Reading Time: 3 minutes

पैसे गुंतवणुकीचे अनेक मार्ग आहेत, त्यामधील काही सुरक्षित गुंतवणूकीचे  पर्याय देतात पण त्यामधून मिळणारा परतावा हा कमी असतो. कोणतीही गुंतवणूक करण्याच्या आधी ती सुरक्षित आहे का याबद्दलचा अभ्यास करायला हवा. सर्वसाधारणपणे, ग्राहकांकडून सरकारने हमी दिलेल्या साधनांमध्ये गुंतवणूक करण्यास सर्वात जास्त प्राधान्य दिले जाते. गुंतवणूक करत असताना जेवढी जास्त जोखीम तेवढा जास्त परतावा हे गणित ठरलेले असते.  या लेखामध्ये  सुरक्षित पैसे गुंतवणूक करण्याचे मार्ग सांगितले आहेत. 

 

. बँक एफडी (बँक मुदत ठेव)

  • बँक एफडी हा भारतामध्ये सर्वात सुरक्षित गुंतवणूक प्रकार समजला जातो. बँक मुदत ठेवीमध्ये गुंतवलेली  रक्कम विशिष्ट कालावधीने व्याजासहित परत मिळते. 
  • जेष्ठ नागरिकांसाठी बँक मुदत ठेवींमध्ये थोडे जास्त व्याजदर दिले जाते. 
  • तुम्ही जर ५ वर्ष मुदतीची आयकर वाचविणारी बँक एफडी काढली असेल तर, प्राप्तीकरामध्ये  सूट दिली जाते. आयकर कायदा १९६१ च्या कलम 80C अंतर्गत ही सूट समाविष्ट करण्यात आली आहे. 
  • गुंतवणूकदार या योजनेत  गुंतवणूक करून १,५०,००० रुपयांच्या उत्पन्नावर करबचत करू शकतात. 
  • बँकेतील एफडीमध्ये गुंतवणूकीसाठी मुदत नक्की केली जाते. म्हणजे या ठरलेल्या लॉक इन कालावधीपूर्वी तुम्ही जर रक्कम काढली तर मिळणाऱ्या व्याजावर काही स्वरूपात दंड भरावा लागतो. 
  • गुंतवणुकीचा कालावधी, रक्कम, निवासी स्थिती आणि बँक यानुसार व्याजदर बदलत असतो. बँकेप्रमाणे इतर कंपन्या पण एफडीच्या सुविधा पुरवतात. 
  • बँकेतील एफडीमधील ठेव सुरक्षित समजली जाते. त्यामध्ये ठेव ठेवली तर तुम्हाला विशिष्ट कालावधीनंतर खात्रीशीर परतावा मिळतो. जोखीम न स्विकारता सुरक्षित गुंतवणूक करता येते. काही अंशी रक्कम काढल्यावर उरलेल्या रकमेवर कर्ज उपलब्ध होते. 

 

नक्की वाचा : Top 5 Investment Options : नियमित व सुरक्षित  मासिक उत्पन्नासाठी ५ गुंतवणूक योजना

 

२. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF – Public Providend Fund)

    • सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी  योजना सरकारतर्फे मान्यता देण्यात आलेली लोकप्रिय गुंतवणूक योजना आहे. ही योजना सुरक्षित  समजली जाते. १५ वर्ष लॉक इन कालावधीसाठी या योजनेत गुंतवणूक करावी लागते. बँक एफडी प्रमाणे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीवर निश्चित दराने व्याज दिले जाते. 
    • सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीचा शेअर बाजाराशी संबंध नसल्यामुळे १५ वर्षाने तुम्हाला खात्रीशीर परतावा मिळतो. 
    • दीर्घकालीन गुंतवणूक करायची असेल तर सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी ही चांगली योजना असून यामध्ये १५ वर्षांचा लॉक इन कालावधी असतो. या योजनेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला सर्व पैसे एकदम काढता येतात किंवा अजून पाच वर्षांच्या ब्लॉकमध्ये गुंतवणूक वाढवता येते. 
    • या योजनेवर मिळणारे व्याज आणि मुदत संपल्यावर मिळणारी संपूर्ण रक्कम करमुक्त असते. 
  • शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणूक करायला तुम्हाला भाग पाडणारी, विनाजोखिम, चक्रवाढ व्याजाचा फायदा करून देणारी ही योजना असून तुम्ही नक्की यात गुंतवणूक करा. 

३. राष्ट्रीय पेन्शन योजना (एनपीएस)

  • राष्ट्रीय पेन्शन योजना सरकारतर्फे चालवली जाते. या योजनेअंतर्गत  अनेक प्रकार असून तुम्ही तुमच्या गरजेनुसार तो निवडू शकता. या सर्व योजनांवर वेगवेगळे व्याजदर दिलेले आहेत. राष्ट्रीय पेन्शन योजना पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA) द्वारे व्यवस्थापित केली जाते. योजनेमध्ये लिक्विड फंड, मुदत ठेवी, आणि कॉर्पोरेट बॉण्ड्स यासारख्या पर्यायांमध्ये पैसे गुंतवता येतात. 

नक्की वाचा : गुंतवणूक का महत्त्वाची आहे आणि कोठे गुंतवणूक करावी ?

  • राष्ट्रीय पेन्शन योजना सर्व क्षेत्रातील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गुंतवणुकीसाठी खुली आहे. या योजनेत  पोर्टपोलिओ व्यवस्थापित करण्याचा ऑटो किंवा सक्रिय मार्ग निवडण्याचा अधिकार ग्राहकाकडे असतो. आयकर कायदा, १९६१ च्या तरतुदीनुसार या योजनेमुळे २ लाख रुपयांपर्यंतची बचत होऊ शकते. 

४. सोन्यामधील गुंतवणूक 

  • सोन्यामध्ये केली जाणारी गुंतवणूक पूर्वीपासून चालत आलेली आहे. सोन्याची गुंतवणूक पारंपारिकपणे लगडी, दागिने आणि नाण्यांच्या स्वरूपात केली जाते. सोने खरेदीच्या व्यतिरिक्त गोल्ड ईटीएफ आणि सार्वभौम सुवर्ण रोख्यांमध्ये गुंतवणूक करून सोन्यामध्ये गुंतवणूक केली जाते. 
  • सोन्यामध्ये गुंतवणूक केल्यावर  त्याच्या किंमतीत मोठ्या प्रमाणावर घट होत नाही. त्यामुळे तुम्हाला भांडवली संरक्षणाचा फायदा मिळतो. सोन्याच्या किमतीचा आणि शेअर बाजाराचा विरोधी संबंध असल्यामुळे शेअर बाजारात उतार आला तरी सोन्याच्या किमतीत फरक पडत नाही. सोन्यात गुंतवणूक केल्यामुळे महागाईपासून संरक्षण मिळते. 

५. सेव्हिंग बॉण्ड्स 

  • सेव्हिंग बॉण्ड्स हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वतीने सरकारद्वारे जारी केले जातात. या रोख्यांमध्ये ७ वर्ष गुंतवणूक करावी लागते. त्यावर मिळणारे व्याज करपात्र असते. 
  • यामध्ये गुंतवणूकदारांना ७.७५ टक्के दराने सध्या वार्षिक व्याज मिळते. हे दर वेळोवेळी सरकारतर्फे जाहीर केले जातात. 
  • तुम्ही यामध्ये १,००० रुपयांच्या गुंतवणुकीपासून सुरुवात करू शकता. 
  • सेव्हिंग बॉन्ड्समधील गुंतवणूक सुरक्षित असते. ज्यामुळे तुमच्या भांडवलावर संरक्षण मिळते. 

६. आवर्ती ठेव (RD – Recurring Deposits )

  • आवर्ती ठेव हा गुंतवणुकीचा चांगला पर्याय आहे. तुम्हाला आरडी ठेवीवर नियमित बचत खात्यापेक्षा जास्त व्याज दिले जाते. कर्ज मिळवण्यासाठी तुम्ही आरडी ठेव अप्रत्यक्ष पुरावा म्हणून दाखवू शकता. ग्रामीण भागामध्ये संस्थांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आरडी ठेवींचा वापर केला जातो. आरडी ठेव सुरक्षित ठेव म्हणून समजली जाते. 
  • आरडी ठेवीमधील गुंतवणुकीवर शेअर बाजाराचा परिणाम होत नाही. दीर्घ कालावधीसाठी आरडी ठेवींमध्ये गुंतवणूक केल्याने पैशांची बचत करण्याची सवय होते. तुम्हाला गुंतवणूक करण्यासाठी मोठ्या रकमेची गरज लागत नाही, छोट्या रकमेपासून  सुरुवात करू शकता.

 

दीर्घकाळासाठी गुंतवणूक करताना सुरक्षित गुंतवणुकीचा विचार करावा, त्यासाठी आर्थिक सल्लागाराचा सल्ला अवश्य घ्या. सुरक्षित आणि फायदेशीर गुंतवणुकीच्या संदर्भातील लेख वाचण्यासाठी अर्थसाक्षर वरील लेख नियमितपणे वाचायला विसरू नका. तुमच्या सुरक्षित, फायदेशीर आणि दीर्घकालीन गुंतवणूक निर्णयांसाठी शुभेच्छा! 

नक्की वाचा : Investment Tips : प्रथमच गुंतवणूक करणाऱ्यांसाठी ‘या’ स्मार्ट टिप्स

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…