ओआरएसचा शोध लावणारे डॉ. दिलीप महालबनीस यांची यशोगाथा
Reading Time: 2 minutes
 • पश्चिम बंगाल राज्यात बांगलादेश मधील नागरिक निर्वासित झाले होते. त्या वेळी कॉलरा साथीच्या काळात गोळ्या औषधे रुग्णांना मिळत नव्हते. 
 • डॉ दिलीप महालबनीस यांनी ओआरएसचा शोध लावला आणि अनेक रुग्णांचे प्राण वाचले. ताप, उलटी आणि जुलाब झाले की डॉक्टर हमखास ओआरएस पाण्यातून पिण्याचा सल्ला देतात. 
 • डॉ दिलीप महालाबनीस यांचे सोमवार १७ ऑक्टोबर रोजी दुःखद निधन झाले. 
 • त्यांनी ओआरएसचा शोध लावला होता. एखाद्या व्यक्तीला जुलाब, अतिसार किंवा उलट्या झाल्या की शरीरात पाण्याचे प्रमाण कमी झालेले असते. 
 • अशा वेळी ओआरएस दिले तर त्याच्या शरीरामधील पाणी लवकर भरून निघून त्याची तब्येत लवकर बरी होते. 

 

डॉ दिलीप महालबनीस यांचे कार्य –

 • डॉ दिलीप महालबनीस यांच्या ओआरएसच्या शोधाला जगभरात मान्य करण्यात आले होते. 
 • डॉ दिलीप महालबनीस हे बालरोगतज्ज्ञ होते. त्यांनी १९६० साली कोलकत्ता येथील जॉन  हॉपकिन्स इंटरनॅशनल सेंटर फॉर मेडिकल रिसर्च अँड ट्रेनिंग येथे त्यांनी कॉलरा आणि इतर अतिसाराच्या रोगांवर संशोधन करण्याचे काम केले. 
 • बांगलादेश मुक्तिसंग्रामाची घटना त्यांच्या आयुष्याला नवीन वळण देऊन गेली. 

 

बांगलादेश मुक्तिसंग्राम आणि ओआरएसचा शोध – 

 • १९७१ साली अनेक बांगलादेश मधील नागरिक बंगाल मध्ये विस्थापित झाले होते. त्या विस्थापित झालेल्या छावण्यांमध्ये अशुद्ध पाणी आणि स्वच्छतेचा अभाव होता. 
 • त्यामुळे छावण्यांमध्ये कॉलरा आणि अतिसाराची सगळीकडेच साथ पसरली. त्यावेळी रुग्णांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले होते. 
 • डॉ दिलीप महालबनीस यांनी मीठ आणि साखरेच्या द्रावणाचे ओआरएस बनवले होते. 
 • त्या ओआरएसमुळे ३० टक्के रुग्णांचे होणारे मृत्यू ३ टक्क्यांवर आले. त्यांच्या या प्रयोगाला ‘द लॅन्सेन्ट’ या मेडिकल जर्नलने २० व्या शतकातील महत्वाचा शोध म्हणून गौरवले. 
 • ओआरएस हे द्रावण पाणी, मीठ, बेकिंग सोडा आणि ग्लुकोज यापासून बनवण्यात आले होते. 
 • १९७५ ते १९८० पर्यंत कॉलरा हा आजार नियंत्रणात येण्यासाठी डॉ महालाबनीस यांनी प्रयत्न केले. 

 

डॉ दिलीप महालबनीस यांचा कार्यगौरव –  

 • भारत सरकारकडून डॉ दिलीप महालबनीस यांचा शोध कायमच दुर्लक्षित करण्यात आले. 
 • जगभरातील अनेक रुग्णांना आजारपणाच्या काळात ओआरएसमुळे जीवनदान मिळाले. 
 • १९८० मध्ये महालबनीस यांनी जिवाणूजन्य रोगांच्या व्यवस्थापनावरील संशोधनासाठी जागतिक आरोग्य संघटनेत सल्लागार म्हणून काम केले. 
 • डॉ दिलीप महालबनीस यांना अमेरिका देशातील मानाच्या ‘पेलिन पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले होते. पेलिन पुरस्कार हा नोबल पुरस्काराच्या समान समजला जातो. 
 • थायलंड देशाच्या सरकारनेही २००६ साली डॉ महालबनीस यांना ‘प्रिन्स महिडोल पुरस्कार’ देऊन गौरव केला होता. अशा महान संशोधकाला अर्थसाक्षर परिवाराकडून भावपूर्ण आदरांजली.
Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…