आयकर कायद्यातील कलम ८७ए

Reading Time: < 1 minute

अल्पउत्पन्न गटाला आयकर कायद्यामध्ये वाढीव फायदा पोहोचविण्याच्या दृष्टीने आयकर कायद्यात अर्थसंकल्प २०१४ अन्वये कलम ८७ए नव्याने प्रविष्ट करण्यात आला होता. या कलमानुसार असा कुठलाही करदाता (व्यक्ती आणि हिंदू अविभक्त कुटंब यांसाठी) ज्याचे वार्षिक उत्पन्न हे रू. पाच लाखांहून कमी असेल अशा व्यक्तीस रू.५,००० किंवा त्याचे प्रत्यक्ष करदेयक यांतील कमी रकमेची वजावट देण्यात येत होती.

परंतु, आर्थिक वर्ष २०१७-१८ साठी ह्या तरतूदीमध्ये बदल करण्यात आलेला आहे. आता असे करदाते ज्यांचे वार्षिक करपात्र उत्पन्न हे रू.३,५०,००० पेक्षा कमी असेल, त्यांना रू.२,५०० किंवा प्रत्यक्ष करदेयक यांतील कमी असलेल्या रकमेची या कलमाअंतर्गत वजावट मिळू शकेल.

नोकरदार वर्गासाठी तसेच अल्पउत्पन्न गटासाठी ही तरतूद अतिशय महत्त्वाची आहे. कुठल्याही आर्थिक वर्षातील जानेवारी ते मार्च हा कालावधी नोकरदार वर्गासाठी आयकराची मूळातून करकापत करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असतो. ज्यामध्ये नोकरदार वर्ग आपल्या गुंतवणुकी मालकास (एम्प्लॉयर) कळवून योग्य प्रमाणातील मूळातून करकपात करण्यास मदत करू शकतो.

तसेच, असे व्यावसायिक किंवा धंदेवाईक ज्यांचे उत्पन्न रू.५,००,००० पेक्षा कमी असते अशा करदात्यांना १५ मार्चच्या आधी आगाऊ कराचा शेवटचा हप्ता भरणेसुद्धा अनिवार्य असते. अशा वेळी हे गणित मांडताना या कलमातील बदललेल्या तरतूदींचा आढावा घेऊन योग्य तेवढाच आगाऊ कर भरण्यास मदत होऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published.