Arthasakshar difference between Spending on consumption spending on investment
Reading Time: 2 minutes

‘वापरा’वरील खर्च विरुद्ध ‘गुंतवणुकी’वरील खर्च

‘वापरा’वरील खर्च (Spending on consumption) आणि ‘गुंतवणुकी’वरील खर्च (spending on investment) यांच्यातील फरक समजून घेताना या दोन संज्ञा नक्की काय आहेत ते समजून घेणे गरजेचे आहे. 

गुंतवणुकीची ८ प्रमुख कारणे

वापरा’वरील खर्च (Spending on consumption) –

‘वापरा’वरील खर्च म्हणजे अशा गोष्टींसाठी केलेला खर्च ज्यामध्ये त्या खर्च केलेल्या पैशांचे मूल्य दिवसेंदिवस कमी कमी होत जाते. उदा. तुम्ही नवीन गाडी घेतली तर ती घेतल्या क्षणापासून त्या गाडीचे मूल्य दिवसेंदिवस कमी कमी होत जाते. अशी इतर उदाहरणे म्हणजे घरगुती वापराची साधने, फर्निचर, वाहने इत्यादी. 

पगारच पुरत नाही…बचत कशी करू?

‘गुंतवणुकी’वरील खर्च (spending on investment) –

‘गुंतवणुकी’वरील खर्च म्हणजे असा खर्च ज्यासाठी खर्च केलेला आहे त्याचे मूल्य दिवसेंदिवस त्याच्या खरेदी किमतीपेक्षा वाढत जाते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे म्युच्युअल फंडामध्ये गुंतवलेले पैसे किंवा एखादी स्थावर मालमत्ता खरेदी यांचे मूल्य दिवसेंदिवस वाढतच असते.

  • BCG (बोस्टन कॉउंसिलिंग ग्रुप) ने केलेल्या सर्वेक्षणानुसार अमेरिका आणि चीन नंतर भारतच सर्वांत जास्त खर्च करण्यात २०२५ पर्यंत अग्रेसर ठरेल. 

  • खर्च करणाऱ्या लोकांमध्ये सर्व स्तरातील लोकांचा समावेश आहे.

  • ‘वापरा’वरील खर्चाचा विचार करता यामध्ये दोन प्रकार पाडता येऊ शकतात –

    • घरगुती कारणांसाठी करावे लागणारे निश्चित खर्च येतात जे टाळता येत नाहीत. 

    • सुखसोयींसाठी केलेले असे खर्च जे बदलते असतात याच खर्चांमध्ये कुटुंबांची केलेली बचत सर्वात जास्त खर्च होते. परंतु आता सुयोग्य मासिक हप्त्यांवर अनेक वस्तू मिळत असल्याने महागड्या वस्तूंवर देखील भारतीय ग्राहक विनासंकोच खर्च करू लागले आहेत. 

फायर मुव्हमेंट (F.I.R.E. Movement)- यशस्वी निवृत्तिनियोजसाठी…

  • आता अनेक लोक खेड्यांकडून शहरांकडे स्थलांतर करू लागल्यामुळे त्यांच्या गरजा आणि त्यांची खर्च करण्याची वृत्ती यामध्ये बराच बदल घडून आलेला दिसतो. 

  • यामध्ये ‘गरजेनुसार खर्च’ या प्रकारचा मोठा वाटा म्हणता येईल. उदा. नवीन घरासाठी किंवा ऑफिससाठी आता फर्निचर हवं असेल, तर लोक ते विकत घेण्यावर खर्च करण्यापेक्षा ते भाड्याने घेण्यावर जास्त खर्च करताना दिसतात. 

  • याचा फायदा म्हणजे काही दिवसांनी आपल्याला नवीन ट्रेंडनुसार तेवढ्याच किंवा त्यापेक्षा थोड्या अधिक खर्चात नवीन फर्निचर बदलून घेता येते.

तुमची आर्थिक उद्दिष्टे कशी ठरवाल?

‘वापरा’वरील खर्च आणि ‘गुंतवणुकी’ वरील खर्च या दोन गोष्टी दैनंदिन आणि व्यावसायिक किंवा आर्थिक अशा दोन प्रकारात विचारात घेतल्या तर त्याचे विभाजन असे होईल:

गुंतवणूक वापर
दैनंदिन जीवन घर – घराचे मूल्य हे दिवसेंदिवस वाढतच जाते त्यामुळे ही ‘गुंतवणूक’ आहे. हॉटेलमध्ये जेवण्यावर किंवा काही खाण्यावर केलेला खर्च हा ‘दैनंदिन वापर’ प्रकारात येतो कारण यामधून भविष्यात कोणत्याही प्रकारचा लाभ होऊ शकत नाही. असं म्हणता येईल कि यामध्ये खर्च केलेले पैसे ‘वापरून संपून जातात’ ज्यामधून भविष्यात काहीही लाभ होऊ शकत नाही.
म्युच्युअल फंडस् – भविष्यात यामधूनही आपण गुंतवलेल्या पैशांवर नफा मिळू शकतो त्यामुळे हा देखील दैनंदिन गुंतवणुकीचा अभंग म्हणता येईल
शिक्षण – शिक्षणासाठी केलेला खर्च हा नेहमी गुंतवणूक प्रकारात येतो कारण भविष्यात पैसे कमावण्यासाठी याचा वापर जात असतो किंवा तुम्ही सिनेमागृहात सिनेमा बघायला गेलात तर त्यासाठी केला खर्च हा देखील ‘वापरासाठी’च्या खर्चात येतो. 
आर्थिकदृष्ट्या कारखान्यातील यंत्रांसाठी केलेला खर्च हा गुंतवणूक प्रकारात येतात कारण भविष्यात यामुळे विविध वस्तूंचे उत्पादन करण्यात येणार आहे. याबाबतीत म्हणता नवीन वापरायोग्य वस्तू आणि सेवांसाठी केलेला खर्च म्हणजे ‘वापरासाठी’ चा खर्च कारण यांचा उपभोग घेऊन खर्च केलेल्या पैशांचा पूर्ण ‘वापर’ केला जातो व त्यातून भविष्यात काही नफा मिळत नाही.
कच्च्या मालासाठी केलेला खर्च हा देखील गुंतवणूक प्रकारात येतो
यामध्ये आणखी स्पष्ट सांगायचे झाल्यास समजा खरेदी केलेली नवीन गाडी तुम्ही रोज तुमच्या ऑफिसला जाण्यासाठी वापरणार असाल तर ती ‘गुंतवणूक’ प्रकारात पकडावी लागेल कारण त्यातून तुम्हाला पुढे लाभ होणार आहे.

Arthasakshar difference between Spending on consumption and. spending on investment

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimerhttps://arthasakshar.com/disclaimer/ 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…