याने पीएनजीएस गार्गी फ़ॅशन कंपनीचे समभाग जारी केले जाणार आहेत. 

या आयपीओमधील शेअरची किंमत ३० रुपये प्रति शेअर ठेवण्यात आली आहे. पीएनजीएस गार्गी कंपनी सध्या नवीन पिढीच्या फ़ॅशन दागिन्यांवर लक्ष केंद्रित करत आहे. येत्या काही दिवसांत कंपनी जीवनशैली उत्पादनांच्या व्यवसायात प्रवेश करण्याची योजना आखत आहे. 

कंपनीचा इतिहास –

  • पुरुषोत्तम नारायण गाडगीळ ज्वेलर्स ही भारतीय ज्वेलर्स कंपनी आहे. 
  • गणेश गाडगीळ यांनी १८३२ साली या कंपनीची स्थापना केली होती. नंतर या कंपनीचा विस्तार दोन उद्योगांमध्ये करण्यात आला. 
  • पी एन गाडगीळ सन्स सांगली आणि पी एन गाडगीळ अँड कंपनी पुणे असे या दोन उद्योगांचे नाव आहे. २०१२ मध्ये या उद्योगांचे विभाजन करण्यात आले होते. 
  • भारतातील ज्वेलरी क्षेत्रातील पी एन गाडगीळ ही जुनी कंपनी आहे. ज्वेलरीमधील वेगळेपणासाठी या ब्रँडला खासकरून ओळखले जाते. 
  • पीएनजीएस गार्गी फॅशन ज्वेलरी हे पी एन गाडगीळ अँड सन्स या नावाखाली व्यवसाय करतात. कंपनीची २८ ऑफलाईन स्टोअर्स आणि १ ऑनलाईन स्टोअर आहे. 

पीएनजीएस गार्गी फॅशन ज्वेलरीचा आयपीओ – 

  • पीएनजीएस गार्गी फॅशन ज्वेलरी कंपनी आयपीओ मधून निधी उभारणार आहे. कंपनीने त्यासाठी २६ लाख शेअर्स जारी केले जाणार आहेत. 
  • पीएनजीएस गार्गी फॅशन ज्वेलरी कंपनीच्या आयपीओसाठी आयसीआयसीआय बँक प्रायोजक बँक आहे. 
  • या आयपीओतून मिळालेल्या पैशातून अतिरिक्त खेळते भांडवल, व्यवसाय वाढ आणि इतर खर्चासाठी वापर केला जाणार आहे. 
  • आयपीओ ऑफरमधील इक्विटी शेअर्सचे सुरुवातीचे मूल्य प्रत्येकी १० रुपये असणार आहे. 
  • पीएनजीएस गार्गी फॅशन ज्वेलरी ही कंपनी या आयपीओमधून ७.८० कोटी रुपयांचा निधी जमवणार आहे. हा आयपीओ बीएसई मार्केटमध्ये लिस्ट केला जाणार आहे. 

नक्की वाचा : आयपीओमध्ये गुंतवणुकीपूर्वी या गोष्टींकडे द्या लक्ष 

पीएनजीएस गार्गी फॅशन ज्वेलरी व्यवसायाची वाढ – 

  • पीएनजीएस गार्गी फॅशन या ब्रॅंडने बाजारात ओळख तयार केली आहे. कमी कालावधीत ग्राहकांच्या मनातील ब्रँड म्हणून या कंपनीकडे पहिले जाते. 
  • पीएनजी अँड सन्सने बाजारातील गरज ओळखली आणि चांदीच्या बाजारात प्रवेश केला. 
  • गार्गी या ब्रॅंडने विश्वास, उत्तम कलाकुसर आणि परवडणाऱ्या किमतीत बाजारात सुरुवात केली, त्यामुळे ब्रँडला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. 
  • पीएनजीएस गार्गी फॅशन ज्वेलरी हे ९२.५% चांदीचे दागिने बनवतात. गार्गी ज्या कामगारांकडून दागिने बनवून घेते ते फक्त त्यांच्यासाठीच काम करतात. 
  • गार्गी फॅशन कडे नवीनपणा आणण्यासाठी अनेक नवीन फ्रिलान्स डिझायनर्सही आहेत. 

नक्की वाचा : आयपीओबद्दल नवीन नियम माहित आहेत का? 

पीएनजीएस गार्गी फॅशन ज्वेलरीची मार्केट मधील ओळख – 

  • पीएनजीएस गार्गी फॅशन ज्वेलरी ही कंपनी ज्वेलरी सेगमेंट्सपासून ते सर्व वयोगटापर्यंत उत्पादने बनवते. 
  • कंपनीची उत्पादने विविध किमतीत उपलब्ध असून लग्न आणि सणासारख्या उत्सवात उत्पादनांची विशेष श्रेणीची विक्री केली जाते. 

पीएनजीएस गार्गी फॅशन आयपीओ तारीख आणि किंमतीची माहिती 

आयपीओ कंपनीचे नाव  पीएनजीएस गार्गी फॅशन 
आयपीओच्या सुरुवातीची तारीख  ८ डिसेंबर २०२२ 
आयपीओ बंद होण्याची तारीख  १३ डिसेंबर २०२२ 
आयपीओचा आकार  ७.८० कोटी रुपये , २६,००,०००  शेअर्स 
सुरुवातीची किंमत  इक्विटी शेअर्स १० रुपये 
किंमतीचा बँड  प्रति शेअर ३० रुपये 
लिस्टिंगची सूची  बीएसई 
शेअरचा आकार  २६,००,००० शेअर्स 
शेअरची होणारी विक्री  ७.८० कोटी रुपये
विक्रीसाठी असणारे शेअर्स  ० 

पीएनजीएस गार्गी फॅशन आयपीओ मार्केट लॉट – 

कमीत कमी लॉट संख्या  १ लॉट 
कमीत कमी शेअर्स  ४०० शेअर 
कमीत कमी गुंतवणूक  १,२०,००० रुपये 
कमीत कमी लॉट संख्या  १ लॉट 
जास्तीत जास्त शेअर्स  ४००० शेअर्स 
जास्तीत जास्त गुंतवणूक  १,२०,००० रुपये 

तुम्ही काय कराल  : 

  • ज्वेलरी व्यवसायात पीएनजीएस गार्गी फ़ॅशन कंपनीने कमी कालावधीत मोठी मजल मारलेली आहे. 
  • दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी पीएनजीएस गार्गी फ़ॅशनचा आयपीओ चांगला आहे. त्याची आयपीओ मधून खरेदी शक्य नसेल तर शेअर लिस्ट झाल्यावर नक्कीच तुम्ही शेअर खरेदी करू शकता.
Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

वॉरेन बफेट यांनी दिलेले गुंतवणूकीचे धडे !

Reading Time: 2 minutes अर्थविश्वातील गुंतवणूकीमधील बाराखडीचे गुरु म्हणजे वॉरेन बफेट यांचे नाव घेतले जाते. वॉरेन बफेट हे नाव, त्यांचे गुंतवणूकीचे ज्ञान आणि शेअर बाजारातील अनुभवांचे…