Reading Time: 2 minutes

माझ्या शेअरबाजार एक चक्रव्यूह या लेखात येत्या काही वर्षात ज्या उद्योगांना उज्वल भवितव्य आहे असे काही उद्योग सुचवले होते,उदा. इलेक्ट्रिक वाहने, ड्रोन उद्योग, ऍनिमेशन, सौरऊर्जा या विषयावर माझ्या मित्राच्या डॉ मुलाशी चर्चा करीत असताना काही अजून वेगळ्या वाटा लक्षात आल्या काही वर्षांपूर्वी स्मार्टफोनचे सध्या आपण करीत असलेले वापर कुणी सुचवले असते तरी ते अशक्य वाटले असते.

 

जगात असे काही लोक आहेत त्यांनी सातत्याने नाविन्याचा ध्यास घेतलेला असतो. आपल्या मनातही येणार नाहीत अशा कल्पना ते करू शकतात प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रचंड खर्च ते करू शकतात. या कल्पना सर्वात आधी करून साध्य करता आल्या तर या कल्पनेचे उद्योगात रूपांतर करून त्याचा सर्वाधिक फायदा मिळवता येतो. याचा संबंध भविष्यात बाजार कसा विकसित होईल, त्यासाठी काय करावं लागेल आणि याचा सर्वाधिक फायदा कोण करून घेईल यासारख्या गोष्टींवर अवलंबून आहे. 20 वर्षांपूर्वी आज ज्या पद्धतीने मोबाईल क्रांती होऊन अगदी सामन्यातील सामान्य माणसापर्यंत मोबाईल पोहोचला आहे, यूपीआयने कोणत्याही अँपवरून क्षणार्धात पेमेंट करता येऊ शकेल या गोष्टी स्वप्नवत होत्या. ओएनडीसीच्या माध्यमातून आज B2B आणि B2C व्यवहार पारदर्शक पद्धतीने भारतात कुठूनही कोठे येत्या महिन्याभरात होऊ शकतील. आज सेमीकंडक्टर निर्मितीच्या क्षेत्रात तैवान आघाडीवर आहे उत्पादक, दर्जा आणि दर याबाबत ते आपले वर्चस्व टिकवून आहेत. जर चीनने तेथे आपले वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न केला तर याचे दूरगामी परिणाम सर्व जगावर होतील.

 

कोणत्या उद्योगांना उज्वल भविष्य आहे याचा अंदाज, बाजारात कोणत्या उद्योगांचे भाव जोरात आहेत आणि त्या प्रकारात येणाऱ्या स्टार्टअप उद्योगांची संख्या वाढतेय का त्यावरून बांधू शकतो. अनेक चर्चांचे केंद्रबिंदू असे उद्योग बनतात यातील काही उद्योग असे-

 

1.उडणाऱ्या गाड्या- यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यापूर्वी अशा गाड्या अस्तित्वात आल्या आहेत. अनेक कंपन्यांनी त्याचे नमुने बनवून त्याच्या चाचण्या घेतल्या आहेत. उडणाऱ्या, ड्रायव्हर नसलेल्य, तरीही विनाअपघात इच्छित स्थळी नेणाऱ्या गाड्या ही फार दूरची गोष्ट नाही. जगभरात अनेक कंपन्या अशा गाड्या तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत आणि त्यावरील संशोधन कार्यावर करोडो डॉलर्स खर्च करण्यात आले आहेत. यातील सर्वात ओठा खर्च यासाठी लागणाऱ्या ऊर्जा साठ्यावर आहे. त्यासाठी लागणाऱ्या बॅटरीज कमी वजनाच्या आणि शक्तिशाली कशा बनतील यादृष्टीने संशोधन चालू आहे यात अन्य पर्यायांच्या साहाय्याने अशा गाड्या तासंतास कशा उडत राहतील यादृष्टीने संशोधन चालू आहे. सध्या या गाड्या 20 मिनिटं उडू शकतील यास यश आले आहे.

 

2 रेस्टॉरंटचे संपूर्ण यांत्रिकीकरण: जेव्हा आपण एखाद्या उपहारगृहात जाऊ तेव्हा आपली ऑर्डर घेणे. तो पदार्थ बनवणे या गोष्टी माणसे न करता यंत्रमानव करतील. पदार्थ तयार करणं तो गिर्हाईकाला बसल्या जागी आणून देणे. त्याची होम डिलिव्हरी देणे ही कामे यंत्रमानव करेल.

 

3.दुय्यम बाजाराची जागा खाजगी कंपन्यांनी घेणे: एखादी कंपनी जर सार्वजनिक कंपनी म्हणून स्थापन केल्यास त्यांना कमी खर्चात भांडवल मिळते, कमी दराने कर्ज मिळू शकते याशिवाय आयकारात सवलत मिळू शकते यातून मिळू शकणारा नफा भवितव्य असलेल्या खाजगी उद्योगात गुंतवण्याचा पर्याय उपलब्ध आहे. जोखीम स्वीकारणारे गुंतवणूकदार या पद्धतीने गुंतवणूक करत असतातच. यात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे असे गुंतवणूकदार स्वतंत्रपणे आपल्या अटी उद्योगाशी संमत करून गुंतवणूक करतील. यापूर्वी अशी गुंतवणूक होत असलीच तरी भविष्यात यात प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. ही गुंतवणूक शेअर बाजाराशी स्पर्धा करू शकेल.

 

4 कारखान्यात बनवलेली तयार घरे: भविष्यात कारखान्यात बनवलेली घरे निवडून आपल्याला योग्य वाटेल अशा जागी बसवता येतील हे काम झटपट आणि कमी खर्चात उपलब्ध होऊ शकेल.

 

जिथे जिथे व्यक्तिद्वारे कामे केली जातात त्या सर्वच गोष्टींचे यांत्रिकीकरण होईल. बँकांच्या शाखा असणार नाही कर्ज प्रकरणे ऑनलाइन मंजूर होतील. पैसे भरणे अगर काढणे याचे कोणतेही व्यवहार रोखीने होणार नाहीत. या तंत्रज्ञानाशी जोडण्यास जे असमर्थ राहतील त्यांना असे व्यवहार करण्यास मदत घ्यायला लागली तर त्यासाठी अधिक पैसे खर्च करावे लागतील. सर्व करार त्यांची अंमलबजावणी ऑनलाइन माध्यमातून होऊ शकतील. अनेक नाविन्यपूर्ण कल्पनांची यात भर टाकता येईल आज जरी त्या अशक्य वाटल्या तरी त्या व्यावसायिक दृष्ट्या साकारल्या जातील. या बदललेल्या तंत्राला अनुसरून त्याची देखभाल, दुरुस्ती यांच्या नवीन संधी उपलब्ध होतील. कमी काळात होणाऱ्या फार मोठ्या बदलांस यापुढील पिढीस जमवून घ्यावें लागेल.

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…